भांडवलदारवर्गाकडून ‘मालामाल’ होणारी व थेट त्यांची ‘दलाल’ असलेली, भाजप-संघीय ‘गुजराथी-लाॅबी’ व एकूणच त्यांची NDA आघाडी… “४ काळ्या कामगार-संहिता (Black Labour-Codes)” लादण्यासाठी २१ नोव्हेंबर हाच दिवस का निवडते…???*
‘कंत्राटी-कामगार पद्धती’तल्या गुलामगिरी व नव-अस्पृश्यतेनं महाराष्ट्रातला मराठी-कामगार ग्रासलेला असतानाच…’मराठी-मस्तका’वर अंतिम प्रहार करण्यासाठी व त्यांचं जितंजागतं ‘माणूसपण’ कायमचं संपवण्यासाठीच (“The last nail in the coffin”)…”४ काळ्या कामगार-संहिता (Black Labour-Codes)” लादली जातेय, हे सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे… ‘गोदी-मिडीया’तल्या भूलथापांवर अजिबात फसू नका…त्यांचे सगळेच ‘मालक’ गुजराथी-भांडवलदार आहेत!
…मग, त्या लादण्यासाठी २१ नोव्हेंबरचा ‘हुतात्मा-दिन’च का निवडला जातो; तर, तमाम मराठीजनांना, अत्यंत तीव्र स्वरुपाच्या मानसिक यातना देण्यासाठीच, हे आम्ही कधि समजून घेणार? यादिवशीच, “मुंबईसह संयुक्त-महाराष्ट्र” आंदोलन पेटलं व त्या आंदोलनातील १०६ हुतात्म्यांनीच आपल्या बलिदानातून महाराष्ट्राला, त्याच्या हक्काची मुंबई, मोरारजींच्या ‘गुजराथ’कडून हिसकावून मिळवून दिली होती. लक्षात घ्या, त्यापैकी ८५ हुतात्मे, हे ‘गिरणी-कामगार’ होते…त्या सगळ्या घटनाक्रमाचाच ‘खुन्नस’ काढायचा म्हणूनच या कामगारविरोधी कारस्थानी कृत्यासाठी ‘हुतात्मा-दिन’ निवडला गेला!
मराठी-माणूस, म्हणजे मुख्यतः ‘मराठी-कामगार’च! तेव्हा, या “४ काळ्या कामगार-संहिता (Black Labour-Codes)” जर, उखडून फेकून देण्याबाबत, जो ‘मराठी-नेता’ अभिवचन देणार नाही (प्रत्यक्षात, ते ‘ब्र’ तरी काढतायत का, ते पाहूया)…तो ‘मराठी-नेता’, हा नेता नसून राजकारणातला ‘अभिनेता’ आहे, हे खुशाल समजा!
“४ काळ्या कामगार-संहिता (Black Labour-Codes)” आता लादल्या गेल्याने काय काय उत्पात होतील, याची अगदी थोडक्यात मांडणी करुया….
* कायम नोकऱ्या, आता कायमच्या संपणार; म्हणजे, *नोकरीत ‘कायम’ असण्यानं आयुष्यात जे थोडंबहुत स्थैर्य व सुरक्षितता होती, ती कायमची गेलीच समजा… तेव्हा, लग्न करुन संसार थाटणं, ही एक ‘लक्झरी’ बाब बनेल, तेव्हा, विवाहवेदीवर चढण्यापूर्वीच एकदम सावधान आणि अगदी हिंमत करुन लग्न केलंतच…तर, मुलं जन्माला घालताना ‘डबल सावधान’; थोडक्यात, ‘कुटुंब-नियोजना’चा भाजप-संघीय सरकारने निवडलेला एक मार्गच…आणि, यांचे भोंदू संत-महंत आणि यांचे ते मोहन भागवत “तीनपेक्षा अधिक मुलं जन्माला घालायला सांगतायत”, मोठी अजबच गोष्ट आहे! स्वतः ‘अविवाहित’ असलेल्या ‘त्यांना’ विचारा, ही तुमच्या म्हणण्यानुसार मुसलमानांशी स्पर्धा करत, आम्ही पैदा केलेली ढीगभर पोरं…पोसायची कशी आणि त्यांना वाढवायची तरी कशी?
