संघटनात्मक-ताकद

एक दगड उचला आणि कुत्र्याला मारा…. बघा, तो लगेच कुई कुई ओरडत पळून जाईल  पण, तोच दगड पुन्हा उचला बघू, आणि, आता फेका, मधमाश्यांच्या पोळ्यावर….

क्षणार्धात, त्या सर्व मधमाशा मिळून एकजुटीने तुमच्यावर असा काही हल्लाबोल करतील की, तोबा तोबा….

तुम्ही जीव घेऊन, दगडाने भेदरलेल्या कुत्र्यापेक्षा, जास्त वेगाने ढुंगणाला पाय लावून पळून जाल!

दगड तोच… आणि मारणाराही तोच…

फरक आहे, फक्त एकटे असण्याचा आणि एकटे नसण्याचा…. रानकुत्र्यांची छोटेखानी झुंडसुद्धा जंगलाच्या राजाला सळो की पळो करते एवढचं नव्हे; तर, त्याला संपवतेदेखील!!

म्हणूनच, संघटीत रहा आणि एकमेकास साथ देऊन अखेरपर्यंत लढा. मात्र, आपणं ‘माणसं’ आहोत… आपण, मधमाशीसारखा क्षुद्र कीटकही नव्हे आणि रानकुत्र्यांसारखा हिंस्त्र पशूही नव्हे; तेव्हा, संघटनात्मक-ताकदीसोबतच “न्याय व नीति”सुद्धा सोबत हवीच… सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परि त्यास ‘ईश्वरी अधिष्ठान’ असावे!!!

श्रीकृष्णाचा जीवनसंदेश आणि शिवछत्रपतींच्या राजनीतिनुसार, एका हातात ‘लढ्याचं शस्त्र’ आणि दुसऱ्या हातात ‘नीतिमत्तेचा तराजू’ धरणाऱ्या, आपणा सर्वांचा, संघटनात्मक ‘अंतिम विजय’ निश्चित आहे!

….राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)