आम्ही उरलो आता बाबासाहेबांची जयंती-मयंती साजरी करण्यापुरते, आरक्षणाची आरती ओवाळण्यापुरते….
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी थेट ‘साम्यवादा’चा, जसा कार्ल मार्क्सने सांगितला तसा, परिपूर्ण स्विकार केला नसला; तरीही, ‘समतेच्या संदेशा’चा प्रवासही, कुठेतरी त्या साम्यवादी-समाजवादी सडकेवरुनच दौडत होणार, हे त्यांच्यासारख्या प्रज्ञावानाला ठाऊक असणारच. त्यादृष्टीनेच, ॲडम स्मिथचे “मुक्त बाजारपेठीय तत्त्वज्ञान, हे ‘अस्पर्श’ राखण्याएवढं ‘अंतिम-सत्य’ वा अतिपवित्र असणं… किंवा, माणूस हे वासनांचं गाठोडं असल्याने प्रत्येक माणूस, हा अविरत आपापला स्वार्थ जपणारा […]