याचं कारण एकमात्र एवढचं की, ही ‘कंपनी-व्यवस्था‘ (Corporate World) ही, ‘संपत्ती-निर्माण‘ प्रक्रियेपुरती अत्यंत कार्यक्षम व तज्ज्ञ असते…. पण, ज्याक्षणी, निर्मित संपत्तीचं न्याय्य-वाटप करण्याचा प्रश्न उभा रहातो; तेव्हा मात्र, हे सगळे तथाकथित तज्ज्ञ, एकदम अनभिज्ञतेचं व अडाणीपणाचं सोंग धारण करतात आणि कर्मचाऱ्यांना कारखान्यात निर्मित वा व्यवसाय-धंद्यात प्राप्त संपत्तीच्या न्याय्य-हक्कापासून वंचित ठेवतात. दुर्दैवाने, आपल्या ‘राज्यघटने‘तही देशातल्या अशा संपत्ती-निर्मिती प्रक्रियेत, संपत्ती-निर्माण होण्यास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरणाऱ्या “सर्वांचीच भरभराट वा आर्थिक-प्रगती” (Common-Prosperity) व्हायलाच हवी…. या ‘महान तत्त्वा‘चा स्पष्ट अंतर्भाव नाही! त्यामुळे, उत्पादन वा सेवाक्षेत्रातील कंपन्यांची व्यवस्थापनं, “नफा आमचा आणि तोटा तुमचा” (Profits are Private and Losses are Public), हे तद्दन बदमाषीचं ‘सूत्र‘ अवलंबून, भरभराटीच्या काळात कर्मचाऱ्यांना सरळं ठेंगा दाखवतात आणि जरा एखाददुसऱ्या वर्षी कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली रे आली की, ताबडतोब कंपनी छप्परावर चढून बोंबाबोंब सुरु करतात आणि कर्मचाऱ्यांच्या पगार-भत्ते-सोयीसुविधा यावर शब्दशः ‘डल्ला’ मारायला मोकळे होतात!
भारतात औद्योगिकक्षेत्रात कायमच कंपनी-व्यवस्थापनं, कंपनी मालक वा भागधारक (Share-Holders) यांचीच आर्थिक-निगा राखली जाते आणि कर्मचाऱ्यांना व इतर आनुषंगिक समाज-घटकांना (Stake-Holders) अक्षरशः वाऱ्यावर सोडलं जातं!!
मित्रहो, ‘सुरत‘चा हा “काॅमन-प्राॅस्पेरिटी”चा किस्सा, हा भारतीय आध्यात्मिक विचारधारेनुसार ( त्येन त्यक्तेन भुंजिथः…त्यागातून भोग किंवा, सर्वेपि सुखिनः सन्तु… सकळजनं सुखीसमृद्ध) अंतःप्रेरणेतून जन्माला येणं, हा एकवेळ ‘अपवाद‘ ठरला तरी चालेल; पण, ‘सुल्झर‘चा “काॅमन-प्राॅस्पेरिटी”चा प्रयोग मात्र, भारतवर्षात ‘अपवाद‘च ठरणं…. हे भारतातल्या “रक्तपिपासू-शोषक” व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण आहे आणि ते निपटून काढलचं पाहीजे! ते तेवढचं नसून, भारतातल्या राजकीय-व्यवस्थेचं आणि कामगार-चळवळीचं, ते मन विषण्ण करणारं संतापजनक अपयश आहे!! याचं कारण एवढचं की, “श्रमाशिवाय संपत्तीचा उपभोग” (ज्याला, भारतीय अध्यात्मानं सप्तमहापातकांपैकी एक मानलेलं आहे) घेणारी “राजकीय छोटीमोठी बांडगुळं”, या आपल्या भारतीय-समाजवृक्षावर स्वातंत्र्यापश्चात फार मोठ्याप्रमाणावर पोसली जातायतं. तळपायात शिरणारी ‘जळू‘, आपलं रक्त शोषल्यावर तट्ट फुगून गळून तरी पडते…. रक्तपिपासू वटवाघळं एकदा का आपल्या नकळत झोपेत आपलं रक्त पिऊन झालं की, दूर निघून तरी जातात; पण, ही रक्तपिपासू “राजकीय वटवाघळं वा जळवा”, तहहयात पिढ्यानुपिढ्या आपलं शोषण करत रहातात आणि आपण ते त्यांना अज्ञानापोटी, आळसापोटी वा संघर्षाचं सतत भय मनी बाळगल्याने करु देतो!!!
आपल्या कामगारवर्गाला कधि कळणार की, “तरुणपणी संघर्ष केला नाही तर, म्हातारपणी लाचारीचा सामना करावा लागतो” आणि, “स्वतःमध्ये ‘धर्मराज्य पक्षा‘सारख्या जाज्वल्य राजकीय पक्षाकडे ‘आकृष्ट‘ होण्याची व अशा ‘अंतिम-सत्यवादी‘ पक्षाला मनाशी ठाम खूणगाठ बांधून सातत्याने मतदान करत, सत्तेच्या दिशेनं नेण्याची ‘राजकीय-जागृती‘ बाळगली नाही; तर, आपल्यासह पिढ्यापिढ्यांना ‘गुलामी‘चा सामना करावा लागतो…. जी स्थिती काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बीजेपी वगैरे वगैरे लुटारु पक्षांची कास धरुन, आजच्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी-माणसांवर ओढवलेली आहे!
