“वाचाल, तरच वाचाल” !!!

(मित्रहो, राजन राजे यांच्या ‘तळमळी’तून साकारलेला, हा केवळ एक ‘लेख’ नसून ‘मराठी’ सद्यस्थितीचा ‘शिलालेख’ आहे…. कृपया, कुठुनही व कसाही आपला थोडासा, मूल्यवान असा वेळ काढून आपण तो वाचावाच, ही आमची आपल्याला ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे नम्र विनंति आहे….

बहुश: मिडीया हा, प्रिंट(वृत्तपत्र) असो वा इलेक्ट्रॉनिक(दूरदर्शन वाहिन्या), तो ‘शेठजी-संस्कृती’च्या किंवा राजकारण्यांच्या मालकीचा…. मग, त्यांनीच केलेल्या ‘कोंडी’मुळे घुसमटलेला आपला ‘आतला मराठी-आवाज… आक्रोश’ बाहेर कसा घुमेलं ? ‘सोशल-मिडीया’ आणि अशी स्वखर्चानं काढलेली पत्रकं… एवढाच पर्याय आपल्याला जनजागृतीसाठी उरतो, हे कृपया समजून घ्या !

तेव्हा, यापुढे मराठी माणसानं केवळ, ‘वाचाळ’ राहून कसं चालेलं ???…. असे ज्वलंत लेख, “वाचाल, तरच वाचाल”!!!)

पर्यावरणवादी विचारवंत,…. नैसर्गिक शेती व जलसंधारणाचा केवळ पुरस्कारच नव्हे; तर, ठाणे जिल्ह्यात(ता. मुरबाड, मौजे-साखरे) गेली काही दशके ‘ऋषी-कृषि’चा  सुफळ-संपूर्ण प्रयोग करणारे हाडाचे ‘शेतकरी’…. तसेच, हजारो कामगारांच्या जीवनात समृद्धिच्या प्रकाशाची ‘मशाल’ धरणारे( एकही ‘कंत्राटी कामगार-कर्मचारी’ नसलेल्या, सुल्झर पंप्स, दिघा-नवी मुंबई… कंपनीत गेली सलग सात वर्षे, एक लाखाहून अधिक बोनस व सरासरी मासिक वेतन पन्नास हजार रुपयांहून अधिक; तसेच, अनेक कंपन्यांमधून भव्यदिव्य बोनस आणि पगारवाढीचे शास्त्रशुद्ध व पराकोटीचे प्रामाणिक करार!) व सेवा-उद्योग क्षेत्रातील ‘गुलामगिरी’ व ‘नव-अस्पृश्यता’ असलेल्या “कंत्राटी-कामगार पद्धती” विरुद्ध ‘धर्मयुद्ध’ पुकारणारे…..  तसेच, सडलेल्या राजकीय-व्यवस्थेच्या आमूलाग्र परिवर्तनाचा एल्गार पुकारत, गेल्या दोन वर्षापूर्वी  ‘धर्मराज्य पक्षा’ची स्थापना करणारे,
….. ‘राजन राजे’ यांना ‘मराठी-तरुणाई’च्या सद्यस्थितीबद्दल नेमकं काय म्हणायचयं…???

मित्रहो,
काळ मोठा कठीण आलायं… ज्या वयात, सर्वसाधारणपणे लोकांना निवृत्तीचे वेध लागतात, त्या ‘साठी’च्या घरात आम्ही राजकारणाची ‘साठमारी’ नेमकी कोणासाठी व का करतोयं?

….कारण, गेल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातील कामगार, शिक्षण, आरोग्य; तसेच, पर्यावरण इ. सामाजिक क्षेत्रातील आमच्या अनुभवानं, हे आम्हाला सुस्पष्टपणे दाखवून दिलयं की, सर्व प्रस्थापित राजकीय पक्ष, हे एकाच माळेचे मणि आहेत…. “प्रत्येक पक्षाचा फक्त ‘झेंडा’ वेगळा, ‘अजेंडा’ मात्र एकच, तो म्हणजे सर्वसामान्य जनतेला लुटण्याचा आहे!” देशात, ‘विरोधी पक्ष’ असं फारसं काही अस्तित्वातच नाही… आहे ती सगळी ‘मिलीभगत’ वा आपापले राजकीय-आर्थिक हितसंबंध सांभाळण्यासाठी केलेली छुपी हातमिळवणी! याच दीर्घकाळच्या अनुभवानं आम्हाला हे ही शहाणपण शिकवलय की, भारतात इतर कोणाचीही नसेल, एवढी ‘कोंडी’ महाराष्ट्राच्याच लालकाळ्या मातीत मराठी माणसाची, परप्रांतीयांकडून झालेली आहे. “उद्योग-व्यापार-व्यवसाय-मिडीया (वृत्तपत्रं व वाहिन्या)…. जैन-गुजराथी-मारवाडी-सिंध्यांच्या खिशात; तर, ‘नोक-या’ उत्तर भारतीयांच्या घशात…. मग, सर्वसामान्य मराठी माणूस नेमका उरलायं कशात???”…  अशी यासंदर्भात, गंभीर स्थिती आहे… आणि याला प्रामुख्याने जबाबदार आहेत ती, महाराष्ट्रात गेली ४०-४५ वर्ष, ढोंगी व फसवं राजकारण करणारी, दोन मोठी निव्वळ ‘घराणेबाज’ राजघराणी! या घराणेबाज राजकारण्यांनी, स्वत:ची आणि आपले बगलबच्चे असलेल्या टोळभैरवांच्या(तथाकथित कार्यकर्ते व पक्ष-पदाधिकारी) तुंबड्या, ‘श्रमाविना’ (खंडणी व टक्केवारी संस्कृति!) भरण्यासाठी, ‘गुर्जर-मारवाडी संस्कृति’ला धंदा-व्यवसायासाठी महाराष्ट्राच्या सीमा नुसत्याच सताड उघड्या करुन दिल्या असं नव्हे; तर, त्यांच्या गडगंज प्रॉपर्टीच्या इमल्यांचे, ठाण्या-मुंबई-महाराष्ट्राचे राजकारणी ‘डॉन’, ‘हृदयसम्राट’ किंवा तथाकथित ‘जाणते राजे’, हे  भागीदार व रखवालदार बनले…. आणि, अवघ्या महाराष्ट्राला दृष्ट लागली. ‘चूड दाखवून वाघाला बोलवल्या’सारखी ही ‘गुर्जर-मारवाडी संस्कृति’ची अवदसा, या घराणेबाज राजकारण्यांपायी महाराष्ट्रात सर्वत्र हातपाय पसरु लागली. महाराष्ट्रात या अवदसेमुळे औद्योगिक-विकास झपाट्याने झाला खरा; पण, त्यातून “महाराष्ट्रात निर्माण झालेली अफाट संपत्तीचं महाराष्ट्राच्या व महाराष्ट्रातल्या मूळ मायमराठी माणसाच्या मुळावर आली!” महाराष्ट्रात, वर्षाचे बारा महिने-दिवसाचे चोवीस तास, स्वार्थानं अंध झालेल्या या राजकारण्यांच्या आशिर्वादाने, महाराष्ट्राची ‘महालक्ष्मी’ मूठभर गुजराथी-मारवाड्यांची बटिक बनू लागली…. सोबत, संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकारामांसारख्या संतामहंतांची पवित्रभूमी असलेला निसर्गसंपन्न महाराष्ट्र, या पैशाचिक-संस्कृतिकडून ओरबाडला जाऊ लागला…. महाराष्ट्राची जंगलसंपत्ती-निसर्गसंपदा, हवा, पाणी, जमीन कायमची प्रदूषित झाली. महाराष्ट्राच्या पिढ्यापिढ्यांच्या ‘दुहेरी’ हानी-नुकसानीचा कधिही न थांबणारा घातक सिलसिला सुरु झाला. बाजारपेठेत किंमत घटलेल्या मराठी समाजाचं राजकीय व सामाजिक अध:पतन अटळ ठरलं. आपल्याच राज्यात… शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात, तो ‘दुय्यम दर्जाचा नागरिक’ बनला ! एका बाजुला दलाली करणारी भ्रष्ट मराठी राजकारण्यांची व सरकारी अधिका-यांची फौज; तर, दुस-या बाजुला ही लुटमार करणारी ‘गुर्जर-मारवाडी संस्कृती’….. अशा दुहेरी पेचात सापडलेल्या सामान्य मराठी माणसाची अवस्था पिंज-यात सापडलेल्या व्याघ्रासारखी नव्हे; तर, त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ‘उंदरा’सारखी झालीयं….. तो या ‘कोंडी’तून सुटका करुन घेण्यासाठी पिंज-याला केविलवाण्या धडका देण्याचा प्रयत्न करतो व थकला की, पुन्हा ज्यांनी ही कोंडी केली त्यांनाच शरणागत होतो…. आणि मग, “अन्यायाच्या दारातच, न्याय मागण्यावाचून त्याला गत्यंतर रहात नाही !” अशावेळी, किंवा निवडणूक प्रसंगी, काही रुपये-पैसे त्याच्या अंगावर फेकले जातात( की जेव्हा, त्याच्या शेकडो पटीनं ते अगोदरच त्याचा ‘घाम’ स्वस्तात विकत घेऊन वसूल केले गेलेले असतात आणि, ती ‘कापूसकोंड्या’च्या गोष्टीसारखी कधिही ‘न’ संपणारी एक विकृत प्रक्रिया बनलेली असते! ) त्या तेवढ्या थो़डक्या रकमेनं, ‘मराठी आत्मे’ सर्रास हातोहात विकले जाताना हताश होऊन पहावं लागतं आणि दलाल राजकारण्यांच्या मागे गोंडा घोळत…. त्यांनी फेकलेले तुकडे चघळत फिरणारी मराठी-तरुणाईची ‘श्वानवृत्ती’, आफ्रिकेतल्या ‘इबोला’सारखा भयंकर फैलावणारा, जणू एक संसर्गजन्य रोग बनते! ज्या सोन्यासारख्या ‘मराठी-संस्कृती’त आमच्या माता-भगिनी, …आपला पिता, पती, बंधू किंवा मुलगा यांच्याखेरीज कुठल्याही परपुरुषाकडून कधि ‘साडीचोळी’ स्विकारण्याचा विचारही मनात स्पर्शू देत नव्हत्या; तिथे,  निवडणुकीदरम्यान केवळ साडीचोळीचं नव्हे, तर त्यांच्या आत दडलेल्या को-याकरकरीत हजारांच्या नोटांसाठीसुद्धा सर्रास आमच्या मराठी-मायभगिनी रांगा लावायला लागल्या. मराठी अधोगतीचा हा प्रवास, नेमका कुठे थांबायचायं? रामायणात ‘वाल्या’च्या पापात सहभागी व्हायला त्याच्या स्वत:च्या कुटुंबियांनीसुद्धा साफ नकार दिला होता…. आता मात्र, आम्ही निवडणुकीत किंवा इतर प्रसंगी, पातकी राजकारण्यांनी फेकलेले मेहेरबानीचे तुकडे वरचेवर झेलण्यासाठी एकमेकांच्या उरावर चढतो आणि राजकारण्यांच्या महापातकांचे ‘भागीदार’ होण्यात धन्यता मानतो. केवढा हा दैवदुर्विलास आहे?

