जैन मुनी आचार्य विद्यासागर यांच्या स्मृत्यर्थ खास १०० रुपयाचे नाणे भारत सरकारतर्फे जारी करण्यात आलंय, त्यानिमित्ताने….
आचार्य विद्यासागर यांच्यासह शांतिसागर, तरुणसागर, क्षमासागर वगैरे जैन मुनिंविषयी जरुर आदर आहे, आदर असावा…काहीही हरकत नाही. पण, यांनी संख्येने अल्पसंख्य असलेल्या; मात्र, धनसंपदेनं अतिउन्मत्त झालेल्या आपल्या जमातीविरुद्ध कधि आवाज उठवलेला दिसला आपल्याला? कबुतरांना दाणे खिलवणारी; पण, गोरगरीबांच्या पुढ्यातलं ताट हिसकावून घेणारी…ही जी, या शोषक-जमातीची घृणास्पद धन-लालसा आहे, तिचा उघड निषेध केलाय कधि यांनी?? …तोंडाने एकीकडे […]