भारतीय राज्यघटनेनं, देशात कुणालाही कुठेही जाऊन ‘धंदा-नोकरी-व्यवसाय’ करण्याचं ‘मुक्त व अनिर्बंध’ स्वातंत्र्य, प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल केल्याने…… स्वातंत्र्यापश्चात, गेल्या सत्तर वर्षांत, महाराष्ट्रात जणू ‘अख्खा भारत’च ओतला गेलायं! ‘भारतीय घटने’चाच आधार घेऊन, हाती ढाल-तलवार-बंदूका ‘न’ घेता, महाराष्ट्रावर, चारही दिशांनी झालेलं हे ‘परप्रांतीय-आक्रमण’च आहे!! त्यामुळेच, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी-माणसाच्या जगण्याची, चारही बाजूंनी ‘कोंडी’ झालीयं!!!
“महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तिचं, महाराष्ट्रातल्या मूळ मायमराठी माणसाच्या मुळावर आली आणि सर्वसामान्य मराठी-माणूस त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रातच ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगू लागला!” मराठी माणसाला लुटणारे, सर्वपक्षीय प्रस्थापित राजकारणी एकाबाजुला, लुटणारे-छळणारे बिल्डर्स-कंत्राटदार-अधिकारीवर्ग दुसर्याबाजुला; तर, तिसर्याबाजुला महाराष्ट्राच्या छाताडावर नाचणारा धनदांडगा-मुजोर जैन-गुज्जू-मारवाडी-सिंधी ‘मालकवर्ग’ आणि चौथ्याबाजुला मराठ्यांच्या नोकर्या व छोटेछोटे व्यवसाय फस्त करणारे उत्तरभारतीय लोंढे…. अशा, चारही दिशांनी संकटांनी घेरल्यामुळे…. ‘चारही दिशा’ अंधारल्यामुळे, “शेताच्या बांधावरील आत्महत्या किंवा कारखान्यांतून ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी पद्धतीतली गुलामगिरी”, हेच सामान्य मराठ्यांचं ‘प्राक्तन’ बनलयं!
एका बाजुला, कोकण-रायगडसारख्या निसर्गसंपन्न ग्रामीण भागातून, धनदांडग्या-मुजोर जैन-गुज्जू-मारवाडी-सिंधी ‘शेठजी-संस्कृति’कडून झपाट्यानं मराठी शेतकऱ्यांचे ‘सातबारे’ कोरे करण्यात येत आहेत; तर, दुसर्या बाजुला…. विकसित होणारी, ‘स्मार्ट शहरं’ स्थानिक मराठी-भूमिपुत्रांना नाकारत दूर दूर ढकलत चाललीयतं…..मुंबई, ठाणे, कळवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, आसनगाव, बदलापूर, कर्जत असा त्यांचा उलटा प्रवास सुरु आहे…. शहरातला उरलासुरला मराठी-माणूस, मूळ शहरातच्या परिघावरच्या, कुठल्यातरी ‘नगरा’तल्या १० * १० च्या कोंडवाड्यात रहातोयं… ज्यात, ‘चाॅईस’ दिलात तर, कोंबडीकुत्रीसुद्धा रहाणार नाहीत!
या ‘मराठी-अधोगति’चा…. ‘उलट्या प्रवासा’चा, शेवट काय? महाराष्ट्राचं ‘आराध्य दैवत व मानबिंदू’ असलेल्या शिवछत्रपतींच्या स्मारकाला जसा, ‘अरबी समुद्र’ दाखवण्यात आलायं; तसा, महाराष्ट्रातल्या मूळ मायमराठी-माणसाला, असाच सरतेशेवटी, अरबी समुद्राचा तळ दाखवला जाणार आहे काय???
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपातील ‘प्रस्थापित’ राजकारण्यांमुळे…. महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसाय आणि नोकर्यांमध्ये, कलाक्रिडा व इतर सांस्कृतिक क्षेत्रात आणि राजकारणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात, सामान्य घरातल्या मराठी माणसाला, आता फारशा जागा शिल्लक उरलेल्या नाहीत आणि म्हणूनच, महाराष्ट्राच्या रस्तोरस्ती मराठी-तरुणाईला ‘मोर्चे-महामोर्चे-प्रतिमोर्चे’ काढावे लागतायतं! ‘प्रस्थापितां’नी व ‘परप्रांतीयां’नी, संघटितरित्या पोलादी पकडीत अडकवून ठेवलेल्या…. मराठी-सामान्यांच्या हक्काच्या ‘जागा’, आता रिकाम्या कराव्या लागतील… काढून घ्याव्या लागतील! मोठा घटना-बदल करुन, लोकशाही मार्गानेच ते करावे लागेल…. मित्रहो, तो सनदशीर मार्ग, आपल्याला ‘काश्मीर’ दाखवतोयं!
महाराष्ट्रातल्या सामान्य मराठी माणसाचं ‘अस्तित्व’चं इथे, धोक्यात आलेलं असताना; उलटपक्षी काश्मीरमध्ये, गेल्या सत्तर वर्षांत, अत्यंत अवघड परिस्थितीतही काश्मीरची ‘काश्मीरियत’ टिकून आहे. ती टिकून आहे केवळ, तिथे लागू असलेल्या घटनेतील कलम-३७० मुळेच! भारतातील इतरेप्रांतीय कुठलाही नागरिक, तिथे जाऊन नोकरी-व्यवसाय करु शकत नाही, तिथे मालमत्ता खरेदी करु शकत नाही….याचं कारण, काश्मीरला ३७० कलमाखाली प्राप्त असलेला विशेष ‘स्वायत्त’ दर्जा! अन्यथा काश्मीर कधिच, बड्या राजकारण्यांकडून आणि ‘शेठजी-संस्कृति’कडून घशात घातला गेला असता.
याचं अनुषंगाने, धनदांडग्या जैन-गुज्जू-मारवाडी-सिंध्यांची ‘शेठजी-संस्कृति’ आणि उत्तरभारतीय लोंढे…. यांच्या कात्रीत सापडून, निव्वळ आपलं ‘मराठी’ अस्तित्व टिकवण्यासाठी ‘संघर्ष’ करणारी मराठी-तरुणाईसुद्धा, आज महाराष्ट्रात, हेच कलम-३७० मागत्येयं! जर, कलम-३७० कलमाखाली अंतर्भूत असलेली ‘स्वायत्तता’, बर्याबोलाने बहाल करुन मराठी माणसाच्या मुठीतून निसटू पहाणारा, त्याच्या हक्काचा ‘शिवछत्रपतीं’चा ‘महाराष्ट्र’, जर त्याच्या ‘तळहाता’वर पुन्हा ठेवला गेला नाही; तर, आजच्या या संघर्षाचं भविष्यात ‘बंडखोरी’त रुपांतर होऊन, काश्मीरपेक्षाही उग्र परिस्थिती उदभवू शकेल…. भारतात राहून, आपल्या अस्तित्वाची… मानसन्मान-सुरक्षेची ‘ऐशीतैशी’ होणार असेल; तर, भविष्यातली मराठी-तरुणाई भारतातून फुटून निघण्याची भाषा करेल…. जसा आज, ‘कॅलिफोर्निया’ अमेरिकेतून फुटून निघण्याची (Calexit) तयारी करतोय आणि जसा काल, ‘ग्रेट-ब्रिटन’ युरोपियन-महासंघातून फुटण्यासाठी (Brexit) कौल देऊन मोकळा झालाय!!!
धन्यवाद …..
जय महाराष्ट्र । जय हिंद ।।
……. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)