“ते आले ….. त्यांनी पाहिलं…. आणि, ते ‘टपली’ मारून गेले !!!”

(‘पठाणकोटमधील हवाईतळावरील हल्ला, हा पाकिस्तानला बदनाम करण्याचा भारताचाच कट’…..या कांगाव्यासह, भारतीय तपास पथकाला पाकिस्तानात येण्यास बंदी !)

‘ते’, म्हणजे….. “देशभक्त” भाजप आणि RSS वाल्यांचे ‘सहोदर’ असलेलं, पठाणकोट हवाईतळावरील दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी आलेलं ‘ISI प्रणित पाकिस्तानी पथक’ !

या, पठाणकोट हल्ल्याच्या वेळी आणि त्याहीपेक्षा जास्त, त्या हल्ल्यापश्चात झालेल्या ‘पाकिस्तानी-तपासकामा’नंतर जेवढी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिश उरलीसुरली इभ्रत धुळीला मिळालेली आहे; तेवढी, पं. नेहरूंचीही १९६२ च्या चिनी आक्रमणानंतर धुळीला मिळाली नव्हती…..

‘तराजू-तागडी’ हाती धरणाऱयांची, कबुतरांना दाणे घालत माणसांचं घाम-रक्त शोषणाऱयांची आणि शेअर बाजारात ‘लिधो-आपो’ करणाऱयांची फुसकाबार असलेली ‘छाती’ ही, कधिही ५६” ची असूच शकत नाही…. त्यासाठी, स्वा. सावरकर, सुभाषचंद्र बोस व ‘शिवछत्रपतीं’सारखं बावनकशी ‘क्षात्रतेज’च लागतं, हे या निमित्ताने पुन्हा एकवार अधोरेखित झालं, एवढचं !

‘नीति आणि श्रीमंती’, क्वचितच एकत्र नांदतात !! व्यापारात वजनमाप मारून आणि उद्योगात “माणूस आणि निसर्ग” यांचं अव्याहत, अनिर्बंध व टोकाचं शोषण करून….. सरकारी सवलती लाटून व सार्वजनिक बँका बुडवून ‘गब्बरसिंग’ होणारे, हे स्वतंत्र भारतातले पांढरपेशे ‘दरोडेखोर’….. आजवर, भारतीय जनतेच्या तिजोरीवर राजरोस ‘डाका’ घालतच होते; पण, आता तर आपण, समाजातल्या १ टक्के उच्चभ्रू वर्गासाठी(Leading to……Crony-Capitalism, Oligorchic-Structure and Vampire-State) फुलणाऱया ‘कमळा’वर आणि ‘मराठी छाती’चाच वेध घेणाऱया विश्वासघातकी ‘धनुष्यबाणा’वर मतदान करून….. या दरोडेखोर, ‘शहांनाच बादशहा’ बनवलयं व ‘महालक्ष्मी’नंतर ‘राजलक्ष्मी’ही बहाल करून बसलोयं !!!

कुठेतरी, आपणच या सगळ्याला जबाबदार आहोत…. तेव्हा, या गुढीपाडव्याच्या मराठी नववर्षदिनी शुभेच्छांचं ‘आदानप्रदान’ करत, नव्या ‘राजकीय-जागृति’चा जागर करूया…. अवघ्या जगण्याचीच ‘कोंडी’ करणारी मळलेली राजकीय पाऊलवाट सोडून, नवी जाज्ज्वल्य मराठी ‘राजकीय गुढी’ उभारूया !

झोपी गेल्या मराठी माणसा ऊठ,

धर्मराज्य के अलावा बाकी सब झूठ !!!

जय महाराष्ट्र! जय हिंद!!

…राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)