‘गौतम अदानी’ नावाच्या ‘पोपटा’तच, भारताच्या ‘शहेनशहा’चा आत्मा किंवा प्राण दडलेला आहे…

विविध कामगार-संघटना आणि ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन गेली दोनतीन दशके आम्ही सातत्याने, ‘खाउजा’ (खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) धोरणापश्चातच्या आधुनिक रक्तपिपासू-शोषक भांडवली-व्यवस्थेच्या (Vampire-State System) ‘बकासुराचा प्राण’… ‘कंत्राटी-कामगार पद्धत, आऊटसोर्सिग’ सारख्या अमानुष-घृणास्पद शोषण करणाऱ्या, भांडवली-गुहेमध्ये दडलेल्या ‘पिंजऱ्यातील पोपटा’त आहे... अशी मांडणी करीत आलेलो आहोत!

‘नफ़रत छोड़ो, भारत जोड़ो’चे प्रणेते व ‘भाजपा-संघ’कृत “विद्वेषी बाजारात प्रेमाचं दुकान” उघडणारे व अन्याय-अत्याचार-शोषणाग्रस्त जनसामान्यांच्या भळभळत्या जखमांवर हळुवार प्रेमाची फुंकर घालणारे, राहुल गांधी जेव्हा, हेच प्रतिक वापरतात, तेव्हा त्याचं ‘धर्मराज्य पक्षा’ला फार मोठं अप्रूप वाटणं, स्वाभाविकच आहे…

“परदेशातला काळा पैसा बेकायदेशीररित्या भारतात आणणे (Money Laundering), कोळसा-घोटाळा, कृत्रिमरीत्या शेअर्सच्या किंमती वाढवणं, SEBI/ED/IT/DRI/CBI सारख्या सरकारी-यंत्रणांवर बेकायदेशीर दबाव टाकणे, विरोधी राजकीय नेत्यांना धमकावणे अथवा लाच देण्याचा प्रयत्न करणे आणि ताजा आरोप म्हणजे, परदेशातील बेनामी कंपन्यांमधील पैसा आपल्या उद्योगसमूहात लावणे”… असे एकेक भयंकर मोठे आरोप असणाऱ्या ‘गौतम अदानी’ नावाच्या ‘पोपटा’तच, भारताच्या ‘शहेनशहा’चा आत्मा किंवा प्राण दडलेला आहे”… हे राहुल गांधी यांनी, नुकत्याच पार पडलेल्या त्यांच्या पत्रकार-परिषदेत जाहीर केलं…त्याबाबतचं, समाजमाध्यमातील अत्यंत बोलकं व विलक्षण प्रभावी ‘अक्षरचित्र’, समाजमाध्यमांप्रति आभार व्यक्त करुन वाचकांप्रति सादर…!!!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)