‘आप’ची कंत्राटी कामगार विरोधी ‘सर्जिकल स्ट्राईक’ या मथळ्याच्या ॲड. विजय कुर्ले यांच्या संदेशावरील राजन राजे यांची प्रतिक्रिया
(पंजाबच्या आम आदमी पार्टीने सार्वजनिक क्षेत्रातील कंत्राटी-कामगार पद्धतीचं निर्मूलन करण्याचं धोरण अंगिकारलेलं दिसतंय व त्यानुसार, ३५,००० कामगार-कर्मचारीवर्गाला नोकरीत ‘कायम’ करुन घेतल्याचा खालीलप्रमाणे स्पृहणीय संदेश, माझे निकटचे स्नेही ॲड. विजय कुर्ले यांनी पाठवला; त्यावरील माझी प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे….) हे अभिनंदनीय कार्य जरुर आहेच… हो, मी ते बिलकूल नाकारत नाहीच, नाकारु शकत नाही…. पण, आम्ही खाजगी क्षेत्रातील कंत्राटी-कामगार […]