कंत्राटी-कामगार पद्धत

“तुम मुझे ‘चंदा’ दे दो…मै तुम्हे ‘धंदा’ दूँगा”

कुठे ते, “तुम मुझे खून दो, मै तुम्हें आजादी दूँगा” म्हणणारे कडवे-देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कुठे, “तुम मुझे ‘चंदा’ दे दो…मै तुम्हे ‘धंदा’ दूँगा” म्हणणारे बडवे-देशद्रोही ‘गुजराथी-लाॅबी’वाले… ज्यांच्यासाठी, “देश चालवणं म्हणजे केवळ, आपल्या खास गुजराथी-भाषिक भांडवलदार मित्रांसाठी मांडलेला-थाटलेला, एक अतिशय किफायतशीर धंदाच होय! …अशी क्षुद्रवृत्ती धारण करणाऱ्या शासनकर्त्यांच्या हिणकस, समाजघातकी व्यापारी-वृत्तीकडे पाहूनच, ‘खलील जिब्रान’ …

“तुम मुझे ‘चंदा’ दे दो…मै तुम्हे ‘धंदा’ दूँगा” Read More »

‘प्रसाद गावडे’… ‘कोकण ते लडाख’

सावंतवाडीतील सांगेली गावच्या जायपेवाडीत रहाणारा ‘कोकणी-रानमाणूस’ म्हणजेच, सर्वांचा लाडका ‘प्रसाद गावडे’… ‘कोकण ते लडाख’, असं आपलं बोट धरुन फिरवत, देशातल्या निसर्ग-पर्यावरणीय समस्यांविषयी जे थोडक्यात प्रतिपादन करु पहातोय ते ऐकणं, हे आपल्या नातवंडांच्या आणि त्यांच्याही पुढील पिढ्यापिढ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं… भाजपाई-संघीय ‘गुजराथी-लाॅबी’, ही भारतातील निसर्ग-पर्यावरणावरच फार मोठं संकट आहे…गुजराथच्या पातकी-भूमितून आलेल्या भांडवलदारवर्गाने आपल्या सैतानी हव्यासापोटी देशभरातला …

‘प्रसाद गावडे’… ‘कोकण ते लडाख’ Read More »

मधुरा स्वामिनाथन आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराची भाजपाई खिरापत…..

एका बाजुला ‘भारतरत्न’ पुरस्काराची ‘खिरापत’ वाटणार्‍या…आणि, दुसर्‍या बाजुला शेतकरी-शेतमजूर, कामगार, उच्चपदस्थ अधिकारीवर्गाकडून ‘खच्चीकरण’ करण्यात आलेला पोलीसदलातील हवालदार-शिपाईवर्ग, लष्करात भरती होऊ पहाणारी नवतरुणाई (तथाकथित, अग्निपथावरील अग्निवीर), ट्रकचालक-रिक्षावाले, सेवेतून निवृत्त झालेला समस्त कामगार-कर्मचारीवर्ग….अशा, देशातल्या तळागाळातील सर्वच समाज-घटकांवर ‘आफत’ आणणाऱ्या; मोदी-सरकारचं ‘मधुरा स्वामिनाथन’कृत ‘वस्त्रहरण’…. ———————————————– ज्यांनी, १९६०च्या दशकात भारतात ‘हरितक्रांती’ आणली, त्या एम. एस. स्वामिनाथनांची मुलगी मधुरा स्वामिनाथन …

मधुरा स्वामिनाथन आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराची भाजपाई खिरापत….. Read More »

रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेचं (Vampire-State System), खरंखुरं अंतरंग…

प्रत्येक भारतीय तरुणाने (विशेषतः, मराठी-तरुणाईने), हे ध्यानात घ्यावं की, या रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेचं (Vampire-State System), हेच खरंखुरं अंतरंग आहे…!!! (‘THE HINDU’च्या सौजन्याने…) ‘डेमोग्राफिक-डिव्हिडंड’ वगैरे मोठे मोठे शब्द… ‘मन की बात’पासून निवडणुकीच्या भाषणातील ‘जन से बात’पर्यंत व्यक्त होणारी भारतीय ‘तरुणाईची कवतिके’ (कौतुकं), ही भांडवली-व्यवस्थेची सगळी निर्लज्ज-निरर्गल सोंगंढोंगं असतात! …जोपर्यंत, “भांडवली-दहशतीला सपशेल शरण जाऊन, कंपन्या-कारखान्यांमधून कंत्राटी-कामगार किंवा वेठबिगार …

रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेचं (Vampire-State System), खरंखुरं अंतरंग… Read More »

आधी बैल घालवायचा आणि मग, झोपा करायचा (ते ही केल्यासारखं नाटक)… ‘बाॅम्बे’चं मुंबई केलं…पण, त्याचं सरतं ‘मराठीपण’ आणि वाढतं ‘गुजराथीपण’ थांबेना!

“महाराष्ट्रातून (म्हणजे, मुंबईतून हो) तुमचा बोजाबिस्तरा गुंडाळून तुमच्या गुजराथला चालते व्हा”, असा मोठ्या राणाभीमदेवी थाटात (“मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर”, ‘पॅटर्न’चा तो थाट) आमचे मराठी नेते मुकेश अंबानींना फुसका ‘आवाज’ देताना पाहून…मुकेश अंबानी मनात हसत म्हणत असतील की, “हू तो गुजराथमाच छू, तमे समझता नथी?” …ही मुंबई, हे ठाणे शहर (आणि, हळूहळू अशीच पुणे, …

आधी बैल घालवायचा आणि मग, झोपा करायचा (ते ही केल्यासारखं नाटक)… ‘बाॅम्बे’चं मुंबई केलं…पण, त्याचं सरतं ‘मराठीपण’ आणि वाढतं ‘गुजराथीपण’ थांबेना! Read More »

४१ कामगारांची उत्तराखंडच्या ढासळलेल्या बोगद्यातून एकदाची सुटका झाली…या सुटकेच्या ‘तमाशा’चं कवित्व शिल्लक उरलंय, त्यातून निर्माण झालेले काही अनुत्तरित प्रश्न…!!!

