‘कंत्राटी-कामगार पद्धती’तून ‘काळी कामगार-संहिता’…

आम्ही ‘मनुस्मृती’ जाळली आणि मग, महामानवाची जयंती-मयंती साजरी करण्यात मग्न झालो…आम्ही ‘कामगार’ म्हणून ‘वेतन-बोनस’च्या मर्यादित रिंगणात गरगर फिरायला लागलो आणि अलगद ‘कंत्राटी-कामगार पद्धती’च्या चक्रव्यूहात अडकलो!
…आणि, तिकडे ते, हाती अर्धवट जळालेली ‘मनुस्मृती’ घेऊन अचूकपणे-अथकपणे काम करत राहिले…तळागाळातल्या लोकांना पुन्हा मुठभरांच्या वर्णवर्चस्ववादी सापळ्यात अडकवण्यासाठी!
…फक्त, फरक एवढाच की, यावेळेस त्या मनुस्मृतीच्या पानोपानी ‘भांडवली-व्यवस्थे’चे काळेकुट्ट रंग भरलेले होते आणि त्यावर आवरण मात्र ‘चंदेरी’ होतं…पुतनामावशीच्या प्रेमानं भिजलेल्या शब्दांच्या ‘मायाजाला’च!

“आगीतून फुफाट्यात”, तसं…’कंत्राटी-कामगार पद्धती’तून ‘काळी कामगार-संहिता’…आणि आता, त्यातून पुढे, पुरातन काळातील ‘मनुस्मृती’, याज्ञवल्क्यस्मृती, नारदस्मृती, शुक्रनिती आणि अर्थनिती वगैरे वर्णवर्चस्ववादी-आचारसंहितांच्या पावलावर पाऊल टाकत, लादली जाऊ पहाणारी भाजप-संघीय “श्रम शक्ति निती-२०२५” (Shram Shakti Niti-2025) येऊ घातलीय…!!!
…ही एक प्रतिगामी वाटचाल आहे, जी कामगार-कर्मचारीवर्गाला अंधारयुगाच्या खाईत घेऊन जाईल…कार्यालयीन कामकाजात व बाहेरच्या जगात, संबंधित प्रत्येकाच्या हालचालीवर सरकारची कडक नजर राहील, त्यांच्यावर सरकारची कडक निगराणी असेल…कामगार वा नागरिक म्हणून असलेले लोकशाहीहक्क व व्यक्तिस्वातंत्र्य, यावर पूर्णतया गदा आलेली असेल; कामगारांच्या हिताविरुद्ध भाजप-संघाने पुकारलेलं ते एक नवं युद्धच असेल!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)