कामगार

हाती गद्दारीचा ‘खंजीर’ असणाऱ्यांना, महाराष्ट्राचा ‘खंबीर’ कामगार, हेच योग्य उत्तर होय!

“महाराष्ट्रात महागुंतवणूक” अशा दिलखेचक शीर्षकाखाली लिथियम बॅटरी, EV, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मितीच्या वगैरे क्षेत्रातील ८१ हजार कोटींच्या राज्यातील गुंतवणुकीच्या सात प्रकल्पांची व त्यातून, २०-२५ हजार थेट रोजगारांची; तर, ५० हजार अप्रत्यक्ष रोजगारांची राणाभीमदेवी थाटात देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच मोठी गर्जना केलीय (उपमुख्यमंत्री अशा महत्त्वपूर्ण घोषणा करत असतात…तेव्हा, मुख्यमंत्री फक्त ‘तोंडी लावण्यापुरतेच’). या घोषणांचे पतंग हवेत […]

हाती गद्दारीचा ‘खंजीर’ असणाऱ्यांना, महाराष्ट्राचा ‘खंबीर’ कामगार, हेच योग्य उत्तर होय! Read More »

कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!!

विधिमंडळात विरोधी पक्षाच्या बाकांवर बसल्यावरच कसा, सगळ्या राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांचा उमाळा येतो??? … एरव्ही, सत्तेच्या खुर्चीची ऊब घेताना, ही डरकाळ्या फोडणारी मंडळी, निवडणूक-निधीसाठी उद्योगपतींच्या ताटाखालची ‘म्याऊँ’ बनून असतात! संतापजनक बाब ही, की, यातले कोणीच कधि कामगारांचे ‘कैवारी’ नसतात; उलटपक्षी, उघड उघड सरळसोट ‘वैरी’ असतात (म्हणूनच तर, कंत्राटी-कामगार पद्धतीची आणि ‘नीम’ NEEM ची अमानुष गुलामगिरी उद्योग-सेवाक्षेत्रात

कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!! Read More »

“मराठा समाजाने आंदोलनात कारखान्यांची नासधूस करु नये”… इति शरद पवार

औरंगाबादला कारखान्यांवर संतप्त मराठा-कंत्राटी कामगारांचा मोर्चा वळताच…. शरद पवार कळवळले. मराठा-आंदोलनात दुर्दैवाने आजवर, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचं एवढं नुकसान होत होतं, तरी असा कळवळा शरद पवारांना फुटला नव्हता, तो एकदम कारखान्यांकडेच शोषित मराठा तरुणाईच्या संतापाचा रोख वळताच फुटला… हे, उद्योग जगतावरचं शरद पवारप्रणित ‘पाॅवरफूल प्रेम’ नव्हे काय? पवार-ठाकरे परिवारांच्या दळभद्री राजकारणामुळेच धनदांडग्या जैन-गुज्जू-मारवाड्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र

“मराठा समाजाने आंदोलनात कारखान्यांची नासधूस करु नये”… इति शरद पवार Read More »

प्रेसिहोल मशिन टूल्स् प्रा.लि. कामगारांच्या संपाचा १००वा दिवस

आर्थिक विकासाची तद्दन खोटी आणि वांझोटी स्वप्न दाखवून आपल्या देशातल्या व्यवस्थापकीय-शासकीय आणि भ्रष्ट बुद्धिजीवी मंडळींनी जागतिकीकरणाच्या रेटयात गेल्या १५-२० वर्षात जो भीषण नंगानाच चालवलाय, तो सैतानालाही लाजविणारा आहे. एखाद्या कसलेल्या निर्दयी शिकाऱ्याने आपल्या साथीदारांसह चारी बाजूंनी हाकारे देत कोंडीत पकडलेल्या दुबळया सावजाची अत्यंत क्रूरपणे ‘शिकार’ करावी, अशातऱ्हेच भयप्रद व असुरक्षिततेच वातावरण, आपल्या देशाच्या औद्योगिक व

प्रेसिहोल मशिन टूल्स् प्रा.लि. कामगारांच्या संपाचा १००वा दिवस Read More »