‘धर्मराज्य पक्ष’…. हा, भारतातील एकमात्र ‘राजकीय पक्ष’ आणि ‘राजन राजे’….. हा, भारतातील एकमात्र ‘राजकीय नेता’…. ज्यानं, आपल्या देशात (विशेषतः, महाराष्ट्रात) थैमान घालणाऱ्या, आधुनिक-व्यवस्थेतील “गुलामगिरी व नव-अस्पृश्यते”प्रमाणे असणाऱ्या “कंत्राटी-कामगार/कर्मचारी” प्रथेविरुद्ध, गेल्या २५-३० वर्षांपासून “धर्मयुद्ध” पुकारलेले आहे !
जशा, वृक्षाच्या आधाराशिवाय ‘वेली’ जगू व वाढू शकत नाहीत…. तशीच अवस्था, कामगार-कर्मचारी चळवळीची असल्याने, तिला सदैव ‘राजकीय आधारवडा’ची गरज भासते! सद्यस्थितीत, राजकीय आधाराविना मूलतः दुबळी असणारी ही अशी ‘कामगार-चळवळ’, पद्धतशीररित्या संपविण्याचे उद्योग, या देशातील उद्योगपती, ….प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला व नोकरशाहीला, हाताशी धरुन खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाच्या(‘खाउजा-धोरणं’) नांवाखाली वर्ष, १९९०-९१ पासून बिनदिक्कतपणे करत आहेत. ‘खाउजा-धोरणं’ म्हणजे…. उद्योगपती-व्यापारी, राजकारणी व सरकारी अधिकारी यांनी मिळून बनलेल्या ‘एक टक्के वर्गा’ने, पोट फुटेस्तोवर सामान्य जनतेच्या टाळूवरचं लोणी ‘खायचं’ धोरणं!
स्वातंत्र्यापश्चात आम्हाला लोकशाहीच्या मंदिरातला ‘मतदानाचा पवित्र अधिकार मिळाला खरा; पण ‘मतदार’ हा, लोकशाहीला ‘राजा’ ‘न’ रहाता; असंख्य ठिकाणी तो लोकशाहीच्या देवळातला ‘भिकारी’ बनून, आपली मौल्यवान मतं, निवडणुकीच्या काळात शेअर-बाजारातल्या शेअर्सप्रमाणे ‘बोली लावून’ विकायला लागला….. “मतदान-केंद्रांचं रुपांतर मतविक्री-केंद्रात झालं!” काहीप्रसंगी असंही चित्र दिसतं की, मतदार अतिशय गंभीरपणे मतदान करत असल्याचा आव आणतो; पण, नेमका टीव्ही/पेपरातल्या मुलाखती-जाहिराती-पेड न्यूज पाहून, चक्क आपल्या हिताच्याच विरुद्ध मतदान करुन मोकळा होतो (आठवा, …..“अब की बार….”, २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात, तळ्याऐवजी रोज टीव्हीवर फुलणारं कमळ आणि PM म्हणजे ‘Product of Media’ ही तयार झालेली नवी व्याख्या!)…. मग, व्हायचं तेच होणार… तेच झालं. उद्योग-सेवाक्षेत्रात एक भयाण ‘सन्नाटा’ हळूहळू पसरु लागला. लोकशाही-मंदिराचा अशातर्हेनं शेअरबाजार झाल्यानं, सर्वत्र ‘दलालांचा सुळसुळाट सुरु झाला….. त्यात, HR-अधिकारी वर्ग व तथाकथित ‘लेबर-कन्सल्टंट्स्’ (खरतर, अँटी-लेबर कन्सल्टंट्स् !) हे तर होतेच; पण, त्याहीपेक्षा जास्त संख्येने, आपला प्रस्थापित राजकारणीवर्ग (जे, याच दलालीतून बक्कळ पैसा कमावून गब्बर बनले व इतर उद्योगात हा ‘काळा पैसा पांढरा’ करुन राजरोस प्रवेश करते झाले!) व कामगारविभाग/पोलीसप्रशासनातील सरकारी-अधिकारीवर्ग होता. परिणामतः, केवळ, उद्योग-सेवाक्षेत्रातच नव्हे; तर, अवघ्या देशातील लोकशाहीच्या पवित्र मंदिरात मुडद्याफरासांची अपवित्र ‘स्मशान-शांतता’ झपाट्याने पसरली. निवडणुकीत मतांची ‘बोली’ लावणार्यांची कार्पोरेटक्षेत्रात ‘बोलती’ बंद केली जाऊन, त्यांच्या जगण्याचीच ‘बोली’ (Labour-Arbitrage) लावली जाऊ लागली!
