मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… या संदेशावर दिलेला प्रतिसाद

(मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… असा, एसेमेस दिल्ली-विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मला एका मराठी तरुण राजकीय कार्यकर्त्याने पाठवला….. त्याला, मी दिलेला प्रतिसाद खालीलप्रमाणे)

————————————-

या निकालानंतर, अरविंद केजरीवालांचं मोठं कौतुक व अभिनंदन, हे व्हायलाचं हवं, अगदी मोकळय़ा मनानं, याच वाद असण्याचं कारण नाही !

पण, तू म्हणतोस तसा, मी कधिही ‘अरविंद केजरीवाल’ होण्याचा विचारही मनात कदापि आणणार नाही. मी ‘राजन राजे’ आहे आणि “धर्मराज्य पक्षा”चा अध्यक्ष आहे; जो, प्रथम या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या निसर्ग-पर्यावरणाच्या “अंतिम व शाश्वत हिता”साठी काम करु पहातोयं, बस्स् ! लोकांनी मला व माझ्या पक्षाला निवडून द्यावं, म्हणून मी वेड्या वाकड्या  व अर्थपूर्ण तडजोडी, करण्याची शक्यता पूर्वी कधि नव्हती…. भविष्यातही कधि नसेल.

मी आणि केजरीवाल यात मोठा फरक आहे…. अरविंद केजरीवाल, अनेक राजकीय ‘नौटंक्या’ करु शकतात, यू-टर्न्स( कोलांटय़ाउड्या ) घेऊ शकतात, खोटं बोलू शकतात, भरमसाठ नफेबाजी व भ्रष्टाचार करणाऱयांकडून पक्षासाठी निधी उभारु शकतात… हे मी कधिच करणार नाही(त्यातूनही, कुणाला ‘धर्मराज्य’ला निधी द्यायचाच असेल, तर देणाऱ्याचा कुठलाही अंतःस्थ ‘ऍजेंडा’ आम्ही पार पाडणं, हे सर्वथैव अशक्यच नव्हे; तर, उलट तोच निधी त्याच्या गैरव्यवहारांच्या विरुद्ध कारवाई होण्यासाठी आम्ही प्रभावीपणे वापरु… हे अगदी बिनधास्त सुस्पष्ट करु !) ….. भ्रष्टाचार रोखणं आणि चांगलं प्रशासन देणं, हे ‘अरविंद केजरीवाल’ नक्की करतील. पण, मी जो काही अरविंद केजरीवालांचा जवळून अनुभव घेतलायं, तो पाहता मानवी-शोषण( श्री. अनिल बोकिलप्रणित ‘अर्थक्रांति-संकल्पना’ राबवणं, कंत्राटी कामगार-पद्धत निर्मूलन, रु.२५,०००/- किमान-वेतन हमी, नोकरीतील वाजवी सुरक्षितता, शेतमालाचे वाजवी हमी-बाजारभाव इ.) निसर्ग/पर्यावरण-संरक्षण आणि महाराष्ट्रातल्या ‘मराठी माणसा’च्या हितासाठी शंभर टक्के जाज्वल्य भूमिका पूर्णतः, ते कधिच घेणार नाही(अंशतःच घेतील !)…. कारण, शेवटी तो ‘मारवाडी’ आहे, ‘धंदेवाला’ आहे…. आणि, ही गोष्ट ते उघडपणे उद्योगपतींच्या फोरममध्ये व एरव्ही ही, ठासून सांगतातच की !

बाकी, गोष्टी भेटल्यावर सविस्तर बोलूया…. पण, सामान्य मराठी माणसासाठी जेवढी ‘शिवसेना’ व ‘मनसे’ घातक आहे, तेवढीच किंवा त्याहीपेक्षा अधिक, “आप” घातक आहे, हे कृपया कोणीही विसरता कामा नये… तेवढी सावधगिरीची सूचना मराठी-तरुणांना करणं, एवढचं लोकशाहीत आपल्या हाती असतं… दुसरं काय !!!

जय महाराष्ट्र ।  जय हिंद ।।

……राजन राजे (धर्मराज्य पक्ष)