रुद्रेश सातपुते यांच्या संदेशावरील प्रतिक्रिया….

रुद्रेशजी, उत्तर भारतीयांचं आक्रमण कधि ना कधि परतवता येईल किंवा प्रशांत किशोरसारख्यांच्या हातून नजिकच्या भविष्यात सुदैवाने बिहारचा कायापालट झालाच; तर, परिस्थितीत आमूलाग्र बदल एकवेळ होऊ शकेल (कारण, उत्तर भारतीयांकडे कितीही संख्याबळ असलं; तरी, धनसंपत्तीचं तेवढ्याप्रमाणात बळ नाहीच); पण, धनाढ्य गुजराथी-भाषिकांना निपटून काढणं, जेवढं अत्यावश्यक आहे, तेवढंच ते कमालीचं अवघड आव्हान आहे. कारण ‘महालक्ष्मी’ आणि महालक्ष्मीच्या प्रभावाने ‘राजलक्ष्मी’ त्यांच्या हाती एकवटली गेली आहे आणि विधिनिषेधशून्य-अनितीमान स्वरुपाची, त्यांच्या जमातीची ‘संघटन-शक्ति’, महाराष्ट्राचं अवघं जगणंच ग्रासून आहे…हे अनेकांना आकळत नाही किंवा ते साधं कबूल करण्याची ते हिंमत दाखवू शकत नाहीत व तेच महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे!
भांडवली-व्यवस्थेतल्या ‘कंत्राटी-कामगार पद्धत आणि आऊटसोर्सिग’च्या शोषण-दमन तंत्रातून ‘अस्तित्ववादी-गुलाम’ बनलेल्या उत्तर भारतीयांना, पोटापाण्यासाठी वणवण करणाऱ्या मायमराठ्यांविरुद्ध, महाराष्ट्राच्याच औद्योगिक नकाशावर उभे करत…उत्तर भारतीयांची व मराठ्यांची आपापसात ‘झोंबी’ लावून देणं, हे गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गाचंच षडयंत्र आहे! त्यात, आता भरीसभर म्हणून, कामगार-चळवळच साफ मोडून काढण्यासाठी चार काळ्या कामगार-कायद्यांची ‘काळी कामगार-संहिता’ गुजराथी-लाॅबी’कडून देशभर लादण्यात आलीय.
तेव्हा, भ्रष्ट-दलाल मराठी राजकारणी मनगटशहांचा हात धरुनच बळकट केला गेलेला…धनदांडग्या-मुजोर गुजराथ्यांचा महाराष्ट्रातला खुंटा हलवा, बाकी सगळे आपसूक निमूटपणे जागेवर येतील…

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)