राजकारण, हा एकदा बिनभांडवली धंदा बनला की, यापेक्षा वेगळं काही घडतं नाही….. घडू शकत नाही. परिस्थिती अशी आहे की, “२० वर्षाच्या गुजराती-मारवाडी तरुणाला जी व्यावहारिक व राजकीय समज आहे ती, ६० वर्षांच्या मराठी प्रौढालादेखील नाही….. तो रामायण ऐकतो आणि दुस-याच क्षणी, ‘रामाची सीता कोण’, असा प्रश्न करतो!”… या दुर्दैवी स्थितीचा फायदा चमचमीत व चकचकीत भाषणं करु शकणा-या नौटंकी नेत्यांनी घेतला नसता, तरच नवल ! तसा तो, आजवर यथास्थित घेतला गेल्याचीच कटू व विषारी फळं मराठी समाज भोगतोयं… अजूनही भोगणार आहे! ‘आमची माती…. आमची माणसं’, मागे पडून ‘आमच्याच माणसांनी (घराणेबाज भ्रष्ट राजकीय नेते) आमची केलेली माती….. उदा. ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी’, ‘कंत्राटी-शिक्षक/प्राध्यापक’, पोलिस, वॉचमन, पोस्टमन, लिफ्टमन इ. नात्यानं, व्यवस्थेकरवी पायदळी तुडवली जाऊ लागली… ही ‘जिवंतहाडामांसाची मराठी-माती’ पायदळी तुडवणारे पापी ‘पाय’ गुजराथी-मारवाडी शेठजींचे आणि त्यांच्याशी ‘आर्थिक-सोयरिक’ जमवून बसलेल्या भ्रष्ट राजकारण्यांचे आणि नोकरशहांचे होते! बेलगामपणे उभ्या राहणा-या वैभव-संपत्तीच्या इमल्यांखाली राजरोस दडपला जाणारा आवाज, सामान्य मराठी माणसाचा होता…. करोडो मराठी आत्म्यांचा तो आक्रोश ऐकायला, आता त्यांच्या महाराष्ट्रातच कुठे राजकारण्यांचे ‘कान’ उरले नव्हते. मग, त्यांच्यासाठी धडकणा-या राजकारणी ‘हृदयां’ची बातच कशाला? आपल्या जगण्याचे सगळे दोरच मराठी माणूस, या ढोंगी घराणेबाज राजकारण्यांच्या नादानं, धनवैभवात लोळणा-या मस्तवाल ‘गुर्जर-मारवाडी संस्कृति’च्या हाती देऊन बसला होता.

शिवछत्रपतींनी राज्याची घडी बसवताना जर कुठली पहिली गोष्ट केली असेल तर, ती नाडल्या गेलेल्या ‘कुळां’ना स्थिरता देण्याची…. याचाच अर्थ, आजच्या परिभाषेत ‘कंत्राटी’ कामगार-कर्मचा-यांना शिवछत्रपतींनी सेवेत ‘कायम’ केलं! ….आणि, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आपला राजकारण नांवाचा ‘धंदा’ व्यवस्थित चालू रहावा म्हणून तथाकथित ‘शिवशाही’चा निरंतर जप करणा-या आमच्या मराठी राजकारण्यांनी काय केलं, तर कामगार-कर्मचा-यांना ‘कंत्राटी’ बनवून त्यांच्या जीवनातली ‘स्थिरता’ संपुष्टात आणली व त्यांचं टोकाचं शोषण करण्याकामी ‘गुर्जर-मारवाडी संस्कृती’ला ‘रान मोकळं’ करु देण्याच्या पापकर्मात आनंदाने पुढाकार घेते झाले…. त्यांच्या कृपे(?)नं, श्रमिक-मराठी रक्ताचा जागोजागी लिलाव पुकारला जायला लागला. कंपन्यांकडून ‘ठेके’ घेऊन दादागिरीच्या व राजकीय ताकदीच्या बळावर ‘कंत्राटदारी’चा बिनभांडवली बक्कऴ नफ्याचा धंदा करणारे हे ‘राजकारणी-ठेकेदार’, आपल्याच मराठी-रक्ताकडून एकप्रकारे ‘जिझिया-कर’ आजवर वसूल करते झालेत! ‘शिवजयंत्या’ साज-या करायच्या, शिवछत्रपतींचे पुतळे जागोजागी उभे करायचे; पण, कारभार ‘औरंगजेबा’पेक्षाही जुलमी करायचा… हे, मराठी-राजकारणाचं सोपसुटसुटीत नवं तंत्र बनलं. एका ‘बाबासाहेबा’नं हजारो वर्षांची ‘अस्पृश्यता’ अथक प्रयत्नांनी संपुष्टात आणली; तर, या सर्वपक्षीय ‘राजकीय-दुकानदारसाहेबां’नी ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी प्रथा’ नांवाची ‘नवी-अस्पृश्यता’ रुजवायला घेतली! या ‘नव-अस्पृश्यते’ला जन्माची जात नसली; तरी, जन्माचं पोट आहे…. आणि ते पोट, ‘अर्धपोटी’ आहे, कंत्राटातला ‘रोजगार’ हा त्या पोटावर ‘रोजमार’ आहे! पूर्वी जशी दलितांवर माणुसकीला काळीमा फासणारी सामाजिक बंधनं होती… तशीच, बंधनं आता ‘कंत्राटी-कामगार/कर्मचा-यां’वर आली. कायम कामगारांचा पगार नाही, बससेवा-कँटीनसेवा नाही, कपडे बदलण्याच्या जागा वेगळ्या, कायम-कामगार/कर्मचा-यांशी बोलायची बंदी, नोकरीच्या ‘सुरक्षिततेचा तर पत्ताच नाही…. थोडक्यात, त्यांची अवस्था पाय पुसण्या’सारखी म्हणजेच “यूज् अँड थ्रो”, अशी ‘गुलामांपेक्षाही वाईट करण्यात आलीयं. अवघ्या कामगार-विश्वाला ‘डिव्हाईड अँड रुल’ या ब्रिटीश पद्धतीनं विभागण्यात येऊन, त्याचं रुपांतर जणू एका ‘दुमजली वास्तू’त करण्यात आलयं….  कायम-कामगारांचा ‘वरचा मजला’ हा निवृत्ती, स्वेच्छा वा सक्तिची निवृत्ती, मृत्यु इ. कारणांमुळे रिकामा होत चाललायं…. तळमजला हा ‘कंत्राटी-कामगार/कर्मचा-यां’चा, जिथे रोज नव्यानं भरती होत असल्यानं प्रचंड रेटारेटी आहे (त्यात उत्तर-भारतीयांची रोजची मोठी भर); पण, तळमजल्यावरुन वरच्या, कायम-कामगारांच्या मजल्यावर जायला ना शिडी, ना जिना, ना लिफ्ट अशी ‘कोंडी’ आहे…. आणि, हा ‘चक्रव्यूह’ भेदण्याचा जीवाच्या करारावर प्रयत्न करणा-या आमच्यासारख्यांना राजकीय साथ देण्याची ना समज, ना बुद्धी, ना इच्छाशक्ती त्या ‘गुलामां’कडे आहे…. असं सगळचं मोठं अवघड गणित होऊन बसलयं!

