हे ‘मंगळसूत्र’ आणि ते ‘मंगळसूत्र’….. कुठे इंदिरेचा ऐरावत आणि कुठे नरेंद्राची तट्टाणी…

फाळणीपूर्व दंगलींनी देश खिळखिळा झालेल्या अवस्थेतच, भारताला स्वातंत्र्य मिळालेलं…विकास-प्रक्रियेवर व पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चीनसारख्या बलाढ्य शेजार्‍याशी ‘हिंदी-चिनी भाई भाई’ करत, संबंध सौहार्दपूर्ण ठेवण्याखेरीज भारत-सरकारला गत्यंतर नव्हतंच…अशातच, चीनने पाठीत खंजीर खुपसत भारतावर १९६२मध्ये हल्ला केला! देशांतर्गत संसाधनांची मोठी वानवा होती. यास्तव, पं. जवाहरलाल नेहरुंनी आर्त स्वरात भारतीय जनतेला मदतीची हाक दिली. तेव्हा, त्यांची मुलगी ‘प्रियदर्शिनी’ (रवींद्रनाथ टागोरांनी दिलेली उपाधी) इंदिरा गांधी यांनी, आपले सगळेच्या सगळे जडजवाहीर, दागिनेच काय तर, आपलं ‘मंगळसूत्र’ देखील देशाला दान म्हणून देऊन टाकलं होतं… आपल्यापैकी किती जणांना याची कल्पना आहे?

…आणि ४ जूनला, शंभर टक्के ‘मावळते’ ठरणारे आजचे पंतप्रधान, सत्तालालसेपोटी वाटेल त्या थराला जात…”म्हणे, मुसलमानांची घरं भरण्यासाठी केंद्रात सत्तेवर येताच, देशातील गोरगरीब हिंदू भगिनींच्या गळ्यातलं ‘मंगळसूत्र’, काँग्रेस हिसकावून घेणार असल्याचा हिणकस कांगावा करतायत”.

…असा, अगदी खालच्या पातळीचा माणूस, पंतप्रधान म्हणून गेली १० वर्ष देशाला मिळाला, हे देशाचं केवळ दुर्भाग्यच नव्हे; तर, फार मोठं वैचारिक दारिद्र्यही आहे!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)