…चोरानेच चोर चोर म्हणून बोंब मारायची??

मराठी-माणसांसाठी म्हणून खास काढलेल्या, ज्या ज्या पक्षांनी….
१) आपल्याच मराठी-जमातीची ‘माती’ खाताना संपफोडेगिरी करत, गुज्जू-भांडवलदारांकडून आयती मलई खाल्ली,
२) कंत्राटी-कामगारांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी…’कंत्राटी-कामगार पद्धती’च्या माध्यमातून अगदी ‘स्वस्ता’तल्या उत्तर-भारतीय भैय्यांना महाराष्ट्रात रान मोकळं केलं,
३) भांडवलदारांच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्या ‘बटीक’ असलेल्या युनियन्स चालवल्या,
४) मराठी-कामगारांशी छुपी दुश्मनी; पण, गुज्जू-भांडवलदारांशी खास ‘दोस्ताना’ (अंबानी-अदानींसारख्यांचे खास ‘दोस्ताद’ कोण, ते नीट पारखून घ्या) राखला,
५) ग्रामीण व शहरी मराठी-तरुणाईला सार्वजनिक पूजा-गणेशोत्सव, दहीहंड्या, गरबे, महापुरुषांच्या जयंत्या-मयंत्या, क्रिकेटसारखे खेळ-महोत्सव…यांच्या फाजिल-उत्सवप्रियतेत अडकवून त्यांचं भविष्य बरबाद केलं,

…त्यांनीच, आपल्या व आपल्या बगलबच्च्यांच्या आर्थिक व अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी ‘मुं.ठा.पु.रा.ना.’ (मुंबई, ठाणे, पुणे, रायगड-रत्नागिरी, नाशिक-नागपूर) शहरांमधला ‘मराठी-टक्का’ खुशाल घटू दिला; आणि, आता तो तसा घटला म्हणून, त्यांनीच बोंबाबोंब करायची?
…चोरानेच चोर चोर म्हणून बोंब मारायची??

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)