‘रावणी’ अहंकार-अत्याचाराचं, चंद्रभागेच्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी…अयोध्येतला ‘राम’, आषाढी-एकादशीला पंढरपुरात अवतरला अन् तोचि अवघा चमत्कार जाहला…!!!
‘CJP’च्या Gen-Z झुरळांच्या जंतरमंतरवरील आंदोलनाने, नेमका तोच चमत्कार घडवलाय; जो कधिकाळी म. गांधींनी शतकभरापूर्वी ‘एक हाती’ घडवला होता…तो चमत्कार म्हणजे, “क्रूर-नृशंस सत्ताधाऱ्यांबाबतची जनमानसातली भिती, पूर्णतया नष्ट करणं!”
…तेव्हा, आजच्या क्रूरकर्मा सत्ताधाऱ्यांचे डरपोक पूर्वज-वंशज, ब्रिटीशांसमोर शेपूट घालून बसले होते आणि त्या महात्म्याच्या स्वातंत्र्यलढ्याला अपशकून करत, ब्रिटीशांची थुंकी चाटण्यात ‘जीवनगौरव’ मानत होते!
सोनम वांगचूक यांनी या ‘CJP’च्या लढ्याला जे २३ दिवसांचं कठोर उपोषण करुन, त्यास ‘नैतिक-अधिष्ठान’ दिलं; त्याबद्दल संपूर्ण भारत जरुर त्यांचा ऋणी राहील. पण इतःपर सोनम वांगचूक यांनी अशा उपोषण वा अन्य स्वरुपाच्या आंदोलनाच्या फंदात कृपा करुन पडू नये…त्यांची बायको, दिल्लीतील एका रंगबदलू ‘साॅफ्ट-हिंदुत्ववादी’ राजकारण्याच्या नादाने व ‘कंगना राणावत’ ढंगाने, राहुल गांधींविषयी वेडवाकडं बोलली असली; तरी, त्याची राजकीय किंमत शून्यच (तिची राजकीय-विचारसरणी व एकूणच कारकीर्द वादग्रस्त असली; तरी, त्याबाबत बोलण्याएवढी ती अजिबात मोठी नव्हे)! स्वतः सोनमजी, हे ‘आचरणशील बौद्ध’ व सरळसाध्या स्वभावाचे (‘राळेगणसिद्धी-पॅटर्न’चे नव्हेच) असल्याने, त्यांचं कमजोर व भरकटलेलं ‘राजकीय-आकलन’, वेळोवेळी त्यांचा अवसानघात करत आलंय…भाजप-संघीय लोकं, अशा साध्याभोळ्या ‘कमिटेड्’ लोकांना, ‘गिर्हाईक’ बनवण्याएवढे पक्के मुरलेले ‘शातिर’ असतातच, म्हणूनच त्यांना हा प्रेमाचा सल्ला! त्यांनी एक निरुपद्रवी ‘NGO’ म्हणून, पूर्वीसारखंच जीव ओतून जनहिताची कामं व संशोधनं जरुर करत रहावीत; कारण, त्यांचा परोपकारी पिंड त्यांना स्वस्थ बसू देणार नाहीच.
अभिजीत दिपके, सौरभ दास, नेहा बोरा आणि उर्वरित सगळ्याच ‘Gen-Z’ चमूचं; तसंच, त्यांच्या आवाहनाला, सगळा धोका पत्करुन कडवी साथ देणाऱ्या भारतीय नवतरुणांचं मनःपूर्वक अभिनंदन व त्यांना लाख लाख धन्यवाद!
मागील दोन पिढ्यांची ‘नाकामी’, तुम्ही तुमच्या हिंमतीने, हिकमतीने व निर्धाराने अक्षरशः धुवून टाकलीत… त्याबद्दल, तुमचे आभार, हे मानावेच लागतील. महाराष्ट्रापुरतं बोलायचं (कारण, ‘अभिजीत’ शिवछत्रपतींच्या शूर-लढवय्या मातीला जागला, म्हणूनच खास); तर, आमच्या आधीच्या पिढीच्या राजकारण्यांनी, निहीत राजकीय व आर्थिक स्वार्थापोटी, “चूड दाखवून भाजप-संघीय वाघाला घरात (महाराष्ट्रात) आवतण दिलं” आणि देशाचा मोठा घात केला! आमच्या पिढीतल्या राजकारण्यांविषयी तर, काय बोलावं? या भयंकर घातकी सत्ताधाऱ्यांच्या (व्यवहारतः ‘देशद्रोही’ असताना, स्वतःला देशप्रेमी भासवणारे) ‘दमन-यंत्रणां’नी उभ्या केलेल्या आव्हानासमोर…आजवर कमावलेली ‘सत्ता आणि पैसा’ राखताना, त्यांची एकच तारांबळ आणि घाबरगुंडी उडाली. प्रत्यक्ष, ईडी/सीबीआय/आयटीच्या धाडी पडायच्या आतच, निव्वळ आलेल्या नोटिशींनी त्यांची चड्डी साफ ‘पिवळी’ झाली आणि तिचं धुतलेली ‘अर्धी चड्डी’ घालून, ते भाजप-संघीयांचे अतिशय लाचार-लाजिरवाणे ‘मांडलिक’ बनले… त्यातल्याच, काही मांडलिकांचं ‘मांडलिकत्व’ दडवून, त्यांना या पाताळयंत्री भाजपवाल्यांनी ‘विरोधकांची ‘स्पेस’ भरुन काढण्यापुरतं महाराष्ट्रात मोकळं सोडलं. “जे पिंडी, ते ब्रह्मांडी” या न्यायाने, जे नापाक राजकारण महाराष्ट्रात फसफसलं, तेच पुढे भारतभर, अधिक तीव्रतेनं प्रतिबिंबित व्हायला लागलं.
