शनिवार, दि. १० ऑगस्ट-२०२४ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या, ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथील कार्यक्रमाप्रसंगी, काही ‘राज’कीय-समाजकंटकांनी जो काही धिंगाणा घातला, त्यावर ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांचे परखड भाष्य…
गुजराथी-भाषिक बड्या भांडवलदारांसमोर ‘ब्र’ काढण्याची आणि ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधातला ‘क’ काढण्याची हिंमत नसलेल्या…तकलादू, डरपोक मराठी-राजकारण्यांनी राणाभीमदेवी थाटात गर्जना करण्याचे, धमकावण्याचे आणि ‘राडा-संस्कृती’च्या नादाने पोलिस-केसेस अंगावर घ्यायला लावून…मराठी तरुण पिढ्या न् पिढ्या बरबाद करण्याचे ‘राजकीय-धंदे’, आतातरी आवरते घ्यावेत…!!! ————————— “भितीपोटी गर्भगळीत झालेले विरोधी पक्ष नेते आणि ‘लोकशाही-देवते’चं सत्ताधाऱ्यांकडून झालेलं ‘अपहरण’ आणि ‘वस्त्रहरण’ पाहून गोंधळलेली-धास्तावलेली जनता”, हे जगाच्या […]