पृथ्वीमातेला या दुर्जनांचा भार असह्य होत चाललाय; श्रीकृष्णाच्या कर्मसिद्धांताचं ‘सुदर्शनचक्र’, आता कुठे गरगरा फिरु लागलंय; त्याला, या ‘Gen-Z’ पिढीने गती प्राप्त करुन दिलीय…!!!

‘डेंग झिआओ पिंग’ यांनी वर्ष-१९७८मध्ये चीनच्या सत्तेवर येताच, देशातील सर्व संसाधने पणाला लाऊन ‘राष्ट्र-निर्मिती’साठी…MIT, OXFORD, HARVARD, CAMBRIDGE इ. जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या बरोबरीची, किमान ३०-४० विद्यापीठे तयार करण्याला चालना देण्याचं महत्कार्य केलं; तरी, २१व्या शतकाची चाहूल लागलेल्या चिनी ‘Gen-Millenials’ने…वर्ष-१९८९मध्ये डेंग यांनी केलेला ‘तियानचौका’तील विद्यार्थ्यांचा नरसंहार, विस्मृतीच्या पडद्याआड कधि जाऊ दिला नाही…त्याचीच परिणती म्हणून, डेंग यांच्या आर्थिक-सुधारणांमुळे संसाधनसंपन्न व नवश्रीमंत झाल्यानंतरही, त्यांनी पुढे लग्न करणं आणि लग्न केलंच; तर, मुलं जन्माला घालायला नाकारणं, मोठ्याप्रमाणावर सुरु केलं…आणि, एकप्रकारे तियानमेन-चौक हत्याकांडाविषयीचा आपला कडवा रोष व्यक्त करत, एकप्रकारे त्याचा बदला घेत, एकूूणच चिनी-व्यवस्थेला हादरा दिला! इथे एक इथोओपियन म्हण आवर्जून आठवते; ती म्हणजे, “When the great lord passes, the wise peasant bows deeply and silently farts!” तेव्हा, हे जे काही शिवराळ भाषेचं प्रयोजन आहे; ते ‘Gen-Z’चं व्यवस्थेविरोधातील एक निषेधात्मक ‘Farting’ आहे… गेंड्याच्या कातडीचे असूनही भाजप-संघीय बनेल लोकांना, तेचं चांगलं झोंबावं?

दिल्ली-पोलिसांच्या बरोबरीने साध्या वेषातल्या गुंडांकडून आंदोलकांना मारहाण…इलेक्ट्रिक करंट, खिळे लावलेल्या लाठ्या, पॅलेट गन्स इतकंच काय; तर, बिहारमध्ये एके-४७ चा गोळीबार करणाऱ्या दिल्लीश्वर ‘गुजराथी-लाॅबी’च्या मनात, चीनचा ‘डेंग झिआओ पिंग’ आहे; पण, तो ‘तियानमेन-चौक हत्याकांड’ घडवणारा आहे; जगातली सर्वोत्कृष्ट विद्यापीठे तयार करणारा नव्हे! पण, महत्त्वाचं हे की, तुम्ही उलटसुलट कुठल्याही अर्थाने ‘डेंग झिआओ पिंग’ होण्याचा प्रयत्न केलात की, “ही नवतरुणपिढी, त्यांना जमेल त्या पद्धतीने, तुम्हाला धडा हा शिकवणारच!” त्याचाच एक भाग, त्यांची आजची, तुमच्या नाकाम कर्तृत्त्वाला साजेशी काहीशी शिवराळ; पण, अंतःकरणाला थेट भिडणारी भाषा आहे.

