आचार्य विद्यासागर यांच्यासह शांतिसागर, तरुणसागर, क्षमासागर वगैरे जैन मुनिंविषयी जरुर आदर आहे, आदर असावा…काहीही हरकत नाही.
पण, यांनी संख्येने अल्पसंख्य असलेल्या; मात्र, धनसंपदेनं अतिउन्मत्त झालेल्या आपल्या जमातीविरुद्ध कधि आवाज उठवलेला दिसला आपल्याला? कबुतरांना दाणे खिलवणारी; पण, गोरगरीबांच्या पुढ्यातलं ताट हिसकावून घेणारी…ही जी, या शोषक-जमातीची घृणास्पद धन-लालसा आहे, तिचा उघड निषेध केलाय कधि यांनी??
…तोंडाने एकीकडे ‘अपरिग्रहा’चा मंत्र जपायचा (म्हणजे, धनसंपत्ती-पैसा साठवणुकीचा वरकरणी तीव्र निषेध करायचा) आणि दुसरीकडे संघटित रहात, ग्राहक-श्रमिकांचं अमानुष शोषण करुन अफाट-अचाट पैसा कमावायचा, हेच यांचं हृदयशून्य, क्रूर व्यावहारिक धोरण राहीलेलं आहे…ज्याला, We don’t do ‘business in charity’ and ‘charity in business’ असं काॅर्पोरेटीय-शर्करेचं गोंडस-गोड आवरण देणार, ही बेशरम लोकं! यासंदर्भात या अशा जैन, गुजराथी, मारवाड्यांच्या संत-मुनि-आचार्यांनी त्यांना खडे बोल सुनावून सुधारण्याचा प्रयत्न केल्याचं ऐकिवात आहे कधि?
…ओशो (जे स्वतः जैन होते), जैनांच्या शोषण-मनोवृत्तीतील नृशंसतेबद्दल बोलताना म्हणाले होते की, “वर्धमान महावीरांसह जैनांचे सगळेच्या सगळे चोवीस तीर्थंकर व त्यांचे अनुयायी, हे मूलतः क्षत्रियच होते…जैन धर्म स्विकारल्यानंतर अचानक टोकाचे ‘शाकाहारी’ झाल्यावर त्यांच्यातील ‘हिंस्त्रता’, ‘आहारा’तून नाहिशी झाली खरी (ॲडाॅल्फ हिटलरसारखे अनेक क्रूरकर्मादेखील शाकाहारीच होते); पण ती त्यांच्या ‘आर्थिक-व्यवहारा’तून प्रकटली…अशारितीने, स्वभावातील मूळ ‘हिंस्त्रता’ कायम तर राहिलीच, उलट काळाच्या ओघात ती अंमळ वाढलीच!”
देशाच्या, विशेषतः महाराष्ट्राच्या, ‘निसर्ग-पर्यावरणा’वर आणि मराठी-मनावर…धनदांडग्या जैन-गुज्जू-मारवाड्यांनी, भ्रष्ट मराठी राजकारण्यांना हाताशी धरुन, आजवर अनन्वित अन्याय-अत्याचार केलेले आहेत. त्यांची बेलगाम-बेफाम अतिश्रीमंत जीवनशैली व त्यांनी उभारलेली काँक्रिटची जंगलं, उभारलेले उद्योग-व्यवसाय…यातून होणारं अपरिमित कार्बन-रासायनिक उत्सर्जन, झालेली वृक्षतोड, तुटलेली जंगलं…याविरोधात या तथाकथित अहिंसेचे पुजारी असलेल्या जैन संत-मुनींनी मोहिम राबवल्याचा कुठे दाखला आहे? हे मुनी जरुर आपल्या गरजा कमीतकमी राखून दिगंबरावस्थेत व्रतस्थ आयुष्य जगले असतील; पण, त्याची करोडो पटीने विपरीत-भरपाई करत अतिऐश्वर्यसंपन्न आयुष्य, हा धनदांडगा जैन-गुजराथी समाज जगत आलाय आणि या त्यांच्या संतमुनींनी त्यांना त्या पापकर्मात कधि रोखल्याचं वा धिक्कारल्याचं दिसलेलं नाही, हे कसं विसरुन चालेल?
…मुंबईचं सोडाच, ठाण्यापुरतं बोलायचं झालं; तरी ठाण्यात जागोजागी तुम्हाला जैन मुनी-आचार्यांची नावं आणि जैन मंदिरं चौकाचौकात, नाक्यानाक्यावर झळकताना दिसतील. गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून पद्धतशीरपणे ठाणे शहरातील मराठी घरं आणि दुकानं रिकामी करुन, हे शहर धनदांडग्या जैन-गुजराथी-मारवाड्यांना आंदण देणं आणि मूळ मायमराठ्यांना शहराच्या परिघाबाहेर विविध नगरांमधून कोंबड्या-बकर्यांसारखं १०’ × १०’ मध्ये कोंडून घालणं सुरुच आहे (फक्त, तथाकथित ‘पट्टशिष्य’ असलेल्या मंत्रीमहोदय एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीत, ते सगळं टिपेला पोहोचलंय, एवढंच)! ठाण्यातले ननगटशहा असलेले स्थानिक-राजकारणी, या धनदांडग्यांच्या पैशातून मोफत वह्यापुस्तकं-खेळसाहित्य वाटप करत आणि असंख्य सार्वजनिक मंडळांद्वारे गणेशोत्सव-पूजा-दहीहंड्या-गरबे-नवरात्रोत्सव-भंडारे यांचं आयोजन करत रातोरात ठाण्यात मोठे झाले…निवडणुका हमखास जिंकू लागले. पण बदल्यात, मराठी तरुण हळूहळू कंपन्या-कारखान्यांमधून ‘कंत्राटी-गुलाम’ बनत गेले व आज स्वतःच आणि आपल्या पुढील पिढ्यापिढ्यांचं आयुष्य बरबाद करते झालेत.
खरंतरं, भारतीय संत-परंपरेतली शंभर नंबरी खणखणीत नाणी जर कुठली असतील; तर ती आहेत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, नामदेव, बसवेश्वर महाराज, चक्रधरस्वामी, नरसिंह मेहता, तुकडोजी महाराज, समर्थ रामदास, संत सावता माळी, गोरा कुंभार आदि अनेक संत शिरोमणी असे आहेत की, ज्यांच्या नावावर शंभराचीच काय हजाराची नाणी किंवा नोटा छापल्या गेल्या पाहिजेत… पण, जैन मुनींच्या बाबतीत जशी तत्परतेनं भाजपाई-संघीय सरकारची कृती होते, तशी ती होणे नाही…लक्षात घ्या की, भाजप-संघीय दुष्ट व कारस्थानी राजकारणात हा भारत देश, झपाट्याने गुजराथी-भाषिकांची खाजगी मालमत्ता बनत चालल्याचं, हे अभद्र लक्षण आहे!
…विशेष बाब म्हणजे, भारतीय संस्कृती-एकात्मता प्रसारणाच्या कामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल आचार्य विद्यासागर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, हे शंभर रुपयाचं नाणं व एक पाच रुपयाचा खास लिफाफा टपाल खात्यातर्फे प्रसारित केला गेल्याचं कुणाकडून सांगण्यात येतंय…तर, ज्यांनी या देशातली जगभरात उत्तुंग असलेली अशी सहिष्णू भारतीय आध्यात्मिक-परंपरा आणि देशाची एकात्मता, याला आपली राजकीय-दुकानदारी धो धो सुरु रहावी म्हणून ‘सुरुंग’ लावलाय, त्यांच्याकडूनच!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)