नववर्ष-२०१६ प्रारंभी हवाईतळावरील हल्ल्याचं ‘कवित्व’…

महाराष्ट्र (मुंबई २६/११) आणि पंजाब (गुरूदासपूर आणि पठाणकोट) जर भ्रष्टाचारामुळे स्वतचचं संरक्षण करू शकणार नसतील….. तर, देशाचं संरक्षण कोण करणार ? पंजाब पोलीसदल अन्य सुरक्षा यंत्रणा जर भ्रष्टाचार अंमली पदार्थातील अनैतिक पैशापुढे अशाच झुकणार असतील तर, काय गुजराथदेशाचं संरक्षण करणार ??? ….धनदांडग्या जैनगुज्जूमारवाड्यांना पठाणकोटमध्ये बळीगेलेल्या उमद्या जवान हवाईदल अधिकाऱयांचं, दुःख कमी; पण, त्याच सुमारास मुंबईत दलाल’-स्ट्रीटवर ५८० अंशाने कोसळलेल्या शेअर बाजाराचं दुःख कितीतरी अधिक वाटलं असणार….. !!!

Narco-Terror and Pak-Terror, two sides of the same coin….. Narco-Rout and Terror-Rout, stay common !!!

मित्रहो,

१)पठाणकोट हवाईतळावर हल्ला, २) हक्कानी नेटवर्कद्वारे अफगाणिस्थानातील भारतीय दूतावासावर दहशतवादी हल्ला, ३) उत्तर-पूर्व भारतात मणिपूर-आसाममध्ये ६.७ रिश्टर-स्केलचा भूकंप आणि ४) चीनमधील मंदीमुळे शेअर बाजार कोसळणं…. या एकाच सुमारास घडलेल्या चार मोठ्या घटना ! त्यातील पहिली आपत्ती आपल्याच ‘नाकर्तेपणा’मुळे ओढवलेली… दुसरी आपल्या नियंत्रणाबाहेरची… तिसरी नैसर्गिक आपत्ती… तर चौथी, जे देश सध्या चालवतायतं, त्या धनदांडग्या गुज्जू-जैन-सिंधी-मारवाड्यांसाठी खरी व एकमेव काळजीची व चिंतेची बाब !!!