**जर कुठले बडे राजकारणी किंवा बडे सरकारी अधिकारी अथवा त्यांचे कुटुंबिय…जर, या ‘मानवनिर्मित’ आपदेत सापडले असते; तर, सुटकेसाठी एवढा प्रदीर्घ काळ लागला असता का? **समस्त पर्यावरणतज्ज्ञ ठिसूळ हिमालयीन प्रदेशाशी बोगदा खणणे, खाणकाम करणे वगैरे धोकादायक खेळू नका, असे तडफडून सांगत असताना व यापूर्वी, अशा दुःसाहसातून अनेक जीवघेण्या मोठमोठ्या दुर्घटना घडल्या असतानाही…निसर्गाशी द्यूत खेळण्याचा, हा अवसानघातकी …

४१ कामगारांची उत्तराखंडच्या ढासळलेल्या बोगद्यातून एकदाची सुटका झाली…या सुटकेच्या ‘तमाशा’चं कवित्व शिल्लक उरलंय, त्यातून निर्माण झालेले काही अनुत्तरित प्रश्न…!!! Read More »

‘गौतम अदानी’ नावाच्या ‘पोपटा’तच, भारताच्या ‘शहेनशहा’चा आत्मा किंवा प्राण दडलेला आहे…

विविध कामगार-संघटना आणि ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन गेली दोनतीन दशके आम्ही सातत्याने, ‘खाउजा’ (खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) धोरणापश्चातच्या आधुनिक रक्तपिपासू-शोषक भांडवली-व्यवस्थेच्या (Vampire-State System) ‘बकासुराचा प्राण’… ‘कंत्राटी-कामगार पद्धत, आऊटसोर्सिग’ सारख्या अमानुष-घृणास्पद शोषण करणाऱ्या, भांडवली-गुहेमध्ये दडलेल्या ‘पिंजऱ्यातील पोपटा’त आहे… अशी मांडणी करीत आलेलो आहोत! ‘नफ़रत छोड़ो, भारत जोड़ो’चे प्रणेते व ‘भाजपा-संघ’कृत “विद्वेषी बाजारात प्रेमाचं दुकान” उघडणारे व अन्याय-अत्याचार-शोषणाग्रस्त …

‘गौतम अदानी’ नावाच्या ‘पोपटा’तच, भारताच्या ‘शहेनशहा’चा आत्मा किंवा प्राण दडलेला आहे… Read More »

अहंकारग्रस्त राजकीय ‘रावण-वृत्तीं’चं ‘लंकादहन’

अन्याय-अत्याचार-शोषण करणार्‍यांच्या, मानसिकतेत आणि त्याच्या विविध प्रणाली (Systems) तसेच, त्यांच्या अत्याधुनिक संसाधनांमध्ये निर्घृण ‘हिंसाचार’ सुप्त स्वरुपात खोलवर दडलेला असतो! वरकरणी, ते बेमालूम ‘सभ्यता व माणुसकी’चं सोंगढोंग वठवत रहातात जरुर…पण, जाणकाराला त्यांच्या प्रत्येक कृतित, चालीत व हालचालीत ‘हिंसाचारा’ची विकृती, ओंगळवाण्या स्वरुपात ओघळताना दिसत रहाते. अन्याय-अत्याचार-शोषणाचा कहर झाल्यावर, तो अन्याय-अत्याचार, ते अनन्वित शोषण सातत्याने सहन करणारा पापभीरु …

अहंकारग्रस्त राजकीय ‘रावण-वृत्तीं’चं ‘लंकादहन’ Read More »

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’

कालपरवापर्यंत, देशामधील अनेक कंपन्या-कारखान्यांमध्ये, विशेषतः, महाराष्ट्रातील रासायनिक उद्योगांमध्ये, औद्योगिक-अपघातांची मालिका सुरुच आहे. यावर ताण म्हणजे, ‘आऊटसोर्सिग’च्या शोषणकारी नव-भांडवली तंत्रातून बनलेल्या छोट्यामोठ्या वर्कशाॅप्समधील तर, सातत्याने होणाऱ्या शेकडो-हजारो अपघातांची ना कुठली नोंद, ना मरणाऱ्या किंवा जखमी होणाऱ्या ‘कामगार’ नावाच्या आधुनिक ‘गुलामां’ची कुणाला पर्वा! …औद्योगिक-सुरक्षिततेचे अतिशय खर्चिक व काटेकोर नियम पाळण्यात अमानुष हेळसांड संबंधितांकडून होत असल्यानेच, ती मानवनिर्मित …

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’ Read More »

२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”?

सध्या आहे त्या अवस्थेतल्या लुटारु-शोषक ‘भांडवली-व्यवस्थे’तली ‘बँकिंग-व्यवस्था, जनसामान्यांना खरंच आकळायला लागली (जे फार काही अवघड मुळीच नव्हे) तर, रिझर्व्ह बॅंकेसह सर्वच बँकांची पद्धतशीर लूट कशी सुरु आहे, ते जनतेला हळूहळू ध्यानात येईल. रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन किंवा ऊर्जित पटेल, ती लूट करु देत नव्हते… म्हणून, पं. नरेंद्र मोदींनी त्यांना नाहक बदनाम करताना, “रिझर्व्ह …

२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”? Read More »