आता तत्पूर्वीच्या घटनाक्रमाची तर्कसंगत मांडणी करुन पाहूया….
** बिहारच्या विधानसभा-निवडणुकीवर ‘गुजराथी-लाॅबी’चा, दिल्लीतला खुंटा बळकट होणं वा उखडला जाणं अवलंबून असल्याची जनमानसात चर्चा….
** बिहारच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची लक्षणीय वाढलेली टक्केवारी, ‘बीजेपी NDA आघाडीचं पतन मतपेटीत जवळपास बंद करुन ठेवतं….
** आज बिहारमध्ये दुसर्या टप्प्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण मतदान….
** पहेलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांचा शोध अजून संपलेला नाहीच (मधल्या काळात, कोणाला तरी ‘गिर्हाईक’ बनवून, त्या अतिरेक्यांना पकडल्या गेल्याच्या दाव्याची समाजमाध्यमातून एकच चर्चा)….
** दिवंगत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक, यांच्या ‘पुलवामा’ हत्याकांडाबाबतच्या ‘सत्यकथना’चं, जनतेला या निमित्ताने पुन्हा ओघानेच स्मरण होणं….
** काश्मीरच्या पहेलगाम हल्ल्यात ‘धर्मा’ची पृच्छा करत गोळ्या झाडल्याची वदंता; तर, दिल्ली-स्फोटातील मूळ कार-मालक मुस्लिम असल्याचा दावा….
(कोणी कसे, कुठले निष्कर्ष काढायचे; ते आपण सुजाण जनतेवरच सोपवूया आणि विषय संपवूया….)
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

