वाचा, पहा, ऐका आणि खुशाल झोपा काढा…..

हा माणूस, ‘जैन-मुनी’ आहे की, ‘भाजपचा एजंट’?

एरव्ही मोह, माया व इतर षडरिपुंपासून दूर असण्याचा टेंभा मिरवणाऱ्या या जैन मुनिवरांनी मुंबईतील संख्येने २० लाखांवर आणि पैशाने अतिशय गब्बर असलेल्या (‘पराग शहा’ या घाटकोपरच्या विजयी भाजपा उमेदवाराची केवळ ‘घोषित’ संपत्तीचं ६९० कोटींची… मग, ‘अघोषित’ संपत्ती केवढी???), जैन समाजाची मते व संसाधने (पर्यायाने गुज्जू-मारवाड्यांनी सुद्धा), भाजपकडे वळवण्यामागे फार मोठी भूमिका पार पाडलेली आहे!

परिणामी, ‘जैन-गुज्जू-मारवाडीबहुल’ मुंबई उपनगरांमध्ये भाजपच्या नगरसेवकांची संख्या काही पटीने वाढलीयं.

मित्रांनो, ‘शिवसेना’ म्हणजे ‘मराठी-माणूस’ कधिही नव्हता आणि बिलकूल नव्हे…. धूर्त राजकीय कौशल्याने, तसा फक्त ‘आभास’ निर्माण करुनच, आजपर्यंत सर्वसामान्य मराठी  माणसांना रग्गड फसवण्यात आलयं! त्यामुळेच, काळाने आज शिवसेनेवर सूड उगवल्यासारखं अनेकांना वाटतं असलं; तरी, खर्‍या अर्थाने पाहता मराठी-माणसाने आजवर शिवसेनेला मोठं करण्याच्या केलेल्या घोडचुकीचचं फळ, नियतीने त्याच्या पदरात टाकलयं.

याच, जैन-गुज्जू-मारवाड्यांना मोठं करण्याच्या महापातकात ‘शिवसेने’चा फार मोठा ‘हात’ आहे… ‘मराठी सरस्वती’ आणि ‘गुजराती लक्ष्मी’ एकत्र आणण्यासाठी कोण “देव पाण्यात बुडवून बसलं होतं”? ….आणि याच जैनांना खूष करण्यासाठी “नाॅन-व्हेज” कोणी सोडलं होतं??…. “कारखाना जगला, तरच कामगार जगेल”, अशी याच जमातीतल्या मालकवर्गाची ‘दलाली’ करत, आपल्याच श्रमजिवी मराठी-जमातीला कोणी घाबरवून सोडलं होतं की, ज्यामुळे कामगारक्षेत्रातील चळवळी संपल्या??? अंबानींसारख्या बड्या उद्योगपती-व्यापारीवर्गाला पाठबळ व संरक्षण कोणी दिलं होतं????

मित्रहो, हरलं कोण, जिंकलं कोण हा झाला नंतरचा भाग…..

पण, आज मुंबईत तब्बल २७ गुजराथी आणि १२ उत्तर भारतीय नगरसेवक ‘भाजपा’तर्फे निवडून गेलेले आहेत. ‘रिलायन्स एनर्जी’ची आता बिलंसुद्धा गुजरातीत येऊ लागली आहेत!

म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावतो

‘पटेल’, ‘शहा’ आणि मेहता, गाला आडनांवांची, गुजराथ-मारवाडच्या आडगावांची, ‘गुजराथी-ब्रिगेड’ पोहोचलीयं मुंबई महानगरपालिकेत आणि आमच्याकडचे ‘ब्रिगेडवाले’ अजुनही ‘पुतळे’ फोडण्यात ‘दंग’ आहेत किंवा ‘मेगा-इव्हेंट्स्’ साजरी करत असल्यासारखे, व्यवस्थेच्या ‘दलाल’ असलेल्या राजकारण्यांच्या आर्थिक पाठबळावरच, ‘महामोर्चे’ ‘मग्न’ आहेत…. काय बोलावे या दुर्भाग्याला, धन्य धन्य म्हणावा तो शिवबांचा महाराष्ट्र!

हे असं, सारचं फार उद्विग्न व अस्वस्थ करणारं असलं… तरी, हे पाप, ‘भाजपा’पेक्षा ‘शिवसेने’चचं फार मोठं आहे! ‘भाजपा’, हा तर बोलूनचालून ‘शेठजीं’चाच पक्ष… तो आपल्या धर्माला जागला. पण, शिवसेनेचं काय? “मराठी माणसांसाठी गळे काढता काढता, त्यांचे विश्वासघाताने ‘गळे’ कापण्याचे उद्योगच शिवसेना करत आली ना आजवर? किरकोळ कामं शाखांमधून तातडीनं करायची; पण, मोठ्या कामांमध्ये यथेच्छ ‘हात’ मारुन घ्यायचा…. खंडण्या गोळा करायच्या, ‘तोडपाणी’ करत पदाधिकाऱ्यांनी रातोरात अफाट श्रीमंत व्हायचं (हल्ली त्यासाठी, ज्यांना शिवसेनेनं ‘वाकड्या तोंडा’चा म. गांधी म्हटलं होतं, त्या अण्णा हजारेंच्या महान त्यागानं मिळालेल्या, ‘माहिती-अधिकार कायद्या’चाही सर्रास गैरवापर सुरु आहे)…. कामगारांचे लढे तोडण्याच्या मालकवर्गाकडून ‘सुपार्‍या’ घ्यायचं आणि भरीसभर म्हणून नव्वदीच्या ‘खाउजा’ (खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण) धोरणानंतर महाराष्ट्राच्या नसानसात “कंत्राटी-कामगार/कर्मचारी पद्धती’चं ‘जहर’ पसरवून देण्याचचं ‘कर्म’, प्रामुख्याने शिवसेना करत आली ना?

