“महाराष्ट्रातून (म्हणजे, मुंबईतून हो) तुमचा बोजाबिस्तरा गुंडाळून तुमच्या गुजराथला चालते व्हा”, असा मोठ्या राणाभीमदेवी थाटात (“मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर”, ‘पॅटर्न’चा तो थाट) आमचे मराठी नेते मुकेश अंबानींना फुसका ‘आवाज’ देताना पाहून…मुकेश अंबानी मनात हसत म्हणत असतील की, “हू तो गुजराथमाच छू, तमे समझता नथी?”
…ही मुंबई, हे ठाणे शहर (आणि, हळूहळू अशीच पुणे, नाशिक, नागपूर, रायगड सारखी अन्य शहरं-जिल्हे) गुजराथी-भाषिक धनदांडग्या-मुजोरांना आंदण दिल्यासारखी, जी आपली दारुण अवस्था झालीय; ती नेमकी कशामुळे झालीय…तर, “गुजराथी लक्ष्मी आणि मराठी सरस्वती एकत्र नांदली पाहीजे” अथवा “कारखाना जगला तरच, कामगार जगेल” किंवा “गुजराथी आमच्यात दुधातल्या साखरेसारखे विरघळले; तर, उत्तर भारतीय आमच्यासाठी उपद्रवी ठरले” असे म्हणत, लक्ष्मीपुत्र गुजराथ्यांना जोजोवणार्या आणि ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ महाराष्ट्रात आणून मराठी-कामगारांचा बरबाद करणाऱ्या…धनाढ्य गुजराथी-भांडवलदारवर्गाच्या पैशाच्या बळावर निवडणुका लढवणाऱ्या आणि गुजराथी-पैशावरच सार्वजनिक पूजा-नवरात्रौत्सव-गणेशोत्सव-दहीहंड्या-भंडारे-गरबे साजरे करत भोळसट मराठ्यांची महापालिका-विधानसभा-लोकसभा निवडणुकांमध्ये घाऊक-पद्धतीने ठोक मतं हमखास गोळा करणार्या अवसानघातकी मराठी-नेत्यांमुळेच, ही परिस्थिती ओढवलीय. फरक एवढाच की, कालपर्यंत ज्या धनदांडग्या गुजराथ्यांना डोक्यावर घेऊन ही नेतेमंडळी नाचत होती; तेच आता मराठी-माणसांच्या ऊरावर चढून महाराष्ट्रात थयथयाट करतायत, मराठ्यांना (जातिवाचक नव्हे) लाथाडतायत…पण, हे आकळण्याएवढी सारासार बुद्धी, आम्हा मराठ्यांकडे शिल्लक राह्यलीयच कुठे…???
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)