सर्वपक्षीय राजकारणी-देशीविदेशी उद्योगपती-नोकरशहा, या सैतानी ‘त्रिकूटा’च्या गुन्हेगारी संगनमतातून प्रसवल्या गेलेल्या ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी’प्रथेमुळे…. जे, ‘बेकार-भत्त्या’च्याही लायकीचं नाही; अशा ‘किमान-वेतना’वर नोकरीला लागायचं आणि त्याच दळभद्री ‘किमान-वेतना’वरच निवृत्त व्हायचं, ….हा जणू, मराठ्यांना उध्वस्त करणारा, ‘आधुनिक व्यवस्थापकिय-मंत्रतंत्र’ बनला! ……प्रत्येक मराठी गृहिणीला नोकरीसाठी घराबाहेर पडणं अपरिहार्य बनलं; कारण, नव-याच्या तुटपुंज्या पगारातून (‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी’ गुलामी-प्रथेच्या ‘बॅक-प्रेशर’मुळे स्वाभाविकच वेतनमानात कमालीची घसरण झाली!) या महागाईत संसाराचा गाडा हाकणं, केवळ अशक्य बनलं. घरटी ‘दोन पगार’, हा जणू प्रत्येक मराठी-घरातला अपरिहार्य असा शिरस्ताच बनल्यानं, एका अर्थानं खरं म्हणजे, पूर्वीच्या तुलनेत पगार ‘निम्म्यावर’ आले ! आयुष्यभर तुटपुंज्या पगारात काम करत, नोकरी टिकवण्याची कसरत करत…. कसेबेसे निवृत्त झालेले व मुलांची महागडी शिक्षणं पार पाडता पाडता; तसेच, कुटुंबाच्या आजारपणावरचे न झेपणारे खर्च भागवता भागवता, जीव मेटाकुटीला आलेले… व त्यामुळेच, निवृत्त होताना डोक्यावर कर्जाचा डोंगर करुन बसलेले कामगार-कर्मचारी हल्ली, अगदी हातपाय पूर्णपणे थकेपर्यंत ख-या अर्थानं निवृत्त कधि होऊच शकत नाही…. ते मग मरेपर्यंत, पूर्वीसारखा नातवंडांबरोबर सुखाचा वेळ घालवण्याऐवजी, कुठे ना कुठे किमान ‘सुरक्षारक्षक’ (वॉचमन) म्हणून संसाराची फाटलेली गोधडी शिवत, नाईलाजाचा ‘टाईमपास’ करताना दिसतात… या सगळ्याचा अर्थ एकच, सर्वसामान्य मराठी-घरांतल ‘सौख्याचं गृहिणीपण’ आणि ‘निवृ्त्ति’ संपली… आणि आयुष्यभराची, हाड न् हाड झिजवणारी वणवण, मराठी-घरांच्या नशिबी आली…. ज्या मराठी-घरांमध्ये विवाहापश्चात उंबरठ्यावरचं ‘माप ओलांडून’ लक्ष्मी आत प्रवेश करती व्हायची, त्या मराठमोळ्या घरांमध्ये ‘कंत्राटी-कामगारपद्धती’मुळे अवदसा आत शिरली! गुर्जर-संस्कृतितल्या धनसंपन्न घरातल्या स्त्रिया, सदैव किटी-पार्ट्या, हॉटेलिंग, चकचकीत मॉलटॉलमधल्या शॉपिंगमध्ये रममाण झालेल्या दिसत असतानाचं…. हे, अस्वस्थ करणारं चित्र आहे.

….आणि, आता या अशा, ‘गुर्जर-संस्कृति’कडून (‘दमडी जाय पर चमडी न जाय’ अशा हिणकस व्यापारी-मनोवृत्तीच्या, ज्या संस्कृतीनं, देशासाठी कधि रक्त सांडल्याचं ऐकिवात नाही…. ज्यांनी, मराठी राजकारणी-सरकारी अधिकारी यांच्या गुन्हेगारी साथीनं महाराष्ट्राच्या तमाम ग्राहकवर्गाचं कित्येकं दशकं तराजूतलं ‘वजनमाप’ मारलं, महाराष्ट्राच्या अन्नधान्य-किराणा मालात भेसळ करत धंदे वाढवत नेले, महाराष्ट्राचं टोकाचं शोषण केलं, महाराष्ट्राला ‘भ्रष्टाचार’ नांवाचा ‘शिष्टाचार’ ज्यांनी शिकवला!),…. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत, ‘पार्श्वभागा’वर लाथा बसल्यानंतर, या ढोंगी-बदमाश राजकारण्यांना अचानक साक्षात्कार झाला… आणि, या ब्रिटीशांसारख्या ‘विस्तारवादी’ (Expansionist) व ‘साम्राज्यवादी’ (Imperialist) गुर्जर-संस्कृतिविरुद्ध ते एका सुरात गरळ ओकायला लागले, …..आजवर मराठी-माणसाच्या नांवाने केवळ ‘गळा’ काढणा-या(प्रत्यक्षात गळा कापणा-या); पण, त्या भांडवलावर आपला ‘गल्ला’ जमवणा-या तथाकथित मराठीनेत्यांवर, हा नियतीनं उगवलेला सूड होता! …. तरीही, हे ध्यानात नीट ठेवलं पाहीजे की, ही ‘गुर्जर-संस्कृति’विरुद्धची त्यांची मतलबी ओरड तात्पुरती आहे. त्यात ख-या अर्थानं सामान्य मराठी माणसाच्या हिताचा वा कल्याणाचा विचार बिलकुल नाही. तसा विचार असता; तर, हे फसवे ‘राष्ट्रवादी’ (जे साधे ‘महाराष्ट्रवादी’ ही नाहीत… पण, पक्के ‘भ्रष्टाचारवादी’ मात्र जरुर आहेत!), अवलक्षणी ‘हात’वाले व ढोंगी ‘चुलतसेना’,…. किमान, १) लोकसंख्येच्या विस्फोटाला कठोरपणे रोखणे, २) ‘जनलोकपाल/लोकायुक्त’, ३) श्री. अनिल बोकिलप्रणित ‘अर्थक्रांति-संकल्पना’, ४) परवडणारी घरकुलं, ५) दर्जेदार व  सामान्यांच्या खिशाला सहजी परवडणारी सार्वजनिक शिक्षण व आरोग्यसुविधा, ६) कंत्राटी-कामगार/कर्मचारी प्रथा उच्चाटन, ७) पर्यावरणस्नेही-विकास व निसर्गस्नेही जीवनशैली, ८) रु.२५,००० एवढं सन्माजनक किमानवेतन, ९) शेतमालाला रास्तभाव व १०) सेंद्रियशेती….. याबाबतीत निदान, प्रामाणिकपणे आग्रही तरी दिसले असते (केवळ वरपांगी, सवंग लोकप्रियता मिळवू पाहणारी, ‘कॉस्मेटिक’ बडबड आणि ‘बोलाचीच कढी व बोलाचाच भात’ अशा त्यांच्या ‘विकास -मॉडेल वा ब्ल्यू प्रिंट्स-चर्चा’, आजवर खूप झाल्या!)…. “सतिश शेट्टी, नरेंद्र दाभोळकर या समाजहितैषी सज्जनांच्या हत्यांचे ‘बोलवते धनी’ असलेल्या बड्या हत्यारी धेंडांना, त्यांनी विधिमंडळात उघडं पाडलं असतं… १०० पेक्षा कमी कामगार-कर्मचारी असणारे उद्योग-व्यवसाय सरकारी परवानगीविना बंद करायला वा ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी’ नांवाची ‘गुलामगिरी’ व ‘नवअस्पृश्यता’ आणायला अगदी अहमअहमिकेनं, ‘धनुष्यबाणा’नं,… ‘कमळा’ला वा ‘घड्याळ-हाता’ला साथ दिली नसती “….पण, हे आपल्याच रक्ताला फसवणारं राजकारण, समजतं कोणाला? पुढच्या काळात, याच ‘शेठजी-संस्कृति’शी सेटींग पार पडलं की, विरोधाचा सूर जसा ‘धूमकेतू’सारखा अचानक उपटला; तसाच तो कोणे एके दिवशी कधि गायब होईल, ते भोळ्या मराठी जनांना कळणारसुद्धा नाही. ‘गुजरात-मॉडेल’चे आजवर जणू ‘ब्रँड-अँबेसेडर’ असलेले एक ‘चुलतसेनानायक’ निवडणुकीतील प्रचाराच्या भाषणात, तमाम मराठी तरुणांना १० ते १५ हजार ‘रुपड्यां’च्या ‘वॉचमन’च्या दिड लाख नोक-यांचं गाजर दाखवू पहातातं… यापेक्षा अधिक, मराठी तरुणाईची क्रूर थट्टा, ती कोणती असणार? स्वत:च बडे ‘बिल्डर’ असलेले वा त्यांच्याशी भागिदारी असलेले, हेच राजकारणी नेते, ‘बिल्डरगिरी’ संपविण्याची व स्वस्तात घरं देण्याची भाषा करणार… मित्रांनो, काय हा विरोधाभास? …केवढं हे मराठी लोकांना ‘ऊल्लू बनाविंग’! या सगळ्यातील, एक ‘व्यवस्था-संगनमता’चे काही धागेदोरे, आमच्या ‘हुरळली मेंढी लागली……’, अशा भाबड्या मराठी तरुणाईच्या ध्यानात येतायत की, नाही… कोणास ठाऊक?

