आंदोलनं जगभरात कुठेही होवोत…. प्रत्येक आंदोलनातून कुठला न् कुठला ‘संदेश’ मिळत असतो… तर, कधि कुठला ‘धडा’ शिकायला मिळत असतो!!!
गेल्या ४ ऑक्टोबर-२०१८ पासून अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को आणि सॅन जोस शहरातील एकूण ७ पंचतारांकित मॅरिऑट हाॅटेलमधील जवळपास २५०० कामगार (साधारण ९०% कर्मचारी) संपावर गेलेत. दीर्घकालीन वाटाघाटींद्वारे पगारवाढ, नोकरीची हमी तसेच, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता… या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झडूनही कुठलाही उभयपक्षी मान्य, असा सन्मानजनक तोडगा न निघाल्याने कर्मचारी संपावर गेलेत. या ९०%हून अधिक कर्मचारी-कामगारांनी संघटना-नेतृत्त्वासोबत निष्ठेनं […]