…अशा परिस्थितीत, श्रीलंका, बांगलादेश वगैरेमध्ये घडलं; त्याच पद्धतीने, या भारतीय ‘Gen-Z’लाच उचल खाणं भाग होतं! …आणि, घडलंही बव्हंशी तसंच. स्वतःचं ‘शर्मा’ आडनाव लपवून ठेवणार्या न्यायाधीशांनी एका बेसावध क्षणी, त्यांना ‘झुरळं व परजिवी’ संबोधून संतप्त तरुणाईच्या अंतःकरणातल्या ज्वालामुखीला उद्रेकाची संधि मिळवून दिली आणि “What if, all cockroaches come together?” म्हणत; “हजारो-लाखो झुरळं, जंतरमंतरची वाट चालू लागली; ती, तब्बल एका तपाची अंतहीन वाटावी…अशी अवघं भारतीय अवकाश व्यापून असलेली (Omnipresent), आधुनिक ‘नाॅन बायाॅलाॅजिकल सम्राटां’ची हुकूमी-दहशत, ‘छू मंतर’ करण्यासाठी!
…आणि, ज्यादिवशी (शनिवार, २५ जुलै-२०२६), महाराष्ट्रात चातुर्मासाच्या प्रारंभ करणारी ‘आषाढी-एकादशी’ होती…त्याचदिवशी, अयोध्येच्या लुटालुटीमुळे संतप्त व संत्रस्त झालेला ‘राम’, जणू तिथल्या राममंदिराचा त्याग करुन महाराष्ट्राच्या पंढरपुरात अवतरला; तो ती दहशत, ती हुकूमत…दक्षिण काशीमधल्या चंद्रभागेच्या पाण्यात बुडवून टाकण्यासाठी!
गणवेष म्हणजे, एकाच समूहातील व्यक्तिंना ओळखण्यासाठी असतो…त्यामुळे समूहात एकोपा, समानता आणि अनुशासन येतं…पण, तो विशिष्ट गणवेष वा कुठल्याही शासकीय-पदाचा अधिकार हा, दुसर्या कुठल्या समुदायाशी परस्पर अनुचित व्यवहार करण्यास अनुमती कधिच देत नसतो! पण, दिल्ली व अन्य ठिकाणच्या भाजप-सरकारकृत न्याय-सुव्यवस्था राखणाऱ्या व तपास करणाऱ्या यंत्रणा, गेली दहाबारा वर्षे सातत्याने व प्रामुख्याने ‘दमन-यंत्रणा’ म्हणून बेलगाम वापरल्या गेल्यात (त्यासाठी, जाणिवपूर्वक वेळोवेळी त्यांचे स्थानिक-प्रमुख बदललेत किंवा आधीच्यांना अनुचित-मुदतवाढ दिली गेलीय); केवळ, कोणी ‘तोंडी वा लेखी माफी’ मागितली म्हणून, अशा त्याज्य-निर्घृण घटनाक्रमातून, शिक्षेविना संबधित कुणाचीच सुटका होऊ नये. खाकी गणवेषधारी गुंडांनी व साध्या कपड्यातील भाजपाई गुंडांनी खिळे ठोकलेल्या लाठ्यांनी आंदोलकांना अमानुष मारहाण केली, ‘पॅलेट गन’च्या तुकड्यांनी कुणाचे डोळे गेले, तरुणींचे विनयभंग करत मारहाण करण्यात आली, आंदोलकांना अन्नपुरवठा करणार्यांवर नाहक गुन्हे दाखल करुन अत्याचार केले…त्यासाठी, न्यायालयातर्फे SIT स्थापून अशांना कडक शिक्षा व्हायलाच हव्यात; नुसत्या माफीवर किंवा राजीनाम्यावर (शिक्षेआधी, राजीनामा मात्र हवाच) भागता कामा नये; कारण, हे ध्यानात घेतलं पाहीजे की, “जले हुए घर को कैसे समझाएँ कि, आग ने माफी माँग ली है!”