भारतीय सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टीनं पठाणकोट हवाईतळाचं फार मोठं महत्त्व यासाठी आहे की, पाकिस्तानविरूध्दच्या यापूर्वीच्या युध्दांमध्ये, या हवाईतळावरील फायटर विमानांची भूमिका निर्णायक ठरली होती व तेथे वायुसेनेची अत्यंत संवेदनशील व फार मोठी युध्दसामग्री आहे. पठाणकोट हवाईतळावरील हल्ला, हा संपूर्णपणे तपशीलवार गुप्तचर संस्थेतर्फे माहिती व प्रतिबंधक कारवाईसाठी पुरेसा अवधि मिळूनही झालेला, भारतातील पहिलावहिला मोठा दहशतवादी हल्ला ! असं असूनही त्या आगाऊ मिळालेल्या ‘गुप्तचर संकेतांचा’(Intelligence Inputs) पुढील प्रवास मात्र, अत्यंत धक्कादायकरित्या संथगतीचा व त्यावरील प्रतिसाद बेपर्वाईचा होता. पठाणकोट हवाईतळावर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, अशी सुस्पष्ट व संगतवार माहिती मिळूनही पंजाब पोलीसदलाकडून व संबंधित सुरक्षा यंत्रणांकडून नोकरशाहीतील दफ्तरदिरंगाईचा व बेपर्वाईचा रेकॉर्ड होऊन सुरवातीचे महत्त्वपूर्ण २४ तासाहूनही अधिक तास वाया घालवण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील कडक बंदोबस्तामुळे व पाकिस्तानी सीमेला लागूनच असल्याने ‘सॉफ्ट टार्गेट’ बनलेल्या, या उत्तर-पश्चिम पंजाबच्या एकाच परिसरातील हा सलग पाचवा हल्ला…. आणि, तोही दोन ‘सुरक्षा कडी’ (Periferal Defences) भेदून, पन्नास हजाराची फौज तिथे केव्हाही तैनात असताना, भारताच्या संरक्षण सिध्दतेच्या दृष्टीनं, त्याच्या ‘मर्मस्थळा’वर झालेला…. काही दिवसांपूर्वीच डिसेंबरमध्ये, अफगाणिस्थानातून परतताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची कराचीत, तथाकथित “अनपेक्षित, अचानक व आश्चर्यकारक” भेट घेतली…. त्याची पूर्वतयारी दिल्ली व इस्लामाबादमध्ये चालू असतानाच, पाकव्याप्त काश्मीरमध्ये या हल्ल्याची तयारी जोरात चालू होती. या असल्या ‘लंच वा डिनर डिप्लोमसी’च्या भेटी पूर्व नियोजनाशिवाय कधिही होत नसतात, याचं साधं व्यवहार ज्ञान नसलेल्या, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीसांपासून, सगळ्या बीजेपी व संघवाल्यांना नरेंद्र मोदींच्या हिंमतीचं आणि देशप्रेमाचं (विशेषत: सोशलमिडीयातून) अगदी भरतं आलं होतं…. पठाणकोट हवाईतळावरील दहशतवादी हल्ल्याला सहा दिवस उलटून गेल्यानंतरही, आम्ही राजनैतिकस्तरावर उघडपणे, साधं पाकिस्तानचं नांवसुध्दा घ्यायला तयार नाही… ‘पडोसी, पडोसी देश’ म्हणत आमचं साप समजून भुई थोपटणं सुरूच आहे. मग, निवडणुकीच्या वेळची आमची ५६” छाती कुठे गेली, हा सामान्य भारतीय जनतेला पडलेला प्रश्न आहे. त्यापेक्षा, “पाकिस्तानने आपल्या शिवाराच्या वळचणीत पाळलेले ‘दहशतवादी साप’ त्यांनाही डसणारच”, असं उघडपणे म्हणणारी, अमेरिकन अध्यक्षपदाची उमेदवार हिलरी क्लिंटन बाई, नरेंद्र मोदींच्या तुलनेत खूपच उजवी ठरते. लोकसभा निवडणुकीदरम्यान, “ना आँख झुकाकर… ना आँख दिखाकर… आँख से आँख मिलाकर, अगर अपने पडोसींयो की नजर से हम गजर मिलायेंगे, तोही सब ठीक होनेवाला है”, असं छाती ठोकून… छाती फुगवून नरेंद्र मोदी सांगत होते… काय ‘ठीक’ झालं ? …मग, आता पंतप्रधान पदावर एकहाती बहुमत घेऊन बसलेलं असताना, आता का ‘नजर चुकवली जातेय… झुकवली जातेय’ ?? …संसदेवरचा ‘जैश मोहम्मद’चा असफाक अहमद, मसूद अझर, अफझल गुरूचा हल्ला किंवा मुंबईतला ‘दाऊद कनेक्शन’ असलेला ‘कसाब’चा हल्लासुध्दा ‘चिल्लर’ वाटावा; एवढा अत्यंत बिनधास्त व बेधडक हल्ला नरेंद्र मोदीच्या काळात एकदा नव्हे, दोनदा झालायं (पाक सीमेवर चकमकीत जवान शहीद होणं, ही तर नित्याचीच बाब आहे). गुरूदासपूर नंतर काही काळातच दोन हजार एकर परिसरातील कडेकोट बंदोबस्ताच्या, थेट पठाणकोट हवाईतळावर हल्ला होणं, म्हणजे “भारताच्या हृदयातूनच सुईच नव्हे तर, ‘पराणी’ आरपार जाणं आहे”… प्रश्न केवळ किती जवान शहीद झाले वा कितीजण मेले, हा नसून थेट हवाईतळावर हल्ला होणं, ही देशाच्या संरक्षण सिध्दतेची लाज चव्हाट्यावर येणं आहे. सहा अतिरेकी सहा दिवस. अख्खा लष्करीहवाईतळ ओलिस ठेवतात… यापेक्षा अधिक लाजिरवाणं काय असू शकतं ?… ते काही मुंबईचं ‘ताज इंटरनॅशनल हॉटेल’ नव्हतं…. तो होता भारतीय वायुसेनेचा तळ ! मनमोहनसिंगांचं काँग्रेस सरकार है, ‘बिर्याणी डिप्लोमसी व फ्लीपफ्लॉप पॉलिसी’वालं कमजोर सरकार, अशी खरमरीत टीका करणारे आता कुठे आहेत ?? …की, युती सरकारपेक्षा जरा वेगळी असलेली अशी फक्त, परराष्ट्र धोरणात थोडी नाट्यमयता आणली व पायाला भिंगरी बांधून परदेशवाऱ्यां केल्या की झालं, असा यांनी गोड गैरसमज करून घेतलायं ???