याच ‘शेठजी-संस्कृति’च्या अवदसेमुळे महाराष्ट्रात, ‘उत्तम शेती, मध्यम धंदा’ यानंतर नोकरीला ‘कनिष्ठ’ मानणारी ‘मायमराठी-संस्कृति’ लयाला जाऊन ‘नोकरी’च्या गुलामीनं शब्दश: ‘मराठी जगणं’ व्यापून टाकलं. मराठी माणसं ‘झोपाळ्यावाचून झुलायला लागली’…. एवढचं नव्हे, तर या राजकारण्यांच्या नादानं, असं भासमय किंवा ‘व्हर्च्युअल’ झुलणच त्यांनी ‘रोजमर्रा की जिंदगानी’ म्हणून स्विकारलं. मग, ऊत येऊ लागला तो, ज्याला ‘मास-हिस्टेरिया’ किंवा ‘मास-हिप्नॉटिझम’ म्हणतात, अशा सार्वजनिक सण-उत्सव, सत्यनारायण पूजाअर्चा-गणेशोत्सव, दहीहंड्या, गुजराथ्यांकडून उसने घेतलेले गरबे, महापुरुषांच्या जयंत्या-मयंत्या यांना…. ही केवळ झिंग आणणारी ‘अफूची मात्रा’ नव्हती, तो कालही आणि आजही मौजूद असणारा, अवघ्या मराठी समाजमानसाला ग्रासणारा ‘अॅनॅस्थेशिया’ होता, ज्याची कटू फळं मराठी पिढ्यापिढ्यांना भोगायला लागणार आहेत! नादान नेत्यांच्या नादानं, प्रत्येक सण-उत्सवाचं निमित्त साधत, “जय भवानी… जय शिवाजी” म्हणोनं, हातात वर्गणीची ‘पावती-पुस्तकं’ घेत (आयुष्यभर मराठी ग्राहकांना लुटणा-या) ‘गुर्जर-मारवाडी संस्कृती’कडे भिका मागत फिरणारी, अध:पतित व दिशाहिन मराठी-तरुणाई…. हे सुद्धा, त्याचच एक किळसवाणं ‘बाय-प्रॉडक्ट’ आहे !

थोडं ‘स्वहित’ बाजुला ठेऊन व ‘घराणेबाज राजकारण्यां’ची वैचारिक गुलामगिरी बाजुला ठेऊन, मराठी पायाखाली काय जळतयं….. जळतं आलयं, ते आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतल्या प्रत्येक मराठी माणसानं जरा पाहायला हवं. घराणेबाज व ढोंगी राजकारणाचे घातकी परिणाम सामान्य मराठी घरांवर पहायचे असतील, तर नगरानगरांमध्ये फिरुन…..व घराघरांमध्ये डोकावून ते पहावे लागतीलं. हे आम्ही सगळं फार फार जवळून पाह्यलयं. तरी हे भोग भोगणारे शापित जीव, त्या विश्वासघातकी राजकारण्यांचीच पूजा रचताना पाहून मनाला आमच्या काय क्लेश होत असतीलं?  ज्या समाजात आपण जन्माला आलो, वाढलो…. त्या समाजाचं आपण काहीच देणं लागत नाही??? मनापासून मानलं तर सगळं आहे; नाहीतर आहेच, आपल्या चौकोनी-षट्कोनी कुटुंबाच्याच भल्याचा फक्त विचार, …जो आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतला प्रत्येक मराठी घरगृहस्थी करतोयं…. आजवर करत आलायं! ज्यांना हरघडी आपण आळशी-बदफैली म्हणून हिणवतो, त्या प्रत्येक मराठी सामान्य घराघरातली फक्त संपत्तीचं नव्हे; तर, ‘बुद्धी’ आणि ‘नीतिमत्ता’सुद्धा घातकी “व्यक्तिपुजे”च्या नादानं महाराष्ट्रात (विशेषत: मुंबई-ठाण्यात) गेल्या ४५-५० वर्षांत ओरबाडली गेलीयं. त्या संतापाचा ज्वालामुखी आमच्या अंतरी निरंतर धगधगता असतो, पुन्हा त्याचं ‘विश्वासघातक्यां’च्या पालख्या कोणी जवळच्या व्यक्तींनी खांद्यावर उचलल्या की, तो अनावर होऊन बाहेर पडतो… असो!!!

जेव्हा, खुज्या उंचीच्या ठेंगण्या भ्रष्ट, संधिसाधू, स्वार्थी व घराणेबाज राजकारण्यांच्या लांबच लांब सावल्या महाराष्ट्राच्या राजकीय कॅनव्हासवर पसरायला लागल्या….. पाच-साडेपाच फूट उंचीच्या ‘राजकीय-व्यक्तिमत्वां’च्या ‘अहंकारां’ची उंची त्या संधिप्रकाशात पाचशे-साडेपाचशे फूट दिसायला लागली…. तेव्हाच, केवळ मराठी-अस्मितेचाच नव्हे; तर, ‘ स्वाभिमानी मराठी-अस्तित्वा’चा, मराठी-संस्कृतीचा आणि एकूणच महाराष्ट्रातल्या ‘मराठीपणा’चा ‘सूर्यास्त’ जवळ आल्याची लक्षणं दिसू लागली होती. पण, ‘जागृतते’चा लवलेश नसलेले, उघडे मराठी डोळे त्या ‘सूर्यास्ता’ची काळोखी चाहूल टिपण्यास असमर्थ ठरले! महाराष्ट्रात, तथाकथित ‘विकासा’चा उष:काल होता होता, सर्वसामान्य मराठी-माणसासाठी ‘काळरात्री’ची पेरणी झाली. सर्वसाधारणपणे, ग्रामीण भाग वगळता, सामान्य मराठी माणूस म्हणजे कारखान्यात काम करणारा कामगार! आणि, कारखान्यांना कालही, आजही व उद्यादेखील महाराष्ट्राची, महाराष्ट्रातल्या कायदा-सुव्यवस्था व औद्योगिक संस्कृतीची नितांत गरज राहील. त्यामुळे, “मराठी कामगार-कर्मचारी सन्मानाने जगला, तरच कारखाना महाराष्ट्रात जगेल”, अशी ‘भीमगर्जना’ करण्याऐवजी, महाराष्ट्राच्या खुज्या राजकीय नेतृत्त्वानं भांडवलदारांच्या इशा-याने,” कारखाना जगला, तरच कामगार जगेल “, असा एक मोठा ‘न्यूनगंड’ सगळीकडे पसरवून दिला…. ज्यामुळे, ९० टक्के सामान्य मराठी माणसाच्या ‘आत्मविश्वासा’चं जाणिवपूर्वक व पद्धतशीररित्या ‘खच्चीकरण’ करण्यात आलं. कामगार-आंदोलनं इतिहासजमा झाली. सवयीनं आणि सरावानं मराठी तरुणाई ‘जय भवानी, जय शिवाजी’ पुटपुटत राह्यली; पण, आता त्यातलं ‘मावळेपण’ संपलं होतं. नोकरी जाण्याच्या भितीनं उंदरासारखी भेदरलेली मराठी तरुणाई, उत्तरभारतीयांसारखीचं आंदोलनं व नीतिमत्तेशी काडीमोड घेतं, ‘अस्तित्ववादी’ बनली. ‘कामगार’ नांवाचं सावज, असं टप्प्यात आलेलं पाह्यल्यावर घटतं वेतनमान, नोकरीत टोकाची असुरक्षितता, कंत्राटी-पद्धतीचा सार्वत्रिक फैलाव…. अशा सर्व प्रकारच्या अस्त्रशस्त्रांचा सढळ वापर करुन त्याला मराठी राजकारणी व भांडवलदारांच्या गुन्हेगारी-संगनमतानं पूर्णत: नामोहरम केलं गेलं.

