“करारबद्ध गुलाम” (Contractual Slaves)…अमेरिकेत स्थायिक होऊ पहाणार्या कर्मचाऱ्यांसंदर्भात, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी केलेल्या वक्तव्यावर, म्हणे भारत-सरकार नाराज…!!!
…एवढा बेशरमपणा, कोडगेपणा आणि नालायकी, फक्त आणि फक्त, भाजप-संघीय सत्ताधारीच दाखवू जाणे!
—————-
…जेव्हा, भारतीय-स्थलांतरितांना विमानात साखळदंडाने हातपाय बांधून, मनोरुग्ण असलेल्या हिंसक-खुनी गुन्हेगारांसारखं, विमानातून डांबून आणलं जात होतं…तेव्हा, काय या मोदी-शहांची दातखीळ बसली होती काय? आता कसा काय, त्यांना एकदम कंठ फुटलाय??
…तो यासाठी कारण, मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेशकुमार गुप्ता (‘गुप्त’ राखलेल्या ‘गुप्ता’ आडवानावरुनच, काय ते समजा), या लोकशाहीच्या तिजोरीवर लपतछपत दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोराला… त्याच्या असंविधानिक, बेकायदेशीर ‘मतचोरी’ला, द्वारा-सीमा खन्ना (Via Seema Khanna), सहाय्यभूत ठरणाऱ्या सरकारच्या लाडक्या ‘टाटा कन्सलटन्सी’ला (TCS) आणि देशी कामगार-कर्मचारीवर्गाला बैलासारखे “आठवड्याचे ७० तास काम करा”, असं ‘सरकारी-दलाली’ करत बजावणाऱ्या (वा)नरायणमूर्तीच्या ‘इन्फोसिस’ला अमेरिकन-प्रशासनाचं नवं धोरण मोठं अडचणीचं ठरु लागलंय म्हणूनच ना…???
…बरं, देशातील संविधानिक-लोकशाही संस्था (बहुतांश न्यायालयेसुद्धा) बेकायदेशीरपणे ताब्यात घेणाऱ्या व निवडणूक-आयोगाला आपल्या ताटाखालचं मांजर बनवणाऱ्या…भाजप-संघियांनो, तुम्ही देशातल्या कामगारविश्वात यासंदर्भात काय उत्पात माजवून ठेवलाय? लष्करात ‘अग्निवीर’ व उद्योग-सेवा क्षेत्रात “४ काळ्या कामगार-संहितां”द्वारे, करोडोंच्या संख्येने “करारबद्ध गुलाम” (Contractual Slaves) बनवणारे, तुम्ही लोकचं ना? …मग, आता कशाला ‘कोल्हेकुई’ करताय…कोणाला ‘नक्राश्रू’ ढाळून दाखवताय?
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष आणि धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)