अंधभक्तांनो, भाजप-संघीय ‘दलाल’ पत्रकारांनो आणि संस्कृतिच्या तथाकथित ठेकेदारांनो…जातधर्म-विद्वेषातून तुम्ही ‘निर्बुद्ध’ झाला असलात, ‘मेंदूविके’ झाला असलात; तरी, ही नवतरुण पिढी जागी आहे. कंत्राटी-कामगार पद्धती’ची गुलामी आणि काॅर्पोरेटीय-दहशतवाद (Corporate-Terrorism) आजुबाजुला फसफसत असताना, ती आपल्या भवताली उघड्या डोळ्यांनी पहाते आहे…आणि म्हणूनच, भांडवली-व्यवस्थेनं बहुतांच्या जगण्याच्या केलेल्या असह्य कोंडीनं, रोज उठून त्या पिढीचं मस्तक संतापाने भणाणते आहे…त्याचाच, कुठेतरी हा उसळणारा भावनोद्रेक आहे!

…अंधभक्तांनो, आजच्या पंतप्रधानांची, ‘Gen-Z’च्या बापजाद्यांशी तुलना करण्याची हिंमत करु नका…एकच ‘पंतप्रधान’ असा होता, ज्याला ‘चाचा’ (बापाच्या अगदी जवळचं नातं) म्हणून, या देशातल्या लहानग्यांनी आत्मीयतेनं संबोधलं होतं… जन्मदात्याखेरीज, आमचा एकच बाप होता व आजही मनाच्या कोंदणात आहे; तो म्हणजे आमचा ‘राष्ट्रपिता’ म. गांधी… आणि, या आभाळाएवढ्या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या आसपासचीही योग्यता नसलेल्यांना, कोण म्हणणार आपला ‘बाप’? त्यांच्या म्हणण्यानुसार, ते जन्माने स्वतःलाच भले ‘नाॅन-बायाॅलाॅजिकल’ म्हणाले असले; तरी, १५ लाख खात्यात जमा करण्यासारख्या वा दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्यासारख्या खोट्या आश्वासनांवर, ते वर्ष-२०१४मध्ये निवडून आलेत…आणि, त्यानंतर EVM मशिनमधल्या असंख्य तांत्रिक क्लृप्त्या, इलेक्टोरल-बाॅण्ड्स वगैरेंच्या ‘फ्राॅड’मधला पैसा, निवडणूक-आचारसंहिता व निवडणूक-प्रक्रियेचं बेधडक उल्लंघन करतच; ते पंतप्रधान म्हणून निवडून आणले गेलेत, बस्स्!

द्वेषाचं-हिंसेचं ‘रानटी तण’, सर्वत्र वाढवून-पसरवून मतांची शीघ्र बेगमी करणारं ‘राजकारण’ करायचं, बड्या भांडवलदार दोस्तांच्या (Crony-Capitalists) बोकांडी देशाची जल, जंगल, जमीन, बंदरं-विमानतळं वगैरे सगळी साधनसंपत्ती घालायची, लोकशाही संपवण्याच्या दिशेने निर्घृण पावलं टाकायची, बलात्काऱ्यांना-भ्रष्टाचार्‍यांना-गुन्हेगारांना अभय द्यायचं…हीच एकमेव ‘ओळख’ असणाऱ्या या सरकारच्या म्होरक्यांना; ‘शिमग्याच्या शिव्या’ नाय हासडायच्या; तर, काय त्यांच्यासाठी, या संत्रस्त तरुणांनी जात्यावरच्या ‘ओव्या’ गायच्या? कुठल्या संस्कृती-रक्षणाच्या बेफजूल बाता मारतो आहोत आपण?? भारतीय-अध्यात्मानुसार ‘दैत्य’ म्हणजे, असे भयंकर अहंकारी-हिंसक लोक की, जे सज्जनांना छळतात, त्यांची संपत्ती लुबाडून श्रीमंत होतात, जे न्याय-निती-सत्याला पायदळी तुडवत प्रजेचं दमन करण्याकामी आसुरी शक्ति बाळगतात, ते सारेच… पूर्वी अशा दैत्यांच्या गुरुला ‘शुक्राचार्य’ म्हणायचे; आता, ‘विश्वगुरु’ म्हणतात, एवढाच काय तो फरक!