औद्योगिक-विकासासोबत शहरांचा विकास होणं ओघानचं आलं…. पण, विकास पावणारी… विस्तारणारी ही महाराष्ट्राची, मुंबई-ठाणे-पुणे-नाशिक-औरंगाबादसारखी शहरं, सामान्य आर्थिकस्थितीतल्या मराठी माणसाला नाकारत गेली! म्हणून गुज्जू-मारवाड्यांशी संधान साधून बसलेल्या ‘बिल्डर-राजकारण्यां’च्या कुप्रभावाने व दादागिरीने, मराठी माणसांचं मग, शहरांतून उपनगरांमध्ये… तिथून अजून पुढे पुढेच… पलायन सुरु झालं (म्हणून तर आम्ही नेहमी म्हणतो की, “राजकारणी एकवेळ, जसे ते बहुतांशी असतात तसे, चोर-दरोडेखोर असले तरी एकवेळ परवडलं; पण, ते ‘बिल्डर’ असता कामा नयेत!) …..तर दुसरीकडे, ग्रामीण भागांतून ‘जमीनविक्री’, या एकमेव दलाली व्यवसायाला बरकत आली……सातबा-यावरुन मराठी नांवं बेदखल होऊ लागली…. परप्रांतीय नांवांवर राजरोस ‘फेरफार’ होत, मराठी गावक-यांची कायमस्वरुपी ‘फरफट’ सुरु झाली. राजकीय नेतेच या जमीनविक्री व्यवसायातील आघाडीचे ‘दलाल’ बनल्याचं दुर्दैवी चित्र गावोगावी-पाड्यापाड्यांमधून दिसायला लागलं आणि ‘राजानं मारलं अन् पावसानं झोडपलं; तर, जायचं कुठे’… अशी सामान्य मराठी रयतेची असहाय्य स्थिती झाली.

त्यात, सध्या ‘विकास’ नांवाची पुंगी वाजवणारे राजकारणी गारुडी, या देशात उदंड झालेत आणि त्या पुंगीच्या मायावी स्वरांच्या मृगजळामागे छाती फुटेस्तोवर धावणा-या मराठी तरुण-तरुणींची अफाट दौड पाह्यली की, आमच्या छातीत कालवाकालवं होते. या असल्या अनिर्बंध व बेलगाम विकासामुळे, कुठल्या विनाशकारी पर्यावरणीय संकटांचं ताट समस्त मानवजातीपुढे नियतीनं वाढून ठेवलयं, हा गंभीर व तातडीचा विषय क्षणभर बाजुला ठेवला; तरी, हा विकासाचा ‘भुलभुलैय्या’ आम्हा मराठ्यांना कुठल्या गुलामगिरीत ढकलू पहातोयं, ते समजून घ्यायला कुठल्याही कुडमुड्या ज्योतिषाची मुळीच गरज नाही, …एवढं ते आजच सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट दिसतयं. देशाची ६०% साधनसंपत्ती फक्त ६% गुजराथी भाषिकांकडे केंद्रित झालीय(मग, महाराष्ट्राची किती झाली असेलं?), हा काय केवळ योगायोग आहे की, निव्वळ तथाकथित मेहनत व उद्यमशीलतेचं फळं आहे?….. म्हणून तर, एखादा ‘गुलजार’सारखा संवेदनशील कवी लिहून जातो, “कोण खाणार, कोणाचा हा वाटा…. दाण्यादाण्यावर लिहलयं नांव ‘शेठ सूरचंद मूलचंद जेठा’! “गेल्या २००-२५० वर्षांत निर्माण झाली नसेल, एवढी संपत्ती गेल्या फक्त २०-२५ वर्षांत निर्माण झाली…. संपत्ती व विकासाची ‘गंगा’ धो धो वाहू लागली; तरी, सर्वसामान्य मराठी ‘विहीरीं’च्या घशांची ‘कोरड’ संपत नाही, म्हणजे काय ? ….मराठ्यांच्या ‘तलवारी’ला ‘तराजू’ची साथ लाभून ‘धोकादायक म-हाट्टे’ अधिक मजबूत बनू नयेत; म्हणून, हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून, पद्धतशीररित्या राबवण्यात आलेलं षडयंत्र आहे. ब्रिटीशांनी गुजराथी-मारवाड्यांना बीजभांडवल, जमीनजुमला पुरविण्याची व सरकारी कामांची कंत्राटे देण्याची खास मेहरबानी करुन, जाणिवपूर्वक त्यांना महाराष्ट्रात मराठ्यांच्या उरावर वसवलं (भारतातल्या अफूसारख्या नशेबाज पदार्थांची ब्रिटीश सरकारच्या मदतीनं, चीन वगैरे देशांना निर्यात करुन कुठल्या जमातीनं गैरमार्गाने बक्कळ पैसा कमावला, याचाही शोध घेतला जाणं आवश्यक आहे!)…. आणि पाहता पाहता, ‘पैशापाठी पैसा जातो’, या व्यावहारिक न्यायाने महाराष्ट्राच्या ‘लक्ष्मी’ची अखंड लूट होत राहिली. “मोंगलांच्या अन्याय, अत्याचार व लुटीची सुयोग्य भरपाई म्हणून मोंगलांची (आज गुजरातची!) ‘सूरत’ शिवछत्रपतींनी एकदा नव्हे, दोनदा लुटली… पण, स्वातंत्र्यपूर्वकाळात गो-यांच्या साथीनं आणि आता, स्वातंत्र्यप्राप्तिनंतरच्या काळात महाराष्ट्रातील ‘काळ्या कातडीच्या ब्रिटीशां’च्या म्हणजेच, सर्वपक्षीय राजकारण्यांच्या साथीनं गुर्जर-मारवाडीभाई, ….जणू, त्या ‘सूरत’ लुटीचा बदला म्हणून, आजवर महाराष्ट्र लुटत राहीलेतं…. त्याला अंत नाही( मनात शिवछत्रपतींविषयी मोठा आकस; पण, महाराष्ट्राच्या  निवडणुकीपुरता ‘शिवछत्रपतींचा आशिर्वाद’ त्यांना हवा होता…)! कालपरवापर्यंत ‘मुंबई तुमची… भांडी घासा आमची” म्हणणारी ही जमात; आता, ” महाराष्ट्र तुमचा… पण, त्याचा ‘सातबारा’ आमचा” म्हणत्येयं, …मित्रांनो, आहात कुठे बोला? अशात-हेनं, महाराष्ट्राची ‘महालक्ष्मी'(धनवैभव) तर, गुजराथी-मारवाड्यांची बटिक बनलेलीचं आहे; पण आता, ‘राजलक्ष्मी’ची(राजवैभव) पावलंसुद्धा त्याच दिशेनं वळणारं असतील, तर खरचं, ‘काळ फारच मोठा कठीणं आलायं’! लोकहो, “जिस देशका राजा बेपारी, उस देशकी प्रजा भिकारी” हे, खलिल जिब्रानचं वचन विसरु नका. महाराष्ट्राच्या सगळ्या आर्थिक नाड्या जैन-गुजराथी-मारवाडी-सिंध्यांच्या हातात आणि फडतूस ‘कंत्राटी-नोक-या’, ‘अस्तित्ववादी’ (म्हणजे, कुठल्याही स्थितीत व कुठल्याही पगारात काम करायला तयार असणारे एकप्रकारचे गुलाम) उत्तरभारतीयांच्या ताब्यात देऊन आपण काय सार्वजनिक सत्यनारायण घालत, दहीहंडीच्या मर्कट-कसरती करत, सार्वजनिक गणपती पूजत वा गरबे घुमवत… स्वस्थ बसणार आहोत की, आपल्या आयुष्याच्या ‘कोंडी’च कोडं सुटत नाही म्हणून, वैफल्यग्रस्त होऊन, सध्या उदंड झालेल्या आधुनिक संत-सदगुरु-बाबाजींच्या लाखोंच्या कळपात मेंढरं बनून दाखलं होणार आहोत?…. ‘देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा’, हा समर्थ रामदासांचा उपदेश विसरुन चालेलं? टाळ कुटत, भजनं गातं किंवा रामनामाच्या चोपड्या भरत, पादुकांचं पूजन करत, बैठकांवर ‘बैठका’ काढत किंवा निवेदनं ‘दरबारा’त सादर करत… आपल्या ‘अस्तित्वा’च्या आसालाच भिडलेल्या या समस्या सुटणार आहेत ? अंधाराला सोडाच, आता सामान्य मराठी-माणूस प्रकाशालाही घाबरायला लागलायं आणि दिसेल त्या, ‘संतमहंत’रुपी शिखंडींच्या मागे लपायला लागलायं…. ही फार मोठी ‘मराठी-शोकांतिका’ आहे ! आधुनिक संतांनी, भ्रष्ट व बदमाष राजकारण्यांना, जनतेच्या नजरेत ‘पवित्र’ करुन घ्यायचं( लाखोंच्या उपस्थितीत या तथाकथित संतांनी राजकारण्यांचे किंवा राजकारण्यांनी संतांचे, असे भव्यदिव्य व अत्यंत खर्चिक ‘ सिम्बॉयॉटिक सत्कार-सोहळे’ आयोजित करण्याचं, हेच तर प्रयोजन असतं!) आणि राजकारण्यांनी आपल्यालाच लुटून कमावलेल्या काळ्या पैशातून संतांच्या ‘परमार्था’च्या प्रपंचाचा प्रचंड खर्च भागवायचा किंवा त्यांच्या आर्थिक-गैरव्यवहारांना संरक्षण द्यायचं. श्रीराम-श्रीकृष्णाच्या काळी लुटेरे व अत्याचारी राजेमहाराजे आणि समाजाचं पौराहित्य करणारा अभिजनवर्ग यांच्याच अशाचत-हेचं संगनमत होतं, जे राम-कृष्णांनी साफ मोडून काढलं व जनतेला न्याय मिळवून देऊन तिची या जोखडातून सुटका केली ! मित्रहो, महाराष्ट्रात हरघडी, शेकडोंच्या संख्येनं ‘सत्यनारायण’ पूजा घातल्या जातात; तरी, सामान्य मराठी माणसाचा ‘सत्यानाश’ त्यानं थांबलायं ? ….या ‘नकारात्मक’ आध्यात्मिकतेनं प्रश्नं सुटतील??… सुटलेतं कधि???….  की, श्रीकृष्ण संदेशानुसार परिस्थितीचं ‘मर्म’ जाणून ‘व्यवस्था-परिवर्तना’चे राजकीय ‘कर्म’ केल्यानं प्रश्न सुटणार आहेत? आम्हाला आमच्या समस्यांचाच नीट उलगडा झाला नाही, समस्यांचं ‘सोटमूळ’ कुठे आहे, त्या नेमक्या निर्माण कोणामुळे-कशामुळे झाल्यात… हेच जर, राजकीय दृष्टीकोनातून समजून घेता आलं नाही; तर, त्या समस्यांची उत्तरं आम्हाला कुठून सापडणार आहेत ? ‘कुठला झेंडा घेऊ हाती’ म्हणत, कुणालाही मतदान करुन आम्ही मोकळे होतो.  “विश्वासघातकी नेतृत्त्वाने केलेल्या फरफटीमुळे, जो समाज अवनत अवस्थेला जातो… त्याची भाषा, त्याचे व्यवहार अवनत अवस्थेला पोहोचलेले असतात… त्या समाजातल्या धुरिणांनी माजवलेलं ‘शब्दां’चं अवडंबर, एवढं ढोंगी व फसवं असतं की, त्यानं प्रभावित होऊन, तो समाज… प्रत्येक निवडणुकीत मतदान मोठ्या गांभीर्याचा आव आणून करतो; पण, केलेलं ‘मतदान’ हे, हमखास त्याच्या स्वत:च्या हिताच्या विरुद्ध झालेलं असतं. “…. अवनत अवस्थेला गेलेल्या मराठी समाजाला, अगदी चपखल लागू पडणारं, हे विश्लेषण नव्हे काय? हजारो कोटी रुपये भांडवलदारांनी खर्च केल्यानंतर, लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘कमळा’नं आपलं नैसर्गिक उगमस्थान बदललं आणि ‘कमळ’ तळ्यातल्या चिखलात फुलण्याऐवजी रोज टी.व्ही.च्या पडद्यावर सर्वत्र फुलायला लागलं…. बस्स, तेवढ्यानं मोहित होतं, समस्त कामगारवर्गानं ठार अज्ञानानं व बेजबाबदारपणानं ‘कमळा’वर मारलेला शिक्का, हा वस्तुत: ‘कमळा’वर नव्हता तर, त्यांच्या ‘कपाळा’वर मारलेला दुर्दैवी शिक्का होता ! महन्मंगल भारतीय अध्यात्माचं प्रतिक असलेलं ते ‘कमळ’ कुठे आणि समस्त कामगार-कर्मचारीवर्गाविषयी ‘मळमळ’ बाळगणा-यांचं, हे राजकीय प्रतिक असलेलं ‘कमळ’ कुठे ? … तरीही, ‘गाय कसायाला धार्जिणी’ या नात्याने, ईव्हीएम मशिनवरची ‘कळ’ दाबून देशभर ‘कमळ’ फुलवणा-या कामगार-कर्मचा-यांना, आता दीर्घकाळ अंतरीची ‘कळ’ दाबत जगावं लागण्याची चिन्हं सुस्पष्टपणे दिसायला लागलीतं.