“ही उद्योग-सेवाक्षेत्रातील ‘स्मशान-शांतता’ इथे ‘कायमच्या वस्ती’ला आलीय किंवा आंतराष्ट्रीय परिस्थिती बदलल्याने ती ‘वज्रलेप’ झालीयं… तेव्हा, तिचा स्विकार मुकाट्याने करा, अन्यथा, या आधुनिक काळाच्या ओघात नष्ट व्हा; कारण, ‘कारखाना जगला तरच, कामगार जगेलं’…..” असा, आपल्याच मराठीभाषिक-जमातीच्या मनात जाणीवपूर्वक ‘न्यूनगंड’ निर्माण करुन तिला घाबरवून सोडण्याचा, अत्यंत नीच व अधम ‘उद्योग’ महाराष्ट्रातील तमाम दलाल-राजकारणी मंडळींनी, उद्योगपतींच्या हातात हात घालून सुरु केल्याने…. करोडो करोडो कामगार-कर्मचार्यां’नी बनलेलं अवघं मराठी-कामगारविश्वच हवालदिल, दिशाहीन व लाचार बनलं. अशातर्हेनं, दलाल-घराणेबाज मराठी-राजकारण्यांनी, व्यवस्थितरित्या ‘पार्श्वभूमी’ तयार केल्यानंतरच, कंत्राटी-कामगार/कर्मचारी प्रथेची ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यता’ महाराष्ट्रात-देशात मूळ धरत, यथावकाश पुढे अक्षरशः धुमाकूळ घालू लागली.
सांप्रतकाळी, देशात-महाराष्ट्रात सत्तेवरुन, अवलक्षणी ‘हात’ आणि त्या हातावरचं आरपार भ्रष्ट ‘घड्याळ’ पायउतार होऊन, ‘कमळ-धनुष्यबाण’वाल्यांचं सरकार देशात-महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर तर, तळागाळातल्या सर्वसामान्य मराठी माणसांची अवस्था, “आगीतून फुफाट्यात…” किंवा, “भीक नको, पण कुत्रं आवरं…..” अशी अतिशय वाईट झालीयं. कामगार-कायदे बिघडवून, कामगार-कर्मचार्यांच्या बचतीलाच हात घालून आणि कंत्राटी-पद्धतीची ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यता’ दिवसेंदिवस अधिक मजबूत करुन सर्वसामान्यांच्या जगण्याची हरप्रकारे ‘कोंडी’ केली जातेयं (….ज्यात, या बदमाष राजकारण्यांनी ‘कल्याणकारी-राज्य’ संकल्पनेला हरताळ फासून आणलेली व हेतुपुरस्सररित्या वाढवलेली, महागडी व लुटारु खाजगी शिक्षण व आरोग्यसेवाही आलीच)!
या अशा विपरित वातावरणात काम करत, शब्दशः भगीरथ प्रयत्नांनी ‘राजन राजे’ व ‘धर्मराज्य पक्ष’ प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी संघटने’नं, या लुटारु व शोषक व्यवस्थेला (Vampire-State) आव्हान देत, काही आशेचे किरण, सामान्य मराठी-माणसाला दाखवलेले आहेत.
नवी मुंबईतील ‘सुल्झर पंप्स्’ सारख्या, शाॅपफ्लोअरवर व ऑफिस कामकाजात एकही ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी’ नसलेल्या, कंपनीतून ६००हून अधिक ‘कायमस्वरुपी’ कामगार-कर्मचाऱ्यांना देशातील सर्वोच्च वेतनमान व सेवासुविधा (किमान डझनभर कामगार-कर्मचार्यांना “सहा आकडी” म्हणजेच, एक लाखाहून अधिक मासिक पगार व सोबतीला गेली आठ वर्षे सातत्याने “सहा आकडी” नफाआधारित बोनस!) दिलेल्या आहेत…. एवढचं नव्हे; तर, अनेक कंपन्या-आस्थापनांमधून कामगारविरोधी वातावरण आरपार बदलवून, तेथील कंत्राटी-कामगार/कर्मचाऱ्यांना कायम केलयं आणि दणदणीत पगार व बोनसवाढीचे करार करुन कामगार-कर्मचार्यांना त्यांच्या हक्काचा आर्थिक-न्याय व उन्नती मिळवून दिलीय.