यांची कार्यपद्धती काय; तर, देशी-विदेशी भांडवलदारांना चरायला रान मोकळं करण्यासाठी, कामगार-शेतकऱ्यांच्या माना पिरगळायच्या… त्यांच्या शांतिपूर्ण आंदोलनांकडे चक्क दुर्लक्ष करायचं, होता होईल तेवढी ती चिरडून टाकायचा प्रयत्न करायचा. हेच उद्योग ‘Gen-Z’च्या आंदोलनाबाबत केले गेलेत.
…म्हणूनच, तुम्हाला अगदी म. गांधींनी जरी येऊन सांगितलं की, “बाबांनो ‘साध्या’सोबतच ‘साधन-शूचिता’ही बाळगली पाहिजे”, तरी त्या महात्म्याचे ते महान बोल, निदान आज तरी ऐकू नका! महात्मा, आपली ‘हत्या’ करणार्‍यांना माफ करु शकतो; त्याला ते करु द्या…पण, त्या हत्येला, ‘वध’ संबोधणार्‍या, या नीच-नराधमांना तुम्ही बिलकूल माफ करण्याचं कारण नाही!! गांधी-नेहरु घराण्यावर, अंधभक्तांकडून गेली दहापंधरा वर्षे अश्लाघ्य भाषेत टीका व त्यांना शिवीगाळ होत असताना…’काँग्रेस की विधवा’, ‘५० करोड की गर्लफ्रेंड’, ‘जर्सी गाय’, ‘काँग्रेस की शूर्पणखा’, ‘दीदी ओ दीदी’ वगैरे नाक्यावरच्या टपराक मवाल्यासारखं बरळताना… ‘दामोदरसुता’ तुझा धर्म कुठे गेला होता? अटल बिहारी बाजपेयींना, ‘हिराबासुता’ला ‘राजधर्मा’ची आठवण तीव्रतेनं करुन द्याविशी वाटण्यासारखी परिस्थिती, कोणी निर्माण केली होती? आता मोठे साळसूदपणाचा आव आणतायत! यांच्या कुकर्मांची यादी, इतकी लांबलचक व मोठी आहे की, त्याचा एखादा ‘इन्सायक्लोपिडीया’च तयार व्हावा!

ऋषीमुनींनी पराकोटीच्या आध्यात्मिक उंचीवर नेलेला आणि शिवबा-संतांनी जोपासलेला, अखिल मानवतेची पूजा करणारा आणि निसर्गाची संरक्षण-संवर्धन करणारा महन्मंगल ‘हिंदू धर्म’ यांनी, पुरता नासवत रहायचं…आणि, त्यालाच काय ते बहुजनांनी ‘हिंदुत्व-पिंदुत्व’ म्हणत रहायचं? लक्षात ठेवा, न्याय-सत्याप्रती ‘अंधत्व’ बाळगत बरळणारी, ही अधर्मी-धर्मद्रोही भाजपाई मंडळी आहेत! पृथ्वीमातेला या दुर्जनांच्या पातकांचा भार असह्य होत चाललाय; श्रीकृष्णाच्या गीतेतील ‘कर्मसिद्धांता’चं सुदर्शनचक्र, आता कुठे गरगरा फिरु लागलंय… त्याला, या ‘Gen-Z’ पिढीने गती प्राप्त करुन दिलीय! जातधर्मीय-विद्वेषातून दंगली पेटवून माणसांना मरु घालणारी ही जमात, “चार पायाच्या पशूला, गोमाता” म्हणण्याचा (सावरकरी-भाषा) पिढीजात ढोंगीपणा करत आलीय. “बेटी बचाओ, बेटी पढाओ” वरकरणी म्हणत…बलात्कार्‍यांना ही जमात संरक्षण देते, संसदेत पाठवते, त्यांचा जाहीर सत्कार करते; हे एवढ्या लवकर विसरायचं?
माफिवीरांना क्रांतिवीर आणि, “खाणकामासाठी जंगले उध्वस्त करत सुटलेल्या भांडवलदारांना आव्हान देत”, आदिवासींसाठी प्राणपणाने लढणार्‍यांना ‘नक्षलवादी’ संबोधून वेचून वेचून ठार मारणारे…हे ‘भांडवली-माथेफिरु’ आहेत. त्यांना ‘भांडवली-व्यवस्थे’तल्या ऐय्याशीचं जबर व्यसन जडलेलं असल्याने (‘एपस्टिन-फाईल्स’ स्मरणातून एवढ्यात गेलेल्या नसल्यास…तुम्ही पहाल की, लिंगपिसाट एपस्टिनशी एकदम घसट किंवा सलगी असलेले, आजही निलाजरेपणे मंत्रिमंडळात खुंटा गाडून बसलेले आहेत) आणि त्या विनाशकारी व्यसनात, हे आकण्ठ बुडालेले असल्याने… ते सामान्यांच्या दुःखाप्रती आणि निसर्ग-पर्यावरणाच्या र्‍हासाप्रती ठार आंधळे, बहिरे झालेले आहेत. बक्कळ नफा कमावण्यासाठी, कंपन्या-कारखान्यांमधील रासायनिक प्रदूषके अर्धवट प्रक्रिया करुन अथवा अजिबात प्रक्रिया न करता…नद्यांमध्ये बेलाशक सोडून, हेच नद्या प्रदूषित करणार आणि हेच, ईशा-फाऊंडेशनसारख्या बेगडी धर्मसंप्रदायांना, नद्यांच्या शुद्धीकरणासाठी गाजावाजा करुन देणग्या देणार?