….आमचा सरसकट कुठल्याही परप्रांतीयच काय परदेशीय संस्कृतिलाही घाऊक विरोध असण्याचं, कुठलही कारण नाही… पण, एखादी ‘जमात’ सुप्तपणे एकजूट करुन कुठल्याही प्रदेशातल्या स्थानिकांची पद्धतशीर ‘कोंडी’ करुन त्यांना उध्वस्त करत असेल; तर, स्थानिकांनाही एकत्र येऊन (एकेकट्यानं नव्हे!) व जाज्वल्य (‘चुलतसेनां’सारखी ढोंगी नव्हे!) राजकीय ताकद निर्माण करुन त्यांना विरोध, हा करावाच लागेलं. गरीब गुजराथ्यांचे लढे, कामगारक्षेत्रात इथे वा अगदी थेट गुजरातमध्ये, मिठीवर्दी सारख्या अणुप्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन आम्ही लढतोच आहोत… तेव्हा, आमचा विरोध हा सुस्पष्टपणे केवळ मराठ्यांची आर्थिक व राजकीय कोंडी करणा-या कुठल्याही अवांछनीय ‘प्रवृत्तीं’विरोधी आहे…. मग, ती कुठल्याही प्रांतातली वा देशाविदेशातली का असेना!

मित्रांनो, महाराष्ट्राची आमच्या हक्काची लाल-काळी माती तुमच्या-आमच्या चिमटीतून निसटत चाललीयं… भलत्याच ओंजळी त्या मातीनं भरायला लागल्यात, भलतीच कपाळं महाराष्ट्राच्या लाल-काळ्या मातीच्या टिळ्यानं रंगायला लागलीतं… उशीर झालाच आहे; निदान आता, कायमची वेळ हातातून निघून जाण्याअगोदर ‘विकास’ नांवाच्या मोहनिद्रेतून आणि आपल्या अखंड ग्लानीतून आपल्याला वेळीचं जागं होता येतयं का ते पहा ! ‘द्रष्टं नेतृत्व’ नाकारणं आणि ‘नतद्रष्ट नेतृत्व’ खांद्यावर मिरवणं, ही आमची ४०-४५वर्षांची, दुर्दैवी महाराष्ट्रीय राजकीयपरंपरा, आम्ही आजही मोडणार नसू… सोडणार नसू; तर, कधि काळी हा महाराष्ट्र, मराठी माणसाचा होता आणि ‘स्वाभिमान व नीतिमत्ता’, हे इथल्या मराठी माणसाचं भांडवलं होतं; अशी, थेट गुलामी अवस्थेत पोहोचलेल्या मराठी माणसाबाबतची भूतकाळी नोंद, इतिहासाला करावी लागेल!

