“सर्वसामान्य मराठी-माणूस त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रातच ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगू लागला!”
भारतीय राज्यघटनेनं, देशात कुणालाही कुठेही जाऊन ‘धंदा-नोकरी-व्यवसाय’ करण्याचं ‘मुक्त व अनिर्बंध’ स्वातंत्र्य, प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल केल्याने…… स्वातंत्र्यापश्चात, गेल्या सत्तर वर्षांत, महाराष्ट्रात जणू ‘अख्खा भारत’च ओतला गेलायं! ‘भारतीय घटने’चाच आधार घेऊन, हाती ढाल-तलवार-बंदूका ‘न’ घेता, महाराष्ट्रावर, चारही दिशांनी झालेलं हे ‘परप्रांतीय-आक्रमण’च आहे!! त्यामुळेच, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी-माणसाच्या जगण्याची, चारही बाजूंनी ‘कोंडी’ झालीयं!!! “महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तिचं, […]