‘पलटूमार’ (पलटू’राम’, संबोधून ‘रामा’ला कशाला बदनाम करायचं?) नितीशकुमारांच्या ‘विश्वासदर्शक ठराव’ संमत करवून घेण्याच्या पार्श्वभूमीवर….

“जेल जाने के बाद, उन्हे जंगल का जीवन याद आ रहा होगा”, ‘गोदी-मिडीया’तल्या एका सवर्ण अँकरने असा फुत्कार टाकणं…म्हणजे द्रौपदी मुर्मू, या ‘आदिवासी’ महिलेला राष्ट्राध्यक्षा बनवल्या जाण्यातली ‘भाजपाई-नौटंकी’, भारतीय जनतेसमोर उघडी पडणं!

बँकांचे हजारो कोटी लुटून विदेशी पळून गेलेल्या व देशात राहून देश लुटणाऱ्या धनदांडग्या गुजराथ्यांच्या केसालाही धक्का न लावणारी ‘गुजराथी-लाॅबी’… हाती सबळ पुरावा नसतानाही केवळ, साडेआठ एकर जमिनीच्या खरेदीचं फडतूस प्रकरण, संघीय-पद्धतीने छान रंगवत जर, हेमंत सोरेनसारख्या झारखंडच्या ‘आदिवासी’ मुख्यमंत्र्याला अटकेत टाकून भयंकर अपमानित करत असेल…आणि, दुसर्‍या बाजुला, कथितरित्या भारतातल्या सर्वात जास्त भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्याला, म्हणजेच दुसर्‍या ‘हेमंत’ला (आसामचा मुख्यमंत्री हेमंता विश्वशर्मा…खरंतरं, हेमंता ‘बेशर्मा’!), सत्तेच्या मखरात बसवून त्याची पाद्यपूजा करत असेल; तर, हे दिल्लीश्वर-सत्ताधारी कुठल्या लायकीचे राज्यकर्ते आहेत… हे जरा, २०२४ च्या निवडणुकीपूर्वी जनतेनं जाणून घेणं, जनतेच्याच भवितव्याच्या दृष्टीने खूपच गरजेचं आहे.
या भाजपा-संघाचं ‘आदिवासी-प्रेम’ (बरं, ते आदिवासींना, ‘मूळ रहिवासी’ या नात्याने ‘आदिवासी’ही म्हणत नाहीत…तर, त्यांचा ‘मूळ-निवासी’ म्हणून जंगलांवरचा पिढ्यानपिढ्या असलेला हक्क हिरावून घेण्यासाठी ‘वनवासी’ म्हणून हिणवत, दशकानुदशके त्यांचा घोर अपमान करत आलेले आहेत), त्यांच्याच “रामभक्ति किंवा हिंदुत्वा”सारखी बनावट-बेगडी भूमिका व एक राजकीय-नौटंकी आहे, हे या निमित्ताने सूर्यप्रकाशासारखं सुस्पष्ट झालंय…वाईटात चांगलं घडतं, ते असं!
इतःपर, राष्ट्राध्यक्षा द्रौपदी मुर्मू या प्रकरणात, बोटचेपीच भूमिका बजावणार असतील; तर दलित, आदिवासी किंवा मुस्लिम व्यक्ति, सर्वोच्च स्थानी अथवा सत्तेच्या मखरात बसवण्याला ‘टोकनिझम’ (Tokenism…An act of ‘deception’ that offers false pride without real power) किंवा ‘फुसकं-फसवं प्रतिनिधित्व’…यापलिकडे, काहीही अर्थ उरणार नाही. “जातीची माती करणार्‍यांची संख्या, या देशात उदंड झालीय” म्हणूनच, अशा जातीयस्वरुपाच्या ढोंगी राजकीय-प्रयोगांना, जनतेनं बळी पडू नये!

सरतेशेवटी, दाहक-जळजळीत सत्य हे की, झारखंडची जमीन, जंगलं, खनिजद्रव्यांसारखी नैसर्गिक-संसाधनं गौतम अदानीसारख्या ‘गोदी-उद्योगपतीं’ना (Crony Capitalists) ‘आंदण’ देण्याचा कट शिजलेला असून हेमंत सोरेन व त्यांचं काँग्रेससोबतचं सरकार, हे त्या मार्गातील मोठा अडसर होते. झारखंड उजाड करुन टाकण्याच्या मोठ्या ‘भांडवली-षडयंत्रा’चाच तो एक भाग आहे, हे सूज्ञ वाचकांस सांगणे न लगे… पण, अशा विपरीत स्थितीत, राहुल गांधींनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या दरम्यानच्या तेथील सभेत, “केंद्रात सत्तेवर आल्यास, झारखंडमधील आदिवासींच्या नैसर्गिक संसाधनांच्या स्वामित्वाचं सर्वोतोपरी संरक्षण करण्याचं”, दिलेलं ठाम आश्वासन, स्थानिक-आदिवासींच्या वेदनेवर फुंकर घालणारं, मलमपट्टी करणारं ठरलं असल्यास, नवल ते काय?

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)