Rajan Raje

आपल्या देशात ‘अर्थक्रांति-संकल्पना’ राबविण्यासोबतच, जपान, द. कोरियासारख्या देशांप्रमाणेच कठोर ‘वारसाहक्क कर व भेट-बक्षीसांवर कर’ स्वतंत्रपणे लावावा लागेल…

‘जपान’सारख्या प्रगत व जगभर औद्योगिक-साम्राज्य उभं करणाऱ्या देशात देखील, तुलनेनं अब्जोपतींची (Blood Billionaires) संख्या मोठी नाही वा तिथे कुणी ‘दरिद्री नारायण’ही नाही ! मात्र, ज्यांनी ‘दरिद्री नारायण’ ही चपखल संज्ञा वापरली त्या, म. गांधींच्या किंवा ज्यांनी, समतेचा संदेश दिला त्या, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतासारख्या देशात मात्र, एका बाजुला ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी’ पध्दतीतले कारखान्यात राबणारे व रोजगार हमी […]

आपल्या देशात ‘अर्थक्रांति-संकल्पना’ राबविण्यासोबतच, जपान, द. कोरियासारख्या देशांप्रमाणेच कठोर ‘वारसाहक्क कर व भेट-बक्षीसांवर कर’ स्वतंत्रपणे लावावा लागेल… Read More »

UPA वा NDA वा अन्य प्रस्थापित राजकीय पक्षांच्या आघाड्या-युत्या…

मित्रहो, UPA वा NDA वा अन्य प्रस्थापित राजकीय पक्षांच्या आघाड्या-युत्या… हे सर्वच, ‘रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे’चा (Vampire-State System) एकतर अविभाज्य भाग आहेत वा ते स्वतःच ही व्यवस्था, निर्माण करुन देशभर मूठभरांच्या स्वार्थासाठी अन्यायकारकरित्या चालवतायत! सद्यस्थितीत, खालील राजकीय-धोरणे व विचारधारा देशात कल्याणकारी-राज्य प्रस्थापनेसाठी अत्यावश्यक असताना, आपल्या देशात, कुठल्याही निवडणूक प्रचार-मंथनात, याचा ओझरताही उल्लेख नसतो, ही किती खेदाची व

UPA वा NDA वा अन्य प्रस्थापित राजकीय पक्षांच्या आघाड्या-युत्या… Read More »

सन्मानजनक किमानवेतन

सन्मानजनक “किमानवेतन-निश्चिती”सारख्या श्रमिकांच्या मूलभूत स्वरुपाच्या समस्यांवर, अशी तज्ज्ञ समिती पुन्हा कधि स्थापन झाली नाही… ज्याची, आज निकडीची गरज असताना, उलट कामगार-कर्मचारीवर्गावर घाला घालणारे कायदे, संसदेत मंजूर होतायत! जगभरात, ‘किमानवेतना’ संदर्भात… सर्वोच्चवेतनमान आणि निम्नतम वेतनमान यांचं गुणोत्तर १२ : १ यापेक्षा कमीजास्त असू नये म्हणून, जागृत श्रमिकवर्गाकडून सार्वमतासाठी दबाव निर्माण केला जात असताना व तसे कायदे

सन्मानजनक किमानवेतन Read More »

कृषी विधेयके म्हणजे ‘कंत्राटी-शेतीपद्धती’

मित्रहो, खालील सगळ्याचा अर्थ फार फार गंभीर आणि जनसामान्यांचं जीवन उध्वस्त करुन त्यांना अखंड गुलामगिरीत ढकलण्याचा फक्त, आहे… गेल्या दोनतीन दशकांपूर्वीपासूनच आम्ही “कंत्राटी कामगार-कर्मचारी पद्धती”ची अवदसा आली, …आता ‘कंत्राटी-शेतीपद्धती’ येणार, हे गंभीर इशारे सातत्याने देत होतो; पण, ऐकतो कोण??? “शहर-उपनगरातले नोकरदार आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसह अलुतेदार-बलुतेदार, बाजारपेठेतील आपली सगळी ‘आर्थिकपत’ या ‘कंत्राटीकरणा’च्या फेऱ्यात गमावून बसले

कृषी विधेयके म्हणजे ‘कंत्राटी-शेतीपद्धती’ Read More »

“जगणं, जीवनावश्यक बाबींवरच प्रामुख्याने आधारलेलं असायला हवं”…

(सोबत जोडलेल्या बातमीचा आधार घेत खालील माझं प्रसंगोचित भाष्य…..) केंद्र आणि राज्य सरकारला भांडवलदारांच्या हितासाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांची बेसुमार पिळवणूक करण्याची सुवर्णसंधी ‘करोना-लाॅकडाऊन’मुळे निर्माण झाली आहे, हे शंभर टक्के सत्य आणि त्याचा ते दमनचक्र वेगाने फिरवून “Profits are private and losses are public”, या भांडवली-तत्त्वानुसार अमानुष फायदा घेतीलच. यालाच, त्याच्या भांडवली-व्यवस्थापकीय परिभाषेत ते,

“जगणं, जीवनावश्यक बाबींवरच प्रामुख्याने आधारलेलं असायला हवं”… Read More »

जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”…..