या संपूर्ण पठाणकोट हल्ला प्रकरणात अनेक कच्चे दुवे व अनेक संशयास्पद बाबी आहेत. पंजाब पोलीस स्वत:च्याच, दहशतवाद्यांकरवी अपहरण होऊन ‘नाट्यमय’ सुटका झालेल्या, सुपरिटेंडंट सलविंदर सिंगवर अविश्वास दाखवतात काय…. तो ही प्राणी, अगदी दहशतवाद्यांना हव्या त्याच मोक्याच्या ठिकाणी स्वत:च्या निळ्या दिव्याच्या गाडीतून पुरेशा संरक्षणाअभवी भेटतो काय…. फारशी मोठी इजा न होता तो पंजाब पोलीस सुपरिटेंडंट दहशतवाद्यांकडून मोकळा सोडला जातो….. तिथून जवळपास २० तासाहूनही अधिककाळ त्याची गाडी दहशतवाद्यांना घेऊन अनेक सुरक्षा कडी व सुरक्षा अडथळे ओलांडत छान फिरत रहाते… गाडीतले लष्करी गणवेशातले अतिरेकी पर्यटनाला आल्यासारखे ३० किमीहून अधिक अंतर मोकळे फिरतात….. पोलिसांच्या गाडीत, हे लष्करी गणवेषातले लोक कसे, याचा संबंधित सुरक्षा यंत्रणेला साधा संशयही येत नाही…. पन्नास हजारावरच्या लष्कराला प्रतिहल्ल्याचा आदेश दिला जात नाही… सगळी भिस्त केवळ NSG कमांडोंवरच आणि तेही प्रथमच प्रत्यक्ष हल्ल्याअगोदर जरी पोहोचले असले; तरीही त्यांना दिल्ली-पठाणकोट हे, ४७० कि.मी.चे अंतर पार करायला २४ तासापेक्षा जास्त अवधि लागावा ? …..ही सारी, पंजाबी पोलीस ‘मस्ती’ही आहे आणि पंजाबी पोलीस ‘सस्ती’ही आहे, असं दर्शवणारी घटना आहे !

