कंत्राटी कामगार पद्धत

“सौ सुनार (गिरीश कुबेर) की, एक लुहार (धर्मराज्य) की….”

मी स्वतः चुकूनही ‘लोकसत्ता’ वाचत नाही…पण, काॅ. उदय चौधरींचा फोन आला आणि त्यांनी ते, कामगारघातकी व भांडवलदारवर्गाचे छुपे हस्तक असलेल्या, गिरीश कुबेरांच्या लोकसत्तेचं (सोमवार, दि. २४ नोव्हेंबर-२०२५चं) ‘संपादकीय’ वाचून, त्यावर मीच प्रतिक्रिया लिहावी…असा, प्रेमळ हक्काने खूपच आग्रह केल्यावर, मी सरसावून पत्रकारितेतल्या या ‘नटवरलाल’चं संपादकीय शोधायला लागलो (ते त्यांनीच लिहीलेलं असावं वा कुणाला तरी तसं सूचित […]

“सौ सुनार (गिरीश कुबेर) की, एक लुहार (धर्मराज्य) की….” Read More »

“‘कंत्राटी पद्धत’ आणि ‘काळी कामगार-संहिता’ : कामगारवर्गाविरुद्धच्या नव्या गुलामगिरीचे शस्त्र!”

‘मतचोरी’तून सत्ता बळकावणारी BJP-RSS अभद्र युती; केवळ, कष्टकरी शेतकऱ्यांचीच नव्हे; तर, देशातल्या कामगार-कर्मचारीवर्गाचीही नंबर एकची शत्रू आहे…त्यांच्याकरवी, देशात ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ व ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour-Code) यांचा ‘बुलडोझर’ फिरवला जाण्यातून व समस्त कामगारवर्ग ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यते’च्या अंधारयुगात ढकलला जाण्यातून, ते क्षणोक्षणी दृग्गोचर होतयंच! एवढंच काय, आता अत्युच्चशिक्षित डाॅक्टर वर्ग (विशेषतः, काॅर्पोरेट-हाॅस्पिटल्समधील) व काॅर्पोरेटीय तंत्रज्ञ वर्ग (इंजिनिअर्स)

“‘कंत्राटी पद्धत’ आणि ‘काळी कामगार-संहिता’ : कामगारवर्गाविरुद्धच्या नव्या गुलामगिरीचे शस्त्र!” Read More »