५ एप्रिल (रविवार)-२०२० रोजी रात्रौ ठीक ९ वा. जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”….. “नियतीशी करार”(Tryst with destiny) अशी ऐतिहासिक ललकार पुकारत भारताचे खरेखुरे ज्ञानी, विज्ञानवादी आणि विवेकी, असे पहिले पंतप्रधान पं. नेहरुंनी भारतीय स्वातंत्र्याची उद्घोषणा केली…. त्या, स्वातंत्र्यापश्चातच्या ७२ वर्षाच्या प्रवासातील ५ एप्रिल-२०२० रोजी रात्रौ ९ नंतरची ९ मिनिटे, हा एक ‘अंधारवाट’ दाखवणारा

जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”….. Read More »

रोगापेक्षा ‘इलाज’ भयंकर की, ‘इलाजा’पेक्षाही ‘डाॅक्टर’ भयंकर…???

‘करोना महारोग’ बराचसा अनावश्यक हवाईप्रवास करणाऱ्या श्रीमंतांनी विमानातून पसरवला आणि त्याचे खाली जमिनीवर भयंकर ‘भोग’ कोण भोगतोय…. तर, “विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर” तसं, डोक्यावर गाडगीमडगी घेऊन रस्तोरस्ती मैलोगणिक ऊन्हातान्हात फिरणारा तो गोरगरीब भोगतोय….. या ‘मरणयातनां’पेक्षा प्रत्यक्ष ‘मरण’ बरं… अशी, आजची सामान्य लोकांची मनस्थिती आहे! केवढं हे, कमालीचं क्रौर्य? क्रौर्याने तर या ‘लाॅकडाऊन’मध्ये जणू, कळसच गाठलाय… नोटबंदीतही

रोगापेक्षा ‘इलाज’ भयंकर की, ‘इलाजा’पेक्षाही ‘डाॅक्टर’ भयंकर…??? Read More »

पुढच्या निवडणुकीत “नाॅकडाऊन” होऊ नये म्हणूनच, “लाॅकडाऊन”…..

नोटबंदी, आर्थिकमंदी आणि आता, अंतहिन संचारबंदी… कृतिशून्यतेतील नरेंद्र मोदीकृत धोरण-विकृती! ….निदान, पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान प्रामाणिकपणे म्हणतोय तरी की, “संभाव्य करोना व्हायरसची साथ आटोक्यात आणण्याकामी पाकिस्तान सरकार संसाधनांअभावी हतबल”! या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी सरकारचं सार्वजनिक आरोग्यसेवेचं प्रगतीपुस्तक काय म्हणतयं, जरा पाहूया. आम्ही राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाच्या केवळ १.८% (याच, मोदी सरकारचं २०२५चं आरोग्यसेवेवरच्या खर्चाचं लक्ष्य २.५%

पुढच्या निवडणुकीत “नाॅकडाऊन” होऊ नये म्हणूनच, “लाॅकडाऊन”….. Read More »

शिवछत्रपतींसारख्या जातधर्मनिरपेक्ष ‘युगपुरुषा’ची जयंति, ‘फाल्गुन वद्य-तृतिया’ या मराठी-तिथीनुसारच साजरी केली जायला हवी…

शिवछत्रपती, म्हणजे केवळ ‘तलवारबाजी’ नव्हे; तर, उच्चकोटीच्या जीवनमूल्यांसाठी लावलेली ‘प्राणांची बाजी’ होय… शिवछत्रपतींचा भर ‘तलवारी’पेक्षा ‘नांगरा’वर आणि ‘नागरी-संस्कृती’वर होता! …”सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः” म्हणून, शिवछत्रपतींचा राज्यकारभार, राजनीति आजही कालसुसंगत ठरावी…. शिवछत्रपतींनी भूदासांवरील असलेली वतनदार-सरंजामदारांची अमर्याद पिळवणूक करणारी हुकमत व सत्ता संपुष्टात आणली… सरंजामदार-जमीनदारांकडील अतिरिक्त जमीन काढून घेऊन त्याचं भूहिनांना वाटप केलं. सर्वात महत्त्वाचं

शिवछत्रपतींसारख्या जातधर्मनिरपेक्ष ‘युगपुरुषा’ची जयंति, ‘फाल्गुन वद्य-तृतिया’ या मराठी-तिथीनुसारच साजरी केली जायला हवी… Read More »

सरकारी ‘शिवजयंति’च्या पूर्वसंध्येला अरविंद केजरीवालांच्या भीमपराक्रमाचा आगळावेगळा; पण, मराठी माणसांच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण अन्वयार्थ…..

Terrorist>>>Traitor>>> Disruptor>>> indisputable Leader…. thy name is Arvind Kejriwal !!! सौ. सुनिताबाई, आपल्या पतीच्या दिल्ली दिग्विजयापश्चात काय प्रतिक्रिया देतायत, जरा डोकावून पाहूया तर…….. सखोल विश्लेषणाअंति, दिल्ली विधानसभा-२०२० निवडणुकीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील ‘आप’च्या दैदिप्यमान विजयाचे विविधप्रकारे अन्वयार्थ देशभरातील राजकीय विश्लेषक सुयोग्यरित्या लावत असले; तरीही, त्या विश्लेषणांच्या पलिकडे जाऊन अरविंद केजरीवाल यांच्या सुविद्य पत्नीने दिलेली प्रतिक्रिया,

सरकारी ‘शिवजयंति’च्या पूर्वसंध्येला अरविंद केजरीवालांच्या भीमपराक्रमाचा आगळावेगळा; पण, मराठी माणसांच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण अन्वयार्थ….. Read More »