गेली ४ वर्षे जर्मनीचे भारतातील राजदूत असलेले डाॅ. फिलीप अकेरमन यांनी चीनला जाता जाता, तमाम भारतीय शिक्षण-मंत्र्यांना, नुसते चिमटेच काढलेले नाहीत; तर, “उच्चशिक्षण, ही सरकारची जबाबदारी आहे, असं आमचं सरकार मानतं; त्यामुळे, आमच्या देशातील बहुतांश विद्यापीठे, ही सरकारी तरी आहेत किंवा त्यांना आवश्यक निधी सरकार उपलब्ध करुन देतं”, असं म्हणत थेट कानशिलातच लगावलीय!

मूर्तिमंत वात्सल्याचा आदर्श असलेल्या महाराष्ट्राच्या सानेगुरुजींच्या आणि “नफरत की बाजार में, मोहब्बत की दुकान” थाटणाऱ्या राहुल गाधींच्या पावलावर पाऊल ठेवत…ती जंतरमंतरवरची अवघी तरुणाई, पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्या एकमेकांची विचारपूस करत जखमांवर मलमपट्टी करत होती…त्याच पोलिसांना अन्नपाणी आणि गुलाबाची फुलं देत होती; तेव्हा तिथे, दिल्ली-पोलिसांचं क्रौर्य ओशाळलं आणि जातधर्म, पंथप्रांत, लिंग-भाषा, गरीबी-श्रीमंतीचे सगळे भेदाभेद लंघून पुन्हा एकवार ममता-माणुसकी चिरंजिवी ठरली! “खरा तो एकचि धर्म…जगाला प्रेम अर्पावे”, म्हणणारे साने गुरुजी शहाणे की, “मुसलमान दिसता, तत्काळ त्याला झोडपावे”, असा अप्रत्यक्ष संदेश देणारे आणि इस्रायलच्या नृशंस-गुन्हेगार नेतान्याहुची उठसूठ गळाभेट घेणारे आपले बनावट ‘विश्वगुरुजी’ शहाणे…???

