रामायणकालीन सत्यवचनी-न्यायी रामाने, अत्याचारी ‘रावणा’ला संपवलं; मात्र, आज कलियुगकालीन भाजप-संघीय ‘रावण’, रामाला भर बाजारात विकायला व त्यातून संपवायला निघालेत!
रामभक्तांच्या घोर फसवणुकीला सुरुवात मंदिर बांधण्यापासूनच नव्हे; तर, त्याअगोदर कित्येक वर्षांपूर्वी, वात्सल्यपूर्ण “जय सियाराम” याऐवजी, ‘भाजप-संघ’प्रणित “जय श्रीराम”चे उग्र-बनावट हाकारे…”मंदिर वहीं बनवायेंगे”च्या सोबतीनं दिले जायला लागले आणि त्याकामी, मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई (ज्यांची, या ‘कर्तृत्त्वा’ची बक्षिशी म्हणून, कार्यालयीन महिलेच्या लैंगिक-शोषणाच्या गंभीर आरोपातून ‘बाइज्जत’ सुटका करण्यात आली), कट्टर संघीय असलेले न्या. शरद बोबडे व न्या. डी. वाय. चंद्रचूड…या अशा ‘ज्युडिशियल गँग’ने सर्वोच्च न्यायालयीन निकालातून राममंदिर-उभारणीचा रस्ता प्रशस्त केला; तेव्हापासूनच, या भयंकर फसवणुकीला सुरुवात झाली होती!
डोळ्यावर बेगडी ‘हिंदुत्वा’चं कातडं ओढून बसलेल्या तमाम भोळ्याभाबड्या व अंधश्रद्धाळू भारतीय जनतेला…आपल्याला लुटण्याचे भाजप-संघीयांचे, हे वंशपरंपरागतरित्या चालत आलेले बदमाषीपूर्ण डावपेच आकळणं; तसं फारच कठीणकर्म होतं आणि झालंही तसंच. परिणामतः, शंकराचार्यांना डावलून संघप्रमुखांना व संघिय-पिट्टूंना राममंदिराच्या उरावर बसवून, चटावरचं श्राद्ध उरकावं, एवढ्या घाईघाईत अर्धवट बांधलेल्या राममंदिराचं उद्घाटन करण्यात आलं…आणि, त्यानंतर सुरु झाला, फसवणुकीचा अंतिम व निरंतन चालू शकणारा टप्पा; म्हणजेच, दररोज गोळा केल्या जात असलेल्या करोडो रुपयांच्या देणगीवरच हात मारणे! थोडक्यात, “कुंपणच शेत खायला लागलं” आणि आजच्या घडीला खालेल्या कुंपणाची किंमत, अंदाजे ५००० कोटी रुपये भरल्याचं समजतं… ॥ जय श्रीराम ॥
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)
—————————–