…..आणि, आता तर काय, त्यांचे पदाधिकारी बडे ‘बिल्डर’ तरी बनलेत किंवा बड्या ‘बिल्डरांचे दलाल’! मग काय, आपल्या रक्ताहाडामांसाच्या मराठी माणसांना व्यवस्थेचा हात धरुन घराघरांतून हुसकावून बाहेर काढायचं आणि ‘क्लस्टर’चं ‘नष्टर’ त्यांच्यामागे एकदाचं लावून मोकळं होण्याचचं धोरण सगळीकडे अवलंबलं जातयं. शहरांची क्रिडांगणं, मराठी शाळा, बागा, तलाव-विहीरी, निसर्गसंपदा… जे जे काही शक्य होतं, ते ते आर्थिक व राजकीय स्वार्थासाठी सगळं यांनी एकतर नष्ट केलं किंवा ‘गट्टम’ करुन टाकलं. महापालिका-अधिकार्‍यांना हाताशी धरुन, उत्तरभारतीयांना अनधिकृत झोपडपट्ट्या उभारुन देऊन, त्यातून बक्कळ पैसा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कमावला. ‘एसआरए’ आणि ‘क्लस्टर’ योजनांचा जास्तीतजास्त फायदा उत्तरभारतीयांना कसा मिळेल व त्यातून उत्तरभारतीय ‘मतपेढी’ कशी मजबूत करता येईल (त्याचाच भाग म्हणून, ‘मराठीत्वा’ची गळचेपी करणाऱ्या ‘हिंदुत्वा’चे नारे शिवसेना दीर्घकाळ लावत आलेली आहे…. संजय निरुपमला याचसाठी शिवसेनेनं मोठा करण्याचं ‘पातक’ केलं), याकडेच तमाम शिवसेना-नेत्यांचं लक्ष असतं. शिवाय, कारखाने-कंपन्यांमधून ‘कंत्राटदार’ म्हणून प्रवेश करत, याच स्वस्त-मजुरांना ‘कंत्राटी-कामगार’ म्हणून वापरत, कामगारांचा घात करुन…. वेडावाकडा अफाट पैसा मालकांकडून कमावला….. एवढा की, अवघं मराठी कामगार-जगत बोलायला लागलं, “शिवसेनेची कामगार-संघटना, ‘बीकेएस’ म्हणजे मराठी कामगारांना ‘भीके’स लावणारी संघटना”!

म्हणूनच, आपल्याच लालकाळ्या मातीत, आपल्याच पाण्यात, आपल्याच हवेत राहून ‘मराठी माणूस’ नुसताच उध्वस्त नाही झाला; तर, अक्षरशः भिकेला लागलायं.

धनदांडग्या-मुजोर जैन, गुज्जू, मारवाड्यांना ठाणे-मुंबईसारखी अफाट-अचाट महसुलाची प्रमुख शहरं, ‘टक्केवारी’च्या ‘बिनश्रमाच्या लालसे’नं (म्हणूनच, आपली भारतीय-संस्कृति “श्रमाविना संपत्ती, सप्तमहापातकांपैकी एक पातक” मानत आलेली आहे)  शिवसेनेनचं मोठ्याप्रमाणावर ‘आंदण’ दिली!