…तेव्हा, कुणाच्याही निव्वळ माफीने नव्हे; तर, पडद्याआडच्या नृशंस सूत्रधारांच्या ‘प्रथमदर्शनी’ राजीनाम्यानेच, या जंतरमंतरवरील ‘CJP’ आंदोलनाची इतिश्री व्हावी…त्यादृष्टीनेच, राहुल गांधींनी, गुंड-प्रवृत्तीच्या दिल्ली-पोलिसांचं सूत्रसंचालन करणार्या गृहमंत्र्यांना थेट उद्देशून लिहीलेलं पत्र, अतिशय महत्त्वपूर्ण आहे…कारण, दुसर्या महायुद्धोत्तर न्यूरेंबर्ग आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाने “Unwarranted initiatiation of ‘aggression’… is not only an international crime; but it contains within itself, the accumulated evil of the whole”, हे सूत्र जगन्मान्य केलेलं आहे! तसेच, त्यातीलच “Personal responsibility cannot be avoided by claiming obedience to ‘superior orders’, when a ‘moral-choice’ was possible” या सूत्रानुसार, ज्याप्रमाणे CRPF ने प्राणपणाने सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणाची हमी दिल्याचं; मात्र, जंतरमंतरवरील शिस्तबद्ध व अहिंसक तरुणाईवर निर्घृण लाठीहल्ला वा गोळीबार करायला नकार दिल्याचं समजतं; तिचं न्यायसुसंगत व घटनात्मक भूमिका, दिल्ली-पोलिसांकडून घेण्यात आली नाही…म्हणूनच, संबंधित सर्वांनाच सखोल न्यायालयीन-चौकशीतून कडक शासन व्हायला हवं; जेणेकरुन, भविष्यात प्रत्येक लाठीधारी-बंदुकधारी शिपाई वा जवान, शांततामय आंदोलनाचा ‘घटनात्मक हक्क’ बजावणाऱ्या, आपल्याच देशातील नागरिकांविरुद्ध अवाजवी व बेकायदा बळाचा वापर करायला धजावणार नाही!
…आजच्या विमनस्क करणाऱ्या स्थितीत, हे ध्यानात घेतलं पाहीजे की, हे तथाकथित ‘हिंदुत्ववादी’ लोक, त्यांनी चालवलेल्या आदिवासी-आश्रमांतून (ज्याला, ते आदिवासींचा जंगलावरचा हक्क डावलण्यासाठी म्हणून मुद्दाम ‘वनवासी-आश्रम’ म्हणतात) “विवेकाविना विकास, हे सप्त महापातकांपैकी एक आहे”, असं प्रतिपादन नेहमी करत असतात…त्याच न्यायाने, “मूठभर भांडवलदारांची ‘ओटी’…नको तेवढी ओसंडून भरणारा, आमच्यावर हुकूमत गाजवणारा, माणुसकी-भूतदयेचा ‘विवेक’ सोडलेला…तुमचा ‘विकास’, आम्हाला नकोय…तुमची गलिच्छ राजकारणं, तुमची युद्धे आम्हाला नकोत; आम्हाला शांति-सुखासमाधानाने आणि आमच्या स्वतःच्या मताने ‘मूलभूत हक्क’ म्हणून नैसर्गिक आनंदाने जगण्याचा ‘अवकाश’ द्या” हे, ही नवी ‘Gen-Z’ जगभर आक्रंदून सांगतेय!
——————————
जाता जाता, आम्ही ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे…’EVM’चा निषेध करण्यासाठी व ‘पूर्ववत ‘मतपत्रिकेवर (Ballot Paper) निवडणुका होण्यासाठी…२६ जानेवारी-२०२५च्या ‘अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनी’ रात्रौ ९.०० वा. ५ मिनिटे सगळे लाईट्स बंद करण्याचं, सर्व पक्षीय नेत्यांना प्रत्यक्ष भेटून वा अधिकृतरित्या कळवूनही, दुर्दैवाने कुणीही मनावर घेतलं नाही व एक अनमोल संधि वाया दवडली गेली…त्यांच्याकडून, परिणामकारकरित्या हे होत नसेल, होणार नसेल; तर, याच ‘GEN-Z’ने नजिकच्या भविष्यात, ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी व धोक्यात आलेली देशातील ‘लोकशाही’ वाचवावी व भाजप-संघीय ‘ठोकशाही’ला कायमचा पूर्णविराम देण्याचं महत्कार्य पार पाडावं, धन्यवाद…!!!”
“NO BALLOT PAPER…NO ELECTION”
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

