मुंबई–ठाण्यातली (ज्या महानगरांच्या महापालिकेत दीर्घकाळ शिवसेनेची सत्ता राहीलेली आहे !) सर्वसामान्य मराठी माणसं शिवसेनेच्या भ्रष्ट–घराणेबाज व्यवहारांमुळे अक्षरश देशोधडीला लागून १० X १० च्या ‘काडेपेटी’च्या आकाराच्या अनधिकृत बांधकामात, नाईलाजापोटी जगण्याची उमेद हरवून व जगण्याची ‘कोंडी’ स्विकारत, राहयला लागलीयतं आणि शिवसेनेचे पदाधिकारी धनदांडग्या जैन–गुज्जू–मारवाड्यांचे हात हातात घेऊन सारे ’टॉवर्स“मध्ये ऐश्वर्यात राहतायतं. कोण ‘बिल्डर’ बनले… कोण झोपडीदादा… तर, कोण ‘कंत्राटदार–ठेकेदार’ ! हो, त्यातूनच नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक यांच्यासारखे ‘भस्मासूर’ही निमार्ण झाले !!!
कुठला, कधि आणि कसला ‘मूलभूत’ न्याय मिळवून दिला, शिवसेनेने सामान्य मराठी माणसांना (एक सुधीरभाऊंच्या ‘लोकाधिकार-समिती’चा सन्माननीय अपवाद वगळता !) ??? फक्त आणि फक्त, लढवय्या मराठी तरूणाईला वापरून घेत, तोंडदेखली छूपपूट कामचं शिवसेना आजवर करत आली….. कारण, ‘मराठी माणसा’ची भोळी मानसिकता सर्वश्रुत आहे. त्यांची छोटी प्रासंगिक कामं झाली; तरी, ते खूश होऊन ‘मतां’चा आशिर्वाद द्यायला एका पायावर तयार असतात ! त्यामुळेच, ‘जन–लोकपाल आंदोलन’, ‘कंत्राटी–कामगार/कर्मचारी पध्दत निर्मूलन’, ‘अर्थक्रांति–संकल्पना’, ‘निसर्ग आणि पर्यावरणस्नेही शाश्वत जीवनशैली’, ‘महाराष्ट्रात सक्तीचा मराठीचा सार्वत्रिक वापर’, मराठी–शाळा संवर्धन, ‘शिक्षण व आरोग्य सम्राटांना पायबंद घालून शिक्षण व आरोग्यसेवेचं राष्ट्रीयीकरण’, ‘सक्तीचं कुटुंब नियोजन’…. वगैरे सामान्यांच्या जगण्याच्या आसाला भिडलेल्या, अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्यांबाबत मनापासून शिवसेना कधिच कुठे नव्हती आणि भविष्यातही नसेल ! त्यांचं सगळचं राजकारण फसवं आणि वरपांगी….. ज्या, मराठी-तरुणाईच्या ‘लढवय्येपणा’च्या भांडवलावर शिवसेना वाढली…. त्या ‘लढवय्येपणा’च्या अवसानघातकी ‘स्वार्थी व अनाठायी’ वापरामुळे, आज ते ‘मराठी-लढवय्येपण’ जवळ जवळ संपुष्टात आलयं !! मुंबईत शिवसेनेच्या जन्माच्या वेळेस असणारा मराठी टक्का “सत्तरवरून घसरत सतरा’’वर आलायं !! आपल्याच हक्काच्या मातीवरील, वाडे-चाळींच्या आपुलकीच्या ऊबेतून ‘बिल्डर-लॉबी’मुळे दूर फेकला जाऊन, श्रमिक मराठी वर्ग आता अनधिकृत बांधकामांतून ‘दिवाभिता’चं जगणं जगतोयं. दादागिरीच्या बळावर, कोणी उभारल्या झोपडपट्टया ?… कोणी करोडो ‘उत्तर-भारतीयां’ना झोपड्या विकून त्यांना मुंबई-ठाण्यात ‘आश्रय’ देऊन ‘मराठी पाया’वर कु-हाड मारली ‘कु-हाडीचा दांडा गोतास काळ’ ठरत, कोण स्वत: मालामाल झाले ??? सातत्याने, ‘सार्वजनिक सण-उत्सव-सत्यनारायणपूजा-गणेशोत्सव-गरबे-दहीहंड्या-खेळ-महोत्सव’ यांची ‘अफूची मात्रा’ भोळसट मराठी जनताजनार्दनाला पाजती ठेऊन…. विनाशकारी ‘विकासा’चं गाजर दाखवून, ‘लुटी’चं राजकारण करत आपली घरचं नव्हे; तर, अक्षरश ‘कोठारं’ शिवसेनेच्या साध्या साध्या पदाधिकाऱयांनी भरली…. मग, मोठ्या पदाधिकाऱयांची काय कथा ? सच्चा आणि समान्य ‘शिवसैनिक’ आदेश-संस्कृतीला शिरसावंद्य मानत, रस्त्यावर जीव धोक्यात टाकून ‘दगड’ फेकत गेला…. आणि, या फेकलेल्या ‘दगडां’तून शिवसेनेचे मोठे नेते समृध्दीचे ‘गड’ बांधत गेले ! …..मराठी कामगारांना ’कारखाना जगला तरच, कामगार जगेल“, असं घाबरवून सोडत… एक मोठा ‘भयगंड’ त्यांच्यात निर्माण करून अख्खी कामगार चळवळ शिवसेनेनं उध्वस्त केली आणि कामगारांना, ….मालकांच्या आणि बदमाष IR/HR अधिकाऱयांच्या दावणीला बांधलं !! त्यातूनच, ’कत्राटी-कामगार/कर्मचारी पध्दती“तील गुलामगिरी व नव-अस्पृश्या फोफावली !!! कुणाला ‘पोटा’ला लावायचं ते मुळी ‘लुटा’यलाच, …ही कुठली मानसिकता ?
…जगाच्या इतिहासात कुठल्याही जाज्ज्वल्य ‘लोकनेत्या’नं आपल्या समाजाला (ज्याचं, तो नेतृत्त्व करत असतो!) किंवा अनुयायांना अशा तऱहेनं घाबरवून सोडून ‘व्यवस्थे’च्या जाळ्यात अलगद अडकवल्याचं एकही उदाहरण नाही… नव्हे, ते असूच शकत नाही !!! बाबासाहेब आंबेडकरांनी ‘सत्व, अस्तित्व व अस्मिता’ हरवून बसलेल्या बहिष्कृत ‘अस्पृश्यां’ना धीर दिला… हिंमत दिली आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते, ‘मेल्या मनां’मध्ये अथकपणे ‘तेज ओतत’ राह्यले… त्यांच्या कल्याणापलिकडे कुठलाही आणि कसलाही विचार त्यांच्या मनात कधि स्पर्शूनही गेला नाही….. ‘व्यवस्थे’च्या विरोधात (हातमिळवणी करून नव्हे !) ते पहाडासारखे आयुष्यभर ठामपणे उभे राह्यले, हा काही फार जुना इतिहास नव्हे !
आम्हीही शिवछत्रपतींच्या (ज्यांनी, तत्कालीन ‘अन्यायी व शोषक व्यवस्थे’विरोधात बंड पुकारले !) व बाबासाहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवत, गर्भगळीत झालेल्या कामगारांना उलटपक्षी, धीर व हिंमत देऊन सांगतो की, “कामगार ‘सन्मानाने जगला, तरच, कारखाना जगेल…. ’ अन्यथा नव्हे !“
जय महाराष्ट्र । जय हिंद ।।
…राजन राजे (अध्यक्ष धर्मराज्य पक्ष)