“रामलीला मैदान… रावणांच थैमान !!!” ४ जूनची उत्तररात्र काळी रात्र

ऐ प्रजा, ये कैसी निर्बलता… कैसी लाचारी है?

स्वार्थपूर्ण षडयंत्रोसे क्यूँ तू हारी है ?

आनेवाली नस्ल को, क्या जबाब देंगे हम ?

निर्बलता… ना सिर्फ देशद्रोह, ये सरासर मक्कारी है !!

ब्रिटीश भारतातून गेले… सत्ताधान्याच्या त्वचेचा फक्त रंग बदलला. पण वृत्ती तिच राहिली, तिचा ‘पोत’ उलट अधिक गडद झाला!

परकीय ब्रिटीश परवडले, पण स्वकीय ब्रिटीश कितीतरी अधिक घातक! कारण परकीय ब्रिटीशांना निदान काही चाड होती, आताच्या राज्यकत्यांना मात्र भ्रष्टाचार अत्याचार-शोषण करताना कसलीही मीडभाड राहिलेली नाही. सी.एम्. ट्रैक्लीन या ब्रिटीश राजकीय विश्लेषकाने भारतात ब्रिटीशांना १५० वर्षांहूनही अधिक काळ सत्ता कशी गाजवता आली, याबाबत विश्लेषण करताना म्हटल्स्य की “त्याच प्रमुख कारण ब्रिटीशांकडे किमान काही ‘विश्वासार्हता’ होती आणि ब्रिटीश प्रशासनाने जरी भारतीय संसाधनांची लूटमार केली, तरी ते भ्रष्ट कधिही नव्हते”.

या पार्श्वभूमिवर आजच्या भारतीय राज्यव्यवस्थेच-प्रशासनाच-न्यायव्यवस्थेचं चित्र पाहील, तर काय दिसतं? विश्वासार्हता रसातळाला आणि भ्रष्टाचार पोहोचला आभाळाला !” भारतातील उद्योगपती व्यापारी किती अतिप्रचंड पैसा कमावतायत, हे जेव्हा भारतीय राजकारण्यांच्या लक्षात आल (नोकरशाहीच्या पूर्वीच ध्यानात आलं होतं आणि त्याप्रमाणात ते मोठ्यामात्रेनं वाहत्या गंगेत हात धुवून घेत होतेच!) तेव्हा राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या रकमांचे आकडे ६५ कोटींवरून (बोफोर्स तोफ घोटाळा) एकदम ‘हनुमान उडी घेत ६५० कोटी ६५०० कोटी किंवा ६५,००० कोटीच नव्हे, तर दोन-चार लाख कोटींच्या घरात काँध पोहोचले ते सर्वसामान्य जनतेला समजल देखील नाही….

त्यामुळे भारतीय सामाजिक व राजकीय स्थिती अत्यंत स्फोटक अवस्थेत जाऊन पोहोचलीय. आशियाई विकास बँकैन (ADB) वर्ष २००९ मध्ये पुढील तीस वर्षांच्या (२००९-२०३९) च्या अहवालात याबाबत तीव्र चिंता व्यक्त करून म्हटलय की, मोजक्या राजकीय व औद्योगिक घराण्यांच्या हातात अमाप व अनिर्बंध सत्ता (Oligarchic Structure) गेल्यानं, कुठल्याही क्षणी जनतेच्या संतापाचा उद्रेक होऊ शकतो आणि अशातहेचा उद्रेक एकदा निर्माण झाला की, त्यावर ताबा मिळवण केवळ अशक्य बनेलं !” भारतीय राजकारणाचा जो सुप्त प्रवाह आहे. तो अधिकच घातक आहे…ज्यात वेगवेगळ्या रंगढंगांच्या राजकीय पक्षाच्या ध्वजाचं सम्मीलन होऊन एकब ‘वर्णपट तयार होताना दिसतोय!… आणि त्यात फक्त एकमेकांचे आर्थिक हितसंबंध व राजकीय लागेबांधे सांभाळणार, एक नवचे विनाशकारी राजकीय रसायन’ तयार होताना सर्वत्र दिसतय !

भारतीय जनतेच, स्वातंत्र्यपूर्व काळात आंदोलक नेतेमंडळीकडे डोळे लावून बसण, सहज समजून घेता येतं, कारण तेव्हा एकतर अज्ञानाचं थैमान होत आणि राजकीय स्वातंत्र्याच्या अभावानं तेव्हा ‘लोकशाही’ अस्तित्वात असण्याचा प्रश्नच नव्हता ! मात्र आता स्वातंत्र्याची ६३ वर्षे उलटून गेल्यानंतर शिक्षणाचा खेडोपाडी प्रसार झाल्यानंतर तसेच ५०-६० वर्षे विविध निवडणूकांमधून स्वतंत्र नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही …आम जनतेची सतत नेत्यांची खादे शोधण्याची पांगळी सवय सुटू नये, हे लोकशाहीचं व शिक्षणपध्दतीच अपयश समजून घेणं मोठं कर्मकठीण आहे.

यदायदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत…….” भगवद्गीतेत श्रीकृष्णान सांगितलेल्या या सूत्रानुसार अधर्म माजल्यानंतर ज्याप्रमाणे संत-सज्जनांच रक्षण करण्यासाठी परमेश्वर अवताराच्या रुपात धाऊन येतो. तद्वतचे लोकशाहीला ग्लानी आल्यानंतर किवा तिला अन्याय-भ्रष्टाचाराच्या ग्रहणाने ग्रासल्यानंतर जेव्हा राजकीय नेतेच ‘लोकशाहीचे मारेकरी’ बनतात. तेव्हा देशातील अध्यात्मिक गुरुंना राजकीय प्रवाहात उतरण्याची तयारी दाखवावीच लागते. पूर्वीचे ऋषिमुनी राजकीय व्यवहारांवर ‘धर्मदण्डाचा’ अंकुश ठेऊन होते. वसिष्ठ-विश्वामित्रांसारखे ऋषिमुनी रामाला व समर्थ रामदासांसारखे गुरु शिवरायाला मार्गदर्शक म्हणून लागल्यानेच प्रजाकल्याणकारी ‘रामराज्य’ व ‘शिवराज्य’ अवतरले! आपल्या धर्मग्रंथात ‘वेन’ राजासारखा राजा, मातल्यानंतर तर राज्यातील ऋषीमुनींनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि ऋषिमंडळाच्या प्रमुखान ‘वेन’ राजाच्या ‘भृकुटी’वर अंगठा दाबून त्याचा प्राण घेतला, असा स्पष्ट उल्लेख आहे.

तेव्हा प. पू. रामदेव स्वामींच उपोषण अमानुष व हुकूमशाही प्रवृत्तिनी ४ जूनच्या उत्तररात्री उधळून लावण्याच्या धक्कादायक घटनेपश्चात तरी देशात आपापले पंथ व मठ थाटून बसलेल्या अध्यात्मिक गुरुना फार उशिर होण्याअगोदर निदान आतातरी जाग येईल ही आशा आहे. विविध धर्मपथांच्या अध्ययूँनी थेट राजकीय प्रवाहात उतरून, मैली झालेली ‘राजकीय गंगा’ शुध्द करण्याची फार मोठी गरज आहे हे कुण्या एकट्या-दुकटया अण्णा हजारे किंवा रामदेवबाबांचं धर्मकर्तव्य नव्हे… हे सद्गुरु किंवा अध्यात्मिक गुरु म्हणून समाजात मानमान्यता असणाऱ्या प्रत्येक संतमहंतांचे आयकर्तव्य आहे! शहामृगान संकट आल्यानंतर वाळूत कितीही खोलवर चोच खूपसली, तरीही येणार संकट टळत तर नाहीच, पण त्याचा बिलकुल प्रतिकार ‘न’ झाल्यान, ते अधिकच ताकदवर बनते.

या अराजकसदृश समरप्रसंगी देशातल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या सद्गुरू संतमहंतांनी मतभेद विसरून निदान भ्रष्टाचार संपविण, निवडणूक प्रक्रिया शुध्द व लोकाभिमुख करणे, ‘अर्थक्रांति-प्रतिष्ठाना’सारख्यांच्या क्रांतिकारी करसंकल्पना स्विकारून काळ्या पैशाच्या निर्मितीलाचं रोखणं, गुन्हेगारी लोकसंख्यावाढ व पर्यावरणाचा ऱ्हास रोखण… यासारख्या राष्ट्रीय व वैश्विक स्वरूपाच्या किमान सहमतीच्या कार्यक्रमावर तातडीन एकत्र येणे, ही काळाची गरज आहे!

अन्यथा या राष्ट्रातल्या क्याख्या सत्प्रवृत्तिना ‘जासरा’ शोधण्यासाठीसुध्दा एखादा ‘कोपरा’ भविष्यात शिल्लक राहणार नाही !!!

राष्ट्र को बदलने की बात चले, तो हमारी सोच को बदलना है। मौजूदा राजनैतिक पक्ष-विपक्ष करेंगे ‘जनकल्याण… यह विश्वास को बदलना है। बात सत्ता और व्यवस्था को बदलने की है, तो ‘मेरी क्या औकात’ यह नपुंसक एहसास बदलना है। धाराएँ धन-सत्ता की जो बहती यहाँ एकतरफा… बदलनी है तो, जमीन और आकाश बदलना है, राष्ट्र-विजय से पहले… घोडे और घास बदलना है !!!

राजन राजे

Facebook:- Rajan Raje E-mail: rajan.raje@yahoo.com

Website: www.rajanraje.com Mob. 9821064898