“सोनम वांगचूक, लडाखचे आचरणशील ‘बौद्ध’ आहेत; मनुवादाच्या विरोधात थेट उभे राहिले आहेत; त्याचा ‘त्यांना’ मोठा राग आहे….”
————————
धनदांडग्या जैन-गुज्जू-मारवाड्यांच्या आणि ढीगभर पोरं जन्माला घालण्याचा एकमेव ‘उद्योग’ करणाऱ्या उत्तरभारतीयांच्या, आक्रमणापासून महाराष्ट्राला वाचविण्यासाठी…”काश्मीरचं ३७० कलम काढण्याऐवजी, काश्मीरप्रमाणेच महाराष्ट्रालाही ३७० कलम लावा”; अशी आम्ही ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे तारस्वरात मागणी करत असतानाच…जोपर्यंत, सोनम वांगचूक, आपल्या गैरसमजातून काश्मीरचं ३७० कलम काढण्याला पाठींबा देत होते आणि नरेंद्र मोदींचं कौतुक करत होते; तोपर्यंतच, भाजप-संघीय अंधभक्तांना, ते मोठे देशभक्त वाटत होते.
निःपक्षपाती वृत्तीने राजकीय चिकित्सा करण्याची निर्भेळ क्षमता बाळगून असलेला व ज्याच्याविषयी प्रचंड आदर वाटावा, असा माझा एक सच्चा आंबेडकरी-विचारधारेचा बौद्ध मित्र ‘शुद्धोदन आहेर’, याबाबत माझ्याशी चर्चा करताना जे म्हणाला, ते फार महत्त्वाचं आहे…शुद्धोदन म्हणाला, “होय, ‘आचरणशील बौद्ध’ सहसा समोरच्या व्यक्तिला पॅाझिटिव्हली घेतात, समोरचा माझ्यासारखाच आहे; असे गृहीत धरतात आणि फसतात!”
…पण, ज्याक्षणी, भाजप-संघीय भांडवली-हुकूमशाही राजवटीरुपी ‘पुतना मावशी’चं सत्यस्वरुप सोनम वांगचूक यांनी अचूक जाणलं व उपरती होऊन, ते त्या शोषक-नृशंस राजवटीचा प्रखर विरोध करु लागले…त्या क्षणापासून, ते देशद्रोही ठरु लागले. रेटून खोटं बोलणारे हे डँबिस लोक, सोनम वांगचूक चीन-पाकिस्तानचे हस्तक असल्याचा, ‘अमित मालवीय-पॅटर्न’ने (देशातल्या लोकशाहीचा मारेकरी’ असल्याने, वस्तुतः, स्वतः देशद्रोही असतानाही) हे लोक धडाक्यात अपप्रचार करायला लागले. यासंदर्भात, बोलताना शुद्धोदन पुढे म्हणाला की, “सोनम वांगचूक यांनी अहिंसक सत्याग्रहाची ताकद दाखवून दिली आहे…ते लडाखचे ‘बौद्ध’ आहेत व मनुवादाच्या विरोधात थेट उभे राहिले आहेत; त्याचादेखील ‘त्यांना’ मोठा राग आहे!”
“रा. स्व. संघाचे दत्तात्रय होसबळे, भारतात बाॅम्बफेक घडवणाऱ्या, अतिरेकी पाठवणाऱ्या पाकिस्तानशी चर्चा करायचं म्हणतात; मग, भारतीय विद्यार्थ्यांशी, सोनम वांगचूकशी चर्चा करायला तयार नाही, याचा अर्थ काय?”…१९ जुलै-२०२६च्या शिवाजी पार्कमधील सभेत मा. उद्धवजी ठाकरे यांनी, केंद्र-सरकारवर ओढलेले हे आसूड, यासंदर्भात अतिशय मार्मिक ठरावेत, धन्यवाद!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