आजच्या काळात, जातधर्माचा बागुलबुवा उभा करत, श्रमिकांचं टोकाचं शोषण करुनच ‘व्यवस्था’ चालवली जाते. जातधर्माचे झेंडे फडकवत, ती तशी, चालवणाऱ्यांच्या हातचं आपण केव्हाचेच ‘बाहुलं‘ बनलेलो आहोत… हे मराठी कामगार-कर्मचाऱ्यांना कधि उमगणार? म्हणूनच, या “शिवबा-संतां”च्या महाराष्ट्रात, मराठमोळ्या एसटी कर्मचाऱ्यांना रु.२,५००/- इतक्या लाजिरवाण्या बोनसची भीक पदरात टाकण्याची आणि कायमस्वरुपी एसटी कर्मचाऱ्यांचं कंबरडं मोडणारी ‘शिवशाही‘ नांवाची खाजगी-कंत्राटदारीत चालणारी बससेवा सुरु करण्याची निर्लज्ज हिंमत ‘शिवसेना‘ दाखवू शकते…. तरीही, आमचं शिवसेनेच्या किंवा इतर कोणाच्या नादी लागतं, फुकाचं “जय भवानी, जय शिवाजी” असं पुटपुटणं काही थांबत नाही…. मग, कर्मचारी एसटीचा असो, ‘खंबाटा‘चा असो अन्यथा, महाराष्ट्रातल्या असंख्य कंपन्या-कारखान्यातला असो…. तो, महाराष्ट्रात १९७० सालापासून लुटला जातोच आहे. विशेषतः, १९९० सालानंतरच्या ‘खाउजा‘ (खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण) धोरणापश्चातच्या “कंत्राटी-कामगार पद्धती”ने तर, तो आरपार नागवला जातोच आहे. मराठी-माणसं, आपलं ‘शिवबा-संतां‘चं ‘मराठीत्व‘ बाजूला ठेऊन, अशीच “जातधर्मा”च्या ग्लानीत (‘हिंदुत्व‘ आणि ‘मराठीत्व‘ या ‘परस्परविरोधी‘ व एकमेकाला ‘छेद‘ देणाऱ्या बाबी आहेत) राजकीय-धूळवड खेळत राहीली; तर, त्यांच्या डोळ्यात ‘धूळ‘ अजून साचत जाईल…. आजची अंधुक झालेली नजर, उद्या साफ ‘आंधळी‘ होईल… मग, “आंधळं दळतयं आणि कुत्र पीठ खातयं” तशी मराठी-माणसाची अवस्था होऊन ‘अमराठी‘ भयंकर माततील…. “लुटणारा-शोषण करणारा गुजराथी-भाषिक मालकवर्ग आणि स्वतःला लुटू देणारा उत्तर भारतीय कामगार”, ही महाराष्ट्राची नवी ओळख बनेल. त्यात, मराठी माणूस औद्योगिक-सेवाक्षेत्राच्या परिघाबाहेर ढकलला जाऊन बेकारांच्या फौजेत सामील झालेला दिसेल आणि जातीपातींचे ‘मोर्चे-महामोर्चे‘ काढत रस्तोरस्ती ‘धूळ‘ झाडत फिरेल!
उत्तरभारतीयांची राजकीय समज मराठ्यांपेक्षा बरी असल्याने ते, भविष्यात तरी संघर्ष करुन आपला उत्कर्ष करुन घेतील…. पण, शिवछत्रपती-म. गांधी-बाबासाहेब यांच्या नांवाने राजकारणाचा ‘धंदा‘ करणाऱ्यांच्या नादी लागलेला सामान्य मराठी माणूस, असा काही उत्कर्ष करवून घेण्याची शक्यता कितपत आहे???
‘सुरत‘चा “सावजी ढोलकिया” प्रयोग हा, अंतःप्रेरणेतून उद्भवलेला असा ‘देण्याचा‘ म्हणून, दुर्मिळ आहे (कारण, मूल रडल्याशिवाय आईसुद्धा दूध पाजत नाही); पण, ‘सुल्झर‘चा “राजन राजे” वा “धर्मराज्य” प्रयोग हा संघर्षातून ‘घेण्याचा‘ आहे…. म्हणूनच, अनुकरण करण्यायोग्य सुलभ आहे. पण, विशेष बाब म्हणजे, अशा रस्त्यावरच्या कडव्या ‘संघर्षाविना‘ तो, केवळ आपल्याला राजकीय-जागृतीतूनही सहजसाध्य आहे (कारण, गेल्या २५०-३०० वर्षांत झाली नाही, तेवढी संपत्ती महाराष्ट्रात गेल्या २५-३० वर्षांत झालेली आहे)…. आपण कुठल्या अवस्थेत जगायचं, ….”सन्मानाने सुरक्षित की, अवमानाने असुरक्षित”, हा सरतेशेवटी, मित्रांनो, निर्णय तुमच्या हाती आहे !!!
ll जय महाराष्ट्र, जय हिंद ll
(‘संयुक्त महाराष्ट्रा‘नंतर आता, ‘स्वायत्त-महाराष्ट्र‘…. राष्ट्रांतर्गत राष्ट्र, ‘स्वायत्त-महाराष्ट्र‘…. ‘शिवछत्रपती राष्ट्र‘!!!)
…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)