शिवछत्रपतींचा ‘स्वाभिमानी महाराष्ट्र’ उभा करायचा असेलं तर, प्रथम या ‘विकास’ नांवाच्या अवदसेला तत्काळ आवर घालावा लागेल आणि तिला मराठमोळ्या संस्कृतिची संयमी व पर्यावरणस्नेही-निसर्गस्नेही झूलं चढवावी लागेलं…  आज आहे तशी, ‘गुर्जर वैश्यसंस्कृति’ची नव्हे ! मराठी तरुणाईला, ‘कारखान्यात हात काळे करुन अपमानित जीणं जगण्या’पेक्षा, ‘शेतात हात काळे करुन सन्मानानं जगण्या’स शिकवलं पाहीजे…. ‘काळ्या आई’शी मराठी तरुणाईची नाळ ‘सेंद्रिय पद्धती’ने पुन्हा जोडली पाहीजे. ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’… हा संतउपदेश म्हणजे ‘अल्पसंतुष्टता’ नसून, त्यामागे केवळ लाखमोलाचा नव्हे; तर, ‘चौ-याऐंशी लाख योनि’ मोलाचा… पिढ्यापिढ्यांचं अस्तित्व सुरक्षित राखणारा, महान निसर्गस्नेही विचार आहे! महाराष्ट्राच्या जंगल-खनिज संपत्तीचे तोडले जाणारे लचके आणि पर्यावरणाचा चाललेला विनाश… ‘जर याल पुढे चिंधड्या, उडवीनं राई राई एवढ्या’, अशा जीवाच्या करारानं थोपवावा लागेलं. आपलाचं मराठी माणूस, परप्रांतीयांना आपली ‘काळी आई’ विकून, ‘क्षणाचा राव व अनंत काळचा रंक’ बनणार नाही, अशा कडक उपाययोजना कराव्या लागतीलं. यापूर्वी परप्रांतीयांकडून झालेल्या जमीन-खरेदी व्यवहारांचा धांडोळा घ्यावा लागेल. “शिवछत्रपतींची ‘शिवशाही’ ही, काही सोन्याचा धूर निघण्यासाठी प्रसिद्ध नव्हती; सोन्याचा धूर मोगलाईतल्या ‘सूरते’त निघत होता…. ‘शिवशाही’ ही सोन्यासाठी नव्हे; तर, सोन्याहूनही लाखो पटीनं पवित्र व मौल्यवान अशा मूल्याधिष्ठित ‘न्याय आणि नीति’साठी प्रसिद्ध होती!”… म्हणूनच, पिढ्यापिढ्यांसाठी पूजनीय व वंदनीय बनून ती राह्यलीयं! रावणाची लंका सोन्याची होती; पण, ‘पवित्र’ नव्हती…. ‘रामराज्या’त नीतिधर्माचा प्रकाश राज्याच्या सर्व दिशांना कानाकोप-यात फाकलेला होता. ‘रावणाच्या लंके’सारखा समृद्धीच्या इमल्यांखाली दडपलेला अन्याय-अत्याचारांचा पाढा त्यात नव्हता! म्हणून, ‘राम’ पिढ्यापिढ्यांसाठी, ‘प्रभाते संस्मरणीय’ असा ‘महानायक’ बनला; तर, रावण ‘खलनायक’ !!! …. आजचे ‘विकास-पुरुष’ हे, ‘मुँह में राम, बगल में छुरी’ बाळगणारे, रावणासारखे उन्मत्त ‘विकार-पुरुष’ आहेत. त्यांच्या केंद्रिय मंत्रिमंडळात हरयाणातील ‘बलात्काराचे आरोपी असलेले मंत्री’ चपखलपणे सुरक्षित राहू शकतात… सतिश शेट्टी, डॉ. दाभोळकरांसारख्या सज्जनांच्या हत्यांना वाचा फुटू शकत नाही, … महाराष्ट्रातल्या उरल्यासुरल्या सत्प्रवृत्तींची मृत्युघंटा वाजवू पाहाणा-या, सतिश शेट्टीसारख्या हत्यांचा तपास, बड्या धेंडांना वाचवण्यासाठी ‘सीबीआय’करवी ‘फाईलबंद’ केला जातो (हे, “नागपूर ते दिल्ली… व्हाया, बारामती” असं, घातकी ‘पोलिटीकल कनेक्शन’ आहे!) …..सीमेवर सदैव कुरापती करणा-या चिन्यांशी काय नी उद्या पाकिस्तान्यांशी काय( केंद्र सरकारची खास मेहेरनजर असणारा एक गुजरातमधला उद्योगपती केव्हाचाच ‘पॉवर-सरप्लस’ गुजरातमध्ये, १०,००० मेगावॅटचा कोळसा आधारित औष्णिकऊर्जेचा प्रकल्प उभारुन व त्यातील वीज ‘पाकिस्तान’ला निर्यात करुन बक्कळ नफा कमावण्याचे मनसुबे तयार ठेऊन बसलायं!)… व्यापार-उद्योगाचे, बिनदिक्कत व निलाजरे व्यवहार होतात… होतील…. कारण, शासक फक्त ‘व्यापारी’ मनोवृत्तीचे असतात… पायाखाली कोणाच्या काय जळतयं, कुठल्या मानसिकतेला आपण पुढावा देतोयं; याचा सारासार विचार करायची गरज तेव्हा संपलेली असते…. उरलेला असतो फक्त, होऊ घातलेल्या नफ्याचा कोरडा आणि रोकडा हिशोब ….कसलं आलयं देशप्रेम आणि भांडवलदारांना कुठलं आलयं देशप्रेम ?…. तुम्ही पैसे कसे कमवलेतं, हा ‘मराठी विचार’ मागे पडून ‘वैश्य-व्यापारी संस्कृति’त फक्त, ‘किती कमवलेतं’ एवढाच विचार प्रबळ झालेला असतो… हीच ती, ‘रावणराज्या’ची ओळख!

म्हणूनच, महाराष्ट्राच्या तरुणाईच्या पुढ्यात शिवछत्रपतींची ‘शिवशाही'(खराखुरी ‘शिवशाही’…. ४५ वर्ष मराठी-मतांसाठी  चाललेली नौटंकी शिवशाही नव्हे!) हवी की, ‘मोगलाई’ हवी…. नीतिमान ‘रामराज्य’ हवं की, बेगडी समृद्धीनं भारलेलं; पण, अन्याय-अनीतिनं भरलेलं ‘रावणराज्य’ हवं…. हा मोठा प्रश्न आहे! बरं, ही समृद्धी नेमकी कुठल्या घरांमध्ये महाराष्ट्रातल्या नांदणार आहे ? तुमच्या मराठमोळ्या घरांमध्ये की, ‘लिधो-आपो’च्या दलालस्ट्रीट वरील ‘दलाली-संस्कृति’च्या घरांमध्ये???…. मित्रांनो, आपण खरचं कधितरी गंभीर होऊन याचा विचार करणार आहोत की, नाही? …. आक्रमणं, फक्त हातात बंदुका-तलवार घेऊनच होतात असं नव्हे; तर, ठरवून आपल्याच जमातीच्या लोकांची लॉबी बनवून, त्यांनाच फक्त धंदा-व्यवसायात खुबीने संधि उपलब्ध करुन देऊन व स्थानिकांना त्या, कौशल्याने नाकारुनही या आधुनिक व्यवस्थेत, आपलं ‘आक्रमणा’सारखं वर्चस्व(महाराष्ट्रासारख्या परमुलुखात) निर्माण करता येतं…. आणि, त्याचपद्धतीनं या परप्रांतीयांनी आजवर अख्खा महाराष्ट्र आपल्या टाचेखाली आणलायं (उदा. कटाक्षाने फक्त आपल्याच जमातीतील लोकांना सवलतीच्या व्याजदराने वा बिनव्याजी भांडवल उपलब्ध करुन देणे किंवा आपल्याच जमातीची व्यापार-उद्योगात खास सांकेतिक भाषा तयार करुन जमातीतल्या लोकांशी व्यवहार वाढवणे व स्थानिकांची नव्या व्यवसायात जमातीद्वारे ‘कोंडी’ करणे इ.)
अगदी कालपरवापर्यंत, मराठी माणसांना व्यापार-उद्योगात गती नाही किंवा कष्ट करण्याची वा धोका पत्करण्याची त्यांची तयारी नाही… अशी मराठी माणसांच्या बाबतीत, पराचा कावळा करीत ठोठो बोंबाबोंब करुन, मराठ्यांना या उद्योग-व्यापारांतून बहिष्कृत करणा-यांना, ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे की, आता आमची तरुण मुलंमुली पदवीधर-द्विपदवीधर, बीएमएस-एमबीए, इंजिनियर्स, अकाऊंटंट्स् होत धंदाव्यवसाय-तंत्रज्ञानात प्रवीण होऊन बाहेर पडतायतं….  त्यांना ‘त्यांच्या महाराष्ट्रा’त उद्योग-व्यवसायासाठी काय ‘स्पेस किंवा स्कोप’, या बनिया जमातींनी शिल्लक ठेवलेला आहे?… आमच्या सुशिक्षित ग्रामीण व शहरी मराठी तरुणाईनं काय, उच्चशिक्षण घेऊनही, आयुष्यभर या बनिया लोकांची भरलेली घर, अजून तुडुंब भरण्यासाठी तुटपुंज्या पगारात टाचा घासत मरायचं ?… आणि, पिढ्यानपिढ्या तेच ते होत राहायचं ??? ज्या न्यूयॉर्कमध्ये एक लाखाहून अधिक ‘गुज्जूभाई’ मोठा व्यापारउदीम सांभाळतात, त्या न्यूयॉर्कच्या मॅडिसन-स्क्वेअरगार्डन मधून भाषण करताना भारताचे CEO (आम्ही त्यांना यासाठी पंतप्रधान म्हणत नाही; कारण, एखाद्या कंपनीच्या CEO सारखेच विद्यमान पंतप्रधान फक्त ‘शेअर-होल्डर्स’ची म्हणजे, भांडवलदार उद्योगपती-व्यापा-यांचीच, जे निवडणुकांसाठी अब्जावधी रुपयांचा चंदा पुरवतात, त्यांचीच जास्त काळजी घेताना दिसतायतं… ‘स्टेक-होल्डर्स’ची, म्हणजे तमाम जनतेची मात्र नव्हे!) ‘लो-कॉस्ट प्रॉडक्शन’ किंवा दरदिवशी एक कायदा रद्दबादल करुन (अर्थात, प्राधान्याने कामगारांचे, शेतक-यांच्या शेतजमिनींचे व पर्यावरणाचे संरक्षण करणारे कायदे) ‘मिनिमम्-गव्हर्नन्स्’ची भाषा केली जाते; त्याचा अर्थ अगदी सुस्पष्ट असतो…. हातच्या कंकणाला आरसा कशाला? कुठल्याही देशाचा पंतप्रधान, परदेशात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत असतो; तर, जे न्यूयॉर्क मॅडिसन-स्क्वेअरमध्ये घडलं, ते देशाचं प्रतिनिधित्व मुळीच नव्हतं, ….ते होतं, भारताचं ‘मार्केटिंग’, एखाद्या दरिद्री आफ्रिकन देशानं करावं तसं, बस्स्…. ते ‘इंडिया शायनिंग’ नव्हतं; तर, ‘इंडिया बाइंडिंग’ होतं ! त्यात, देशातील सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण कल्याणाचा आणि सर्वंकष पर्यावरण-संरक्षणाचा विचार कुठुन असणार, … असणार, फक्त भविष्यातले मोठंमोठे वादे… पूर्वीच्या ‘गरीबी हटाव’ सारखे ! काही शतकांपूर्वी, आफ्रिकन कृष्णवर्णीय राजे, आपल्याचं देशातल्या नागरिकांना ‘गुलाम’ म्हणून युरोप-अमेरिकेला ‘निर्यात’ करुन बक्कळ पैसा कमवायचे… आपलाच घाम, आपलचं रक्त जगभराच्या बाजारात ‘स्वस्त’ विकण्याचा तो आफ्रिकन ‘काळा-प्रघात’… आणि मॅडीसन स्क्वेअरमधलं भारतीय घामरक्ताचं ‘स्वस्तातलं मार्केटिंग’, यातं काही समान धागा किंवा साम्यस्थळं दिसतायतं का… तपासून पहायला काय हरकत आहे ?

