‘प्रसाद गावडे’… ‘कोकण ते लडाख’

सावंतवाडीतील सांगेली गावच्या जायपेवाडीत रहाणारा ‘कोकणी-रानमाणूस’ म्हणजेच, सर्वांचा लाडका ‘प्रसाद गावडे’… ‘कोकण ते लडाख’, असं आपलं बोट धरुन फिरवत, देशातल्या निसर्ग-पर्यावरणीय समस्यांविषयी जे थोडक्यात प्रतिपादन करु पहातोय ते ऐकणं, हे आपल्या नातवंडांच्या आणि त्यांच्याही पुढील पिढ्यापिढ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं…
भाजपाई-संघीय ‘गुजराथी-लाॅबी’, ही भारतातील निसर्ग-पर्यावरणावरच फार मोठं संकट आहे…गुजराथच्या पातकी-भूमितून आलेल्या भांडवलदारवर्गाने आपल्या सैतानी हव्यासापोटी देशभरातला निसर्ग वेठीला धरुन पर्यावरण उध्वस्त करायला घेतलंय. पाशवी लालसेनं, राक्षसी तृष्णेनं भरलेल्या याच मातीत…अपवाद म्हणून जन्मलेला, आपला राष्ट्रपिता, महात्मा म्हणून गेला होता की, “सगळ्यांच्या मूलभूत गरजा भागवायला आपली पृथ्वीमाता सक्षम आहे…पण, एखाद्या व्यक्तीची तृष्णा, लालसा भागवायला मात्र नव्हे”, ते किती जाज्वल्य-ज्वलंत सत्य होतं, ते आज उद्भवलेल्या पर्यावरणीय महासंकटांमुळे उशिरा का होईना; पण, आपल्याला आत्ता कुठे हळूहळू समजू लागलंय!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष…भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही ‘हरित-पक्ष’…The First ‘Green-Political Party’ Of India)

https://www.facebook.com/share/v/ypBQptBre5CpDbUU/?mibextid=xfxF2i