“राजकीय हत्या आणि पैसा”, या जुगलबंदीतून ‘सत्ता एके सत्ता’…असा ‘राजकीय सट्टा’ लावणाऱ्या ‘सत्ताबाजां’नी आरंभलेला “विकास नावाचा विनाश”! (धर्मराज्य-लेख मालिकेतील लेख क्र.१)
“राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी”, इति, एकनाथराव शिंदे (महाराष्ट्रातल्या कडकडीत दुष्काळी परिस्थितीत…सत्ताधाऱ्यांच्या कंत्राटदार दोस्तांवर, सरकारी तिजोरीतून नाशिकच्या कुंभमेळ्यात ३५ हजार कोटींच्या चाललेल्या उधळणीच्या पार्श्वभूमीवरील वाक्ताडन….) ‘दिल्लीश्वर’ दोन गुज्जू आणि अंबानी-अदानीसारखा ‘भांडवलदार’ गुज्जू-शेठजीवर्ग…यांना सांभाळताना, एकनाथरावांची चाललेली, डोंबाऱ्यासारखी तारेवरची कसरत व त्यांची उडत असलेली त्रेधातिरपीट, ही एक राजकीय शोकांतिका म्हणायची की, काळाने उगवलेला सूड? …त्यातूनच, अशी बेजबाबदार वाक्ताडनं बाहेर […]