मित्रांनो, याला कुठेतरी ‘फुलस्टॉप’ दिलाच पाहीजे. शिक्षण घेतलेल्या व वाटेल तेवढे कष्ट उपसायला तयार असणा-या मायमराठी युवक-युवतींसाठी त्यांच्या महाराष्ट्रात धंदा-व्यवसाय-नोक-यांसाठी (फालतू ‘कंत्राटी’ नोक-या नव्हेत!) जागा मोकळ्या असायलाचं हव्यात; नाहीतर, त्या मोकळ्या करुन घ्याव्या लागतील ! …. तेव्हा, जी काही शेती असेल ती, ज्या काही नोक-या असतील त्या, ज्या काही सुयोग्य व्यावसायिक संधि असतील त्या… त्या सर्वांवर, जर ख-याअर्थानं सामान्य घरातल्या प्रत्येक ग्रामीण वा शहरी-निमशहरी मराठी माणसाचा हक्क या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रभूमीत निर्माण करायचा असेलं; तर, टोकाचा विचार करणं भाग आहे. त्याला दुसरातिसरा कुठलाही पर्याय नाही!

महाराष्ट्राच्या छातीवरचं, हे निर्माण झालेलं व ‘वाढता वाढे’ वाढणारं, परप्रांतीय ओझं (महाराष्ट्रात ‘गुजरात-मारवाड मॉडेल’च्या बेफाम धनसंचयामुळे व अनियंत्रित उत्तरभारतीय लोकसंख्यावृद्धीपोटी, महाराष्ट्रात होत असलेल्या त्यांच्या स्थलांतरामुळे निर्माण झालेलं!), शिवछत्रपतींच्या ‘गनिमीकाव्यानं’ हळूहळू… पण, निश्चितच भिरकावून द्यावं लागेल. या बदलाची गरज, केवळ या पिचलेल्या शहरी व ग्रामीण, सामान्य घरातल्या मराठी तरुणाईला आहे. ज्यांचं या व्यवस्थेत छान चाललयं (त्यात भ्रष्ट मराठी नोकरशहा व सर्वपक्षीय राजकारणी बहुसंख्येनं आलेच!), त्यांना हे मूलभूत बदल नकोच असतीलं. नव्हे, वेगवेगळ्या मार्गांनी व सामदामदंडभेदाद्वारे बुद्धीभेद करुन, ते या बदलांना कसून विरोध करतीलं… ते या देशात भ्रष्टाचार-निर्मूलनासाठी ना, श्री. अनिल बोकिलप्रणित ‘अर्थक्रांती-संकल्पना’ आणू देतील, ना ‘जनलोकपाल’ विधेयकाच्या धर्तीवर केंद्रात प्रभावी व कार्यक्षम ‘लोकपाल’ वा राज्यात ‘लोकायुक्त’ आणू देतील (ज्यामुळे, तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांसारखी असंख्य राजकारणी मंडळी देशात-महाराष्ट्रात गजाआड आणि राजकीय विजनवासात जातील!)! हीच मंडळी, सन्मानजनक ‘किमान-वेतन’ (सध्याच्या महागाईत रु.२५,०००/-दरमहा) निर्धारित करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी या राज्यात-देशात कधिही होऊ देणार नाही, ‘कंत्राटी कामगार-कर्मचारी’ पद्धतीचं उच्चाटन वा शेतक-यांच्या शेतमालाला वाजवी भाव कधिही मिळू देणार नाहीत.

तेव्हा, जागे व्हा… रात्र वै-याची आहे… प्रत्येक पाऊल इथून पुढे जपून व जागरुकतेनं टाकूया… महाराष्ट्रात प्रशासन-न्यायदान-शिक्षण-आरोग्य इ. सर्व क्षेत्रात (शक्य होईल तेवढं उद्योग-व्यापार क्षेत्रातही) ‘तामीळनाडू-कर्नाटक पॅटर्न’च्या धर्तीवर किंवा त्याहीपुढे जाऊन, फक्त मराठी आणि मराठी भाषेचाच वापर व्हायला हवा. हे तेव्हाच होऊ शकेल, जेव्हा आपण भ्रष्ट व ढोंगी घराणेबाज ‘प्रस्थापित’ राजकारण्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून ‘विस्थापित’ करु….  आणि शिवछत्रपतींचा “राष्ट्रांतर्गत राष्ट्र…. महाराष्ट्र”, असा “स्वायत्त-महाराष्ट्र” उभा करु( ‘धर्मराज्य पक्षा’च्या मुद्द्यांची फक्त ‘कॉपी’ मारणारे ‘कॉपीबाज बिल्डर-राजकारणी’ काय सामान्य मराठ्यांसाठी ‘स्वायत्त-महाराष्ट्रा’ची उभारणी करणार?  ….. “तेथे पाहीजे जातीचे, जाज्वल्य विचारांच्या धारदार पातीचे  …..पाय, लाल-काळ्या इमानी महाराष्ट्राच्या मातीचे!”) …..मायमराठ्यांची काळजी वाहणारी… कल्याण साधणारी, खरीखुरी ‘शिवशाही’ तेव्हाच, पुन्हा एकवार या महाराष्ट्र देशी अवतरेल… त्यासाठीच, ‘आरक्षण-अल्पसंख्य’ अशा कृत्रिम भेदाभेदाच्या भिंती पाडून मराठीपणाचा, मराठी भाषेचा आणि “जगा, जगवा आणि जगू द्या” असं ‘विश्वात्मके देणे’ देणा-या महन्मंगल मराठी-संस्कृतिचा एकच डंका यापुढे, …..या महाराष्ट्रात  पिटला गेला पाहीजे !!!

… राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)