हे कार्य, आजच्या काळात एक फार मोठी ‘क्रांति’ आहे… डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘समतेच्या संदेशा’च्या दिशेनं उचललेलं गेलेलं, हे महाराष्ट्रातीलच नव्हे; तर, देशातील एकमात्र ‘पाऊल’ आहे! इतरत्र, फक्त, “शिवछत्रपतींचे पुतळे उभारले जातायतं; पण, कारभार औरंगजेबाचा केला जातोयं….. पुतळे ‘बाबासाहेबां’चे उभारले जातातयं; पण, कारभार ‘कंत्राटी-पद्धती’च्या ‘दुकानदारसाहेबां’चा चालू आहे!”
श्रीकृष्णाचा जीवनसंदेश आणि शिवछत्रपतींची राजनीती अंगिकारुन, गेल्या ३५ वर्षांहून अधिककाळ अथकपणे वाटचाल करणारे ‘राजन राजे’, हे आजच्या घडीला देशातील-महाराष्ट्रातील एकमेव द्रष्टे, निर्मोही, कर्मयोगी व शंभर नव्हे तर, ‘एक हजार टक्के’ सच्चे ‘राजकीय-नेतृत्त्व’ आहे…. पण, या नव्या ‘बावनकशी नेतृत्त्वा’ला, निवडणुकीत मराठीजनांची साथ लाभायला हवी; तरच, त्याचा प्रभाव वाढेल आणि त्याचा कार्यविस्तार महाराष्ट्रभर होऊन केवळ, मराठी-माणसाचं फाटलेले ‘आभाळ’ शिवलं जाईल, असचं नव्हे; तर, त्याच्यासाठी शाश्वत स्वरुपाच्या… त्याचं अस्तित्व जपणाऱ्या, नव्या ‘आभाळा’च्या उभारणीला सुरुवात होईल.
“कामगार-कर्मचारी सन्मानाने जगला तरच, यापुढे कारखाना जगेल; अन्यथा, नव्हे”, अशी सिंहगर्जना करणाऱ्या या नेतृत्त्वाला, ज्यादिवशी महाराष्ट्रातील ‘मराठी-माणसा’ला ‘साथ’ द्यावीशी वाटेल…. त्यादिवसापासून सामान्य मराठी-माणसाची जगण्याची कोंडी फुटायला व जगण्याची निर्माण झालेली ‘कोडी’ सुटायला सुरुवात होईल. त्यादिवसापासून, महाराष्ट्रातील मराठीभाषिक-जमातीच्या मुळावर आलेली ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी पद्धत, हिवाळ्यातील शिशिरऋतूत पानगळ व्हावी, तशी पत्त्याच्या बंगल्यासारखी सहजी कोसळून पडायला सुरुवात होईल.
महाराष्ट्रातल्या मराठी-माणसांवर व निसर्ग-पर्यावरणावर अनन्वित अत्याचार करणाऱ्या धनदांडग्या जैन-गुज्जू-मारवाड्यांच्या ‘शेठजी-संस्कृति’ला प्रथमच महाराष्ट्रात अटकाव केला जाईल…. अफाट व अचाट पैसा-संपत्तीच्या सैतानी-बळावर, आज ‘बादशहा’ बनलेल्या ‘शहां’ना, याच ‘सुरतेची लूट करणार्या’ शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात, प्रथमच ‘शह’ दिला जाईल…. तसेच, उत्तर-पूर्व भारतातून येऊन अफाट संख्याबळाच्या आधारे, महाराष्ट्राच्या ऊरावर थयथयाट करणार्यांचा सनदशीर मार्गांनी ‘पायबंद’ केला जाईल.
तेव्हाच, मराठी माणूस अभिमानाने छाती फुगवत, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राची लाल-काळी माती भाळी लावून, ताठ पाठकण्याने ‘मोकळा श्वास’ घेईल…. आयुष्यात प्रथमच, खऱ्याखुऱ्या ‘शिवशाही’च्या (ढोंगी व बनावट नव्हे!) दिशेनं, ‘धर्मराज्य पक्षा’च्या ध्वजाखाली, त्याची वाटचाल सुरु झालेली असेल !!!
जय महाराष्ट्र I जय हिंद II
… राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)