ठाण्यात तर, गेली तीन-चार दशके शिवसेनेच्या दहशतवादानं हैदोस घालून, या धनदांडग्या जमातींना शहराचे मध्यवर्ती व मुख्य भाग  ‘मोकळे’ करुन देण्याचं महापातक केलं (टेंभीनाक्यापासून चरई-पाचपाखाडी पर्यंतचा, हा पूर्वीचा ठाण्याचा मुख्य व महत्त्वपूर्ण मराठी-बहुल भाग; आता, जैन, गुज्जू, मारवाड्यांच्या बापाचा झालायं) आणि भोळसट मराठी माणसांना “टेंभीनाका, जांभळीनाका ते शहराच्या सांदीकोपर्‍यापर्यंतच्या देवी-देवांचे उत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंड्या, गरबे, खेळांच्या स्पर्धा” यात कौशल्याने गुंतवून ठेवलं. यासाठी, याच धनवान जैन, गुज्जू, मारवाड्यांनी शिवसेनेच्या स्थानिक-नेतृत्वाला हवा तेवढा दोन नंबरचा पैसा पुरवला आणि रातोरात ठाण्यात ‘वीर’ तयार व्हायला लागले. असला नापाक धार्मिक व उत्सवी ‘कैफ’ चढलेली ‘पावतीछाप’ मराठी-माणसं, ठाणे शहराच्या परिघाबाहेर (बहुधा डोंगरांवरच्या अनधिकृत वस्त्या) विविध नगरांमध्ये (शास्त्रीनगर, साठेनगर, इंदिरानगर, रामनगर इ. इ.) दूर फेकली जाऊन, धड ‘दहा बाय दहा’ सुद्धा नसलेल्या अनधिकृत वस्त्यांमध्ये अक्षरशः ‘कोंबली’ आणि ‘कोंडली’ जाऊ लागली. पाण्यापासून शिक्षणापर्यंत धड कसल्याही नागरीसुविधा नसलेले, हे अभागी मराठी जीव, कसेबसे आजही या वस्त्यांमधून दिवस ढकलत जगतायतं…. पण, एवढ्या हालअपेष्टा सोसूनही त्यांच्या डोक्यात, हे असं प्राक्तन, आपल्याला कोणामुळे भोगायला लागतयं, हे काहीकेल्या घुसत नाही, हे केवढं दुर्दैव? उलटपक्षी, ‘दुर्दैवाचे दशावतार’ भोगायला लावणार्‍यांनाच, एकतर ते अज्ञानाने ‘तारणहार’ तरी समजतायतं किंवा त्यांच्या राजकीय भुलभुलैय्याला, ते आजही सहजी बळी पडताना दिसतायतं.

त्यामुळे, “ते आणि तेच” ठाण्याच्या राजकीय पटलावर आजवर घडत आलयं आणि अजून कितीकाळ ते घडत रहाणार, याचा साधा अंदाज बांधणही कठीण आहे.

मतांच्या राजकारणाची आणि व्यवस्थेच्या दमन-यंत्रणेची बिलकूल तमा ‘न’ बाळगता, या धनदांडग्या-मुजोर जमातींविरोधात, धैर्यानं आणि हिंमतीनं ‘एल्गार’ पुकारणारा, एकच राजकीय पक्ष अस्तित्वात आहे…. तो म्हणजे ‘धर्मराज्य पक्ष’, ‘धर्मराज्य पक्ष’ आणि फक्त ‘धर्मराज्य पक्ष’च…. पण, लक्षात कोण घेतो?

प्रस्थापित काँग्रेस, भाजप, शिवसेना (केवळ, अस्तित्वासाठी अखेरची केविलवाणी धडपड करणार्‍या ‘राष्ट्रवादी’ किवा ‘मनसे’ यांची नांवंसुद्धा घेण्याची गरज आता उरलेली नाही) हे राजकीय पक्ष, या बड्या उद्योगपती-व्यापारीवर्गाच्या ताटाखालची म्याँव म्याँ करणारी ‘मांजरं’ बनलेली असताना….. त्यांच्याविरुद्ध ‘डरकाळी’ फोडणं तर सोडाचं; पण, साधी ‘कोल्हेकुई’ करण्याची किंवा कदाचित ‘म्याँव म्याँव’ करण्याचीही हिंमत, हे प्रस्थापित राजकीय पक्ष चुकूनही कधि दाखवू शकण्याची शक्यता संपुष्टात आलेली असताना….  या जमातींच्या रक्तपिपासू-शोषक व्यवस्थेविरुद्ध, थेट ‘एल्गार’ पुकारत ‘धर्मयुद्ध’ छेडणार्‍या “धर्मराज्य पक्षा”कडे, साफ दुर्लक्ष करणाऱ्या मराठी-तरुणाईला, ही कुठली ‘काळझोप’ लागलीयं???

(सदर जैन मुनी आचार्य नयपदमसागर यांनी जैन-समाजाला केलेल्या आवाहनाचा ‘व्हिडीओ’ खाली देत आहे. मराठी माणसाला मुंबईत आपल्या पायाखाली काय जळतंय…. कोणाच्या आणि कुठल्या, आर्थिक व राजकीय गुलामगिरीच्या  ‘कोंडी’त, आपण पुरते अडकत चाललोयं, याची जळजळीत जाणीव करून देण्याचा हा एक ‘ज्वलंत’ प्रयत्न आहे….)

https://m.youtube.com/watch?v=oIIuJybLkr8

संयुक्त महाराष्ट्रानंतर…. स्वायत्त-महाराष्ट्र’! …..राष्ट्रांतर्गत राष्ट्र, ‘स्वायत्त-महाराष्ट्र’!! ….. ‘शिवछत्रपतीराष्ट्र’ !!!”

जय महाराष्ट्र ।  जय हिंद ।।

झोपी गेल्या मराठी-माणसा ऊठ, ‘धर्मराज्यके अलावा बाकि सब झूठ!!!

धन्यवाद!

….. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)