एकेकाळी वर्ष-१९८० मध्ये, पंजाबमधील पोलीस यंत्रणेची मदत, जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम दहशतवाद्यांना उध्वस्त करण्यासाठी घेतली जात होती. पण, अलिकडच्या काळात पंजाबमध्ये, सीमेपलीकडून पाकिस्तानातून येणाऱया अंमली पदार्थांचं फार मोठं असं, पंजाबी राजकारण्यांच्या हाती बक्कळ पैसा ठेवणारं, गुंतागुंतीचं रॅकेट उभं राहयलयं. आणि पंजाब पोलीसांचा त्यातील छुपा सहभाग व त्याला असलेला आशिर्वाद… यामुळेच, अंमली पदार्थ व्यवहारात उफाळलेला ‘दहशतवाद’ (Narco-Terror) आणि पाक-पुरस्कृत ‘दहशतवाद’ (Pak-Terror) या, एकाच नाण्याच्या दोन बाजू बनलेल्या आहेत. एवढचं नव्हे तर, अंमली पदार्थ वाहतुकीचे मार्ग आणि दहशतवाद्यांच्या भारतातील घुसखोरीचे मार्गही (Narco-Rout and Terror-Rout) अगदी एकसमान आहेत. त्यामुळे, या साऱ्या अतिरेकी कारवाया घडत असताना, एकतर सारी पंजाब पोलीस सुरक्षा यंत्रणा, स्वत:च ‘अंमली पदार्थ’घेऊन नव्यावर्षाची पार्टी करत झिंगलेली असावी; नाहीतर, ती यंत्रणा आरपार भ्रष्टाचारामुळे कुठल्याचं लायकीची राहीलेली नसावी….. पण तरीही, ‘पंजाबी-मस्ती’ मात्र सदैव त्यांच्या डोक्यात भिनलेली असतेच ! आता वेळच अशी आलीयं की, हे अंमली पदार्थांचं गुन्हेगारी जाळं, “पंजाब पोलीस ते पंजाब लष्कर”, इथपर्यंत तर पोहोचलेले नाही ना…. याची कसून तपासणी करावी लागेल.

यासंदर्भात, सर्वसामान्य जनतेनं आता हे ही समजून घेणं गरजेचं आहे की, रशियाचे ब्लादिमीर पुतीन असो वा पाकिस्तानचे नवाज शरीफ किंवा भारताचे नरेंद्र मोदी…. हे सारे राष्ट्रप्रमुख, एकतर स्वत: उद्योगपती आहेत किंवा उद्योगपतींचे ‘दलाल’ आहेत…. त्यांच्या आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या व्यावसायिक व आर्थिक हितसंबंधांभोवतीचं हल्लीचं जगाचं राजकारण फिरत असतं. त्यांच्या दृष्टीनं वस्तू-ऊर्जा व्यापार (उदा. तापी-गॅस पाईपलाईन प्रकल्प, अदानीसारख्या उद्योगपतींना ऊर्जा वापराची कमाल मर्यादा गाठलेल्या गुजरातमध्ये यापुढे वीज विकणं शक्य नसल्याने, स्वत:च्या खाणीतला स्वस्त कोळसा जाळून निर्माण केली जाणारी वीज, जवळच्या पाकिस्तानला निर्यात करायचीयं !) सोयीचा होण्यासाठी पावलं टाकणं महत्त्वाचं…. देशप्रेम वगैरे सगळं नंतर…. सवडीने ! लोकसंख्या, दारिद्रय आणि दहशतवाद यांनी ग्रस्त असलेल्या दक्षिणपूर्व आशियाला मोठ्या नफ्याचं (तेथील गोरगरीब लोकांचं आर्थिक उन्नयन करण्यासाठी नव्हे !)

