तेव्हाही तेच दिल्ली पोलिस, आजही तेच दिल्ली पोलिस

“तेव्हाही तेच दिल्ली पोलिस, आजही तेच दिल्ली पोलिस…फरक इतकाच की, तेव्हा योग-प्राणायाम-आयुर्वेदाचा धंदा करणारा ‘रामदेवबाबा’ होता आणि आज एक सामजहितैषी शास्त्रज्ञ-पर्यावरणतज्ज्ञ ‘सोनम वांगचूक’ आहे!”
…तेव्हा, भाजप-संघीय ‘दलाल’ असलेला डरपोक रामदेवबाबा, जीवाच्या भितीने बायकांची वस्त्रे लपेटून मंचावरुन खाली उडी मारुन धूम पळाला होता; तर, आज जीवाचा करार करुन, दिल्ली पोलिसांपुढे सोनम वांगचूक मरणासन्न अवस्थेत लढत राहिला…हाच फरक असतो…नेभळट, नाकाम, विद्वेषी स्वभावाच्या ढोंगी संतांमध्ये आणि खऱ्या संत-सज्जनशक्तिमध्ये! गंगामातेचं रक्षण करण्याच्या पवित्र कार्यासाठी १११ दिवस आमरण उपोषण करणारे IIT-Kanpurचे प्राध्यापक व पर्यावरणतज्ज्ञ प्रो. जी. डी. अग्रवाल (स्वामी ज्ञानस्वरुप सानंद) असेच पोलिसांशी अखेरपर्यंत लढले होते. वामी ज्ञानस्वरुप सानंद व इतर डझनावरी जाज्वल्य संतांचे; “माँ गंगा मुझे बुला रही है” असं, ‘गंगामैय्याच्या प्रेमा’चं ढोंग बेमालूम वठवणार्‍या नरेंद्र मोदी सरकारने, बिनदिक्कतपणे बळी घेतले होते…आता, पाळी आहे ती ‘सोनम वांगचूक’ यांची, एवढंच!

“सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने उचलताना पांढर्‍या चादरीचा वापर केला गेला; म्हणजे, दिल्ली पोलिस, मंचावरच्या कुणाचं लग्न लावायला आले होते की, कुणाचे अंत्यसंस्कार करायला, संघीय भटजी घेऊन गेले होते?”
…हा केवळ, “लोकशाहीचाच खून नव्हे; तर, भारतमातेवर केला गेलेला अत्याचार आहे”…तरीही, हे भाजप-संघीय लोकं तोंडाने बेशरमपणे म्हणत रहातील…”भारत माता की जय”!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)