** कायम नोकऱ्यांसोबतच काॅरपोरेटीय क्षेत्रातील ‘कामगार-चळवळ’ हळूहळू संपणार…त्यातून संपासारखे संघर्ष, अगदी ‘अपवाद’ म्हणूनच, क्वचित कधि यशस्वी ठरणार
* ‘गिग-वर्कर्स्’ (Gig-Workers) वगैरे गोंडस संज्ञा वापरणारे, हे *भाजप-संघीय भांडवलदार लोक प्रत्यक्षात, सगळ्याच कामगारांना ”पिग-वर्कर्स्” (Pig-Workers) बनवणार
* नोकरीचा कालावधी अनिश्चित म्हणजेच, *नोकरी टिकते की, नाही याची टांगती तलवार… त्यात भरीसभर म्हणून पगारासंदर्भात, कामगार-संघटनांच्या मोठ्या पगार व बोनसवाढीच्या संघटित-करारांसोबत (जे आता होणं, फारच कर्मकठीण) “वैयक्तिक-करारांचं कारस्थान” (सुरुवातीला त्यासाठी ‘लालूच’ दाखवतीलच, जशी ती मागे पत्रकारांना दाखवली गेली होती) रचलेले असल्यामुळे, काॅर्पोरेटीय क्षेत्रात सगळीकडे, हे नवे ”पिग-वर्कर्स्” (Pig-Workers) कंपनीत प्रचंड दहशतीत वावरताना दिसतील व व्यवस्थापनाने (Management) फेकलेल्या पगाराच्या तुकड्यांवर… उकिरड्यावर चरणाऱ्या डुकरांसारखेच आपल्या ‘थोटक्या’ शेपट्या हलवत ‘चरताना’ दिसतील
* ‘हायर अँड फायर’ धोरण राबवायची एवढीच हौस आहे; तर, *पाश्चात्य देशातलं वेतन, तिथली सामाजिक-सुरक्षा आणि ‘अनुचित कामगार प्रथां’साठी (Unfair Labour Practices) व्यवस्थापकांना ३ वर्षांच्या तुरुंगवासासह व्यक्तिगतरित्या फार मोठ्या आर्थिक-दंडाची तरतूदी आणाच…शिवाय, सोबत तिथल्याप्रमाणे कंपनीलाही जबरदस्त भुर्दंड भरायला लावा; यामुळे, कोण कुठला भांडवलदार, भारतातून (मुख्य म्हणजे, महाराष्ट्रातून) ‘भांडवल’ काढून पळून जाईल, ही फालतू व भंकस भिती घालणं, साफ बंद करा…असले ‘भगोडे व लुच्चे-लुटारु भांडवलदार’ पळून गेलेलेच बरे, आम्ही शोषित-अपमानित काॅर्पोरेटीय जीणं जगण्यापेक्षा, प्रसंगी शेती करुन झाडपाला खाऊन जगू!
** ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरुद्ध लढण्यासाठी जे काही उरलेसुरले (खरंतरं, अगदीच बोथट स्वरुपाचे व वर्षानुवर्ष रेंगाळणारे) कायदेशीर वा न्यायालयीन मार्ग, आता जवळपास पूर्ण बंद होणार
** ले-ऑफ (कामबंदी), कामगार-कपात आणि कंपनी बंद केली जाणं…अगदीच सुलभ होणार. याकामी लागणारी १०० हून अधिक कामगारांची अट काढून टाकून ती ३०० वर नेल्यामुळे ७०% कामगार-कर्मचारी बाधित होणार
* क्षुद्र वा क्षुल्लक कारणांसाठी ‘कामगार-संघटनां’ची नोंदणी रद्द केली जाण्याच्या भयंकर तरतुदीमुळे *’कामगार-चळवळ’, ही ‘कामगार’ नावाच्या गांडुळांची ‘वळवळ’ बनवण्याचा शकुनी-डावपेच
…चला तर, ‘हिंदुत्वा’च्या नावाखाली, या ढोंगी-बदमाष हिंदुत्ववाद्यांना…याहीपुढे, असंच ‘मतदान’ करुया आणि आपली उरलीसुरली इभ्रत व जगण्याची पत, गाव-शहरांच्या वेशीबाहेर टांगूया…त्यांच्या लेखी, आपली तेवढीच लायकी आहे आणि ते त्यांचं म्हणणं योग्यच आहे, हे ‘कामगार’ म्हणून आपण पुन्हा पुन्हा सिद्ध करत राहूया…हाच, आपल्याला कळलेला-उमगलेला ‘कामगारधर्म’ होय!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)
संपर्क : समीर चव्हाण (सचिव) 7045002275