व्यावसायिक व आर्थिक केंद्र बनवायचयं (SE Asia business hub)…. तिथल्या ‘दरिद्री नारायणां’चा कच्च्यामालासारखा ‘स्वस्त-मजूर’ म्हणून गुलामासारखा वापर करायचा आहे…. त्यासाठीच, ‘मेक इन इंडिया’चे नारे व तथाकथित अनपेक्षित व अचानक भेटींचे ‘तमाशे’ चाललेले आहेत… त्यासाठीच, हा एवढा दहशतवादी हल्ला होऊनही व पाकिस्तानातील लष्करे तोयबा, जैश मोहम्मद, तेहेरिके तालिबान सारख्या डझनावर अतिरेकी संघटनांची शिखरसंस्था असलेल्या ‘युनायटेड जिहाद कॉन्सिल’ने उघडपणे या हल्ल्याचं ‘कर्तेपण’ मिरवूनही, पाक व भारत सरकारकडून ‘आळीमिळी गुपचिळी’ सुरूच आहे. ज्या पध्दतीने, या अतिरेक्यांनी हा हल्ला चढवताना आपला शस्त्रसाठा व अन्नसाठा काळजीपूर्वक पाचसहा दिवस पुरवून वापरला, पहाटे तीनला सावधानतेची पातळी अगदी निम्नस्तरावर असताना तो हल्ला केला, सगळे अतिरेकी मेल्याचं सोंग वठवत जास्तीतजास्त प्राणहानी आणि नुकसान घडवून आणलं तसेच, शस्त्रसामग्रीवरील पाकिस्तानी बनावटीचे शिक्के पाहता…. हा हल्ला, आयएसआय (ISI) या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या आणि पाक लष्कराच्या सहकार्याने व त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणानेच झाल्याचं सूर्यप्रकाशाएवढं सुस्पष्ट झालेलं आहे. याचाच अर्थ, आपलं पाकिस्तानबाबतचं परदेश धोरण कालही फसलेलं होतं व आजही फसलेलं आहे…. अलिकडे, भारतात ‘शहा’च ‘बादशहा’ झाल्यानं, भारत ‘शांततेची बोलणी’ करण्यासंदर्भात, ‘आर्थिक-कारणां’मुळे झुकलेला आहे, हा संदेश पाकिस्तानी व्यवस्थेनं अचूक ग्रहण केला होता. म्यानमारमध्ये दहशतवादी तळांच्या गंडस्थळावर मर्मभेदी प्रहार (Surgical Attack) करून स्वतची पाठ थोपटून घेणारं मोदी सरकार, नेमकी इथेच तलवार कशी ‘म्यान’ करतं ? …मग, तुम्ही आणि काँग्रेसचं युती सरकार यात फरक तो काय राहयला ?? सीमेपलीकडून येत असलेल्या ‘संदेशां’चा अन्वयार्थ लावताना मोदी सरकार साफ तोंडघशी पडलेलं आहे…. तेही, एकहाती संसदेत मताधिक्य असूनही, ‘पाकिस्तान हे एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे’, हेच जर आम्हाला ऐकत रहायचं असेल; तर, काँग्रेसचं सरकार पण तेच तर सांगत होत…. मग, मनमोहनसिंग सरकारपेक्षा, हे मोदी सरकार वेगळं कसं ?

एकवेळ, पाकिस्तानची स्थिती समजून घेण्यासारखी तरी आहे; कारण, ते एक परावलंबी व साफ अपयशी ठरलेलं राष्ट्र (Failed State) आहे. पाक पंतप्रधान नवाज शरीफांचं फारसं नियंत्रण ना पाक लष्करावर, ना पाकिस्तानी गुप्तचरसंस्थेवर किंवा ना अतिरेक्यांवर…. तिथे, मुलकी प्रशासन-प्रमुखावर एकतर ‘कोर्ट-मार्शल’ केलं जातं (फाशी दिली गेलेले माजी पाक पंतप्रधान झुल्फिकार अलि भुतो आठवा) किंवा तिथे ‘मार्शल-लॉ’ (लष्करी-प्रशासन) तरी असतो ! पण, जगातल्या सर्वात मोठ्या व बऱ्यापैकी प्रगल्भ होत चाललेल्या ‘लोकशाही राष्ट्रा’ची, ही काय अवस्था ? कार्ल मार्क्स जे म्हणायचा, “भांडवलशहांना स्वत:चा असा कुठलाही देश वा देशनिष्ठा नसते” (Captalists have no Nation) त्यांना ‘देशप्रेम’ वगैरे असं काही खास नसतं…. असतं फक्त, धंद्यातल्या नफ्याचं ‘धनादेश-प्रेम’, हे ही यासंदर्भात जाणून घेतलं पाहिजे. ‘देशप्रेम’ वगैरे ही आपली तुणतुणी आहेत… त्यांची गाणी-तराणी वेगळी…. सगळी ‘नफ्या’भोवती ‘पिंगा’ घालणारी. आजवर सैन्यदलात किती गुजराथी-जैन-मारवाडी देशाच्या संरक्षणासाठी दाखल झालेले आहेत ?? आजवर किती वीरचक्र, परमवीरचक्र जैन-गुजराथी-मारवाड्यांनी मिळवलीयतं ??? या धनदांडग्याच्या आणि प्रस्थापित राजकारणी व गब्बर झालेल्या भ्रष्ट नोकरशहांच्या ऐय्याशीसाठी, आमच्या मराठी-पंजाबी-दक्षिण भारतीय जवानांनी वा अधिकाऱ्यांनी फुकटच मरायचं ???? नेमका हा देश, आता कोणाच्या मालकीचा झालेला आहे ?????