…लक्षात ठेवा, “शिविगाळ करणं गुन्हा असेल” तर, तुमचे दिल्लीचे गुंडे पोलिसच नव्हे; तर, भारतातील एकजात ‘पोलीसदल’ तत्काळ बरखास्त करावं लागेल; तेव्हा, याद राखा! ज्यापद्धतीने व ज्यापद्धतीच्या शिव्या, पोलिसदलातील वरीष्ठ अधिकारी, आपल्या हाताखालच्या शिपायांना आणि पोलिस ठाण्यात अटक केलेल्यांना वा बोलावलेल्यांना देत असतात…त्या ऐकताना, एखाद्या पापभीरु नागरिकाचे कान ठार बहिरे होतील किंवा मेंदू साफ बधीर होईल!
Gen-Zची भाषा कुणाला शिवराळ वाटत असेल; तर, खुशाल वाटो…ती भाषा आमच्या शिवरायांच्या काळापासूनची आहे आणि “भले तर देऊ गांडीची (‘कासेची’ शब्द नंतर घुसवला गेला) लंगोटी…नाठाळाचे काठी देऊ माथा” अशी, संत तुकारामांसारख्या रोकड्या साधुसंतांची आहे…आजच्यासारख्या, लाखो निर्बुद्धांचे बेगडी-भोंदू धर्मसंप्रदाय चालवणाऱ्यांची नव्हे! शुद्धतेचं अवडंबर सोबत घेऊन, संस्कृतिचं अवगुंठन लेवून बहुजनांना फसवणाऱ्या आणि त्यांना पिढ्या न् पिढ्या ‘अस्पृश्यते’च्या अंधःकारात नासवणार्‍या ‘नाठाळां’ची, ती संभावित भाषा नव्हेच नव्हे!

अशा रोखठोक भाषेची यांना एव्हढीच ‘ॲलर्जी’ असेल; तर, दिवसाचे चोवीस तास ‘शिवराळ’ भाषा वापरणारा, धमक्या देणारा…”Modi “loves Trump, but he did not want people to misinterpret the word “love” in a way that might negatively affect Modi’s political career”, अशी ‘ऑपरेशन-सिंदूर’ संदर्भातल्या ७२ वेळच्या बदनामीनंतर सरळसोट खिल्ली उडवणारा अमेरिकेचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना चालतो…पण, आमची निधड्या छातीची पोरं चालत नाहीत? त्या बिनडोक कंगना राणावतला म्हणावं, “तुझी हिंमत असेल तर, रात्री एकटी दिल्लीत फिरुन दाखव…पण म्हणावं, आंदोलनाच्या महिनाभरात मात्र, तू जंतरमंतर परिसरातून रात्री बिनधास्त मोकाट फिरु शकली असतीस; कारण, तेथील भारतीय Gen-Z ची गर्दी, अस्सल संस्कारी होती…तुझ्या सिनेमातील भूमिकांसारखी आणि रंगरंगोटीसारखी ‘नकली’ नव्हती!”

अंततः, एक गोष्ट हृदयाला घरं पाडणारी गोष्ट लक्षात घ्या…की, “आजचं जगणं, पुर्वीच्या तुलनेत एवढं सुखसोयींनं भरलेलं असतानाही, २१ तरुण पोरं NEET पेपरफुटीमुळे आत्महत्या करतात”…याचं या निर्दयी लोकांना काहीच वाटत नाही? त्यामुळे, यांच्या निष्ठूर हृदयाला घरं पडणं सोडाच; ज्या सहजतेनं, हे गोरगरीबांची बुलडोझरने घरं पाडतात; तेवढ्याच सहजतेनं व निर्विकारपणे, ते या हृदयद्रावक घटनेकडे पहातात. लक्षात ठेवा, असा प्रत्येक तरुण जेव्हा तुमच्या ‘व्यवस्थे’ची ही भयंकर अन्यायी, संवेदनबधीर अवस्था अनुभवतो… तेव्हा, तो केवळ वैफल्यग्रस्ततेतून आत्महत्या करत नसतो; तर, तुम्ही निर्माण केलेल्या नृशंस-शोषक भांडवली-व्यवस्थेला आणि ती व्यवस्था चालवणाऱ्या तुम्हा सर्वांना अक्षरशः “लाथ मारुन, या जगातून निघून जात असतो”… त्या प्रत्येक ब्रह्महत्येचं ‘महापातक’, नकली ‘लाल-भगवे टिळे’ लावलेल्या यांच्या माथी आहे आणि कितीही प्रयत्न केले तरी, ते त्यांना कदापि पुसता येणार नाहीत…!!!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)