या अशा, सुसंघटित व शत्रू राष्ट्राकरवी पुरस्कृत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांना समर्थपणे तोंड देण्यासाठी एक प्रभावी व बलशाली अशी केंद्रीय शिखरसंस्थाच अस्तित्वात असायला हवी. पण याच, बीजेपीवाल्यांनी ‘एनसीटीसी’ (NCTC…. National Counter Terrorism Centre) या ‘संघराज्यीय संस्थे’ला (Federal Agency), ‘संघराज्यीय प्रणाली’वर हे होऊ घातलेलं आक्रमण आहे, या नसत्या टुकार मानसिकतेतून विरोध केला होता…. त्याचा, आता त्यांना पश्चाताप होत असेल. खरंतरं नोकरी-धंदे, शेतजमीन-मालमत्ता खरेदी, प्रशासन-न्यायदान-शिक्षण व्यवहार यात केवळ राज्यातील स्थानिकांनाच व स्थानिक भाषेलाच प्रथम प्राधान्य अनिवार्यपणे देणारी, पूर्णत: ‘संघराज्यीय प्रणाली’ हवीयं…. पण, तिथे सगळ्या राजकीय पक्षांचं घोडं पेंड खातं आणि महाराष्ट्रात ‘मराठी माणूस’ उत्तरोत्तर देशोधडीला लागत रहातो. मात्र, संरक्षण, आरोग्य व संशोधन क्षेत्रासंदर्भात…. पर्यावरणाला वा संघराज्यीय प्रणालीला निर्माण होणाऱ्या धोक्याचा विचार बिलकूल केला जाता कामा नये; कारण, ते आपलं ‘अस्तित्व’ टिकून रहाण्याशीच संबंधित असलेले संवेदनशील मुद्दे आहेत.

सदरहू, पठाणकोट हवाईतळावरील हल्ल्याची ‘शवचिकित्सा’ (Postmortem) करत असताना… जम्मू-काश्मीरमध्ये, पंजाबमध्येही आणि केंद्रातही ‘बीजेपी’वाले सरकारमध्ये आहेत…. केंद्रात तर, त्यांच्याकडे एकहाती मोठं बहुमत आहे…. हे विसरून चालणार नाही. म्हणून, हा हल्ला जास्तच गांभीर्यानं घ्यायला हवा. अशात-हेचे हल्ले रोखायला फार मोठी ‘आर्थिक-किंमत’ चुकवावी लागेल…. नरेंद्र मोदींभोवती कोंडाळं करून बसलेले बडे उद्योगपती-व्यापारी, हे त्यांना करू देतील काय ? …..म्हणूनच म्हणावसं वाटतं की, पठाणकोट ऑपरेशन, हे यशस्वीरित अयशस्वी ठरलेलं ऑपरेशन आहे(Pathankot Operation has failed successfully)!!!

जय महाराष्ट्र जय हिंद ।।

…राजन राजे (अध्यक्ष धर्मराज्य पक्ष)