कंत्राटी-कामगार पद्धत

“कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय!

नरेंद्र मोदी सरकारने वर्ष, २०१७-१८ मध्ये आणलेली “नीम”… NEEM (National Employability Enhancement Mission) योजना, म्हणजे “नॅशनल एम्प्लाॅयाॅबिलिटी एन्हान्समेंट मिशन” नसून, उद्योगपती-व्यवस्थापकीयवर्गाच्या, चांगलीच पथ्यावर पडणारी (म्हणजे, पडद्यामागून त्यांनीच नरेंद्र मोदीं सरकारकरवी आणलेली) आणि तमाम कामगार-कर्मचारी वर्गाची बेमालूम फसवणूक करत, “कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय! “नीम” (NEEM) हे, “स्किल-इंडिया” […]

“कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय! Read More »

2017.03.18-‘धर्मराज्य पक्ष’ काय चमत्कार करु शकतो

१) ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यता’ असलेल्या महाराष्ट्रातील “कंत्राटी-कामगार/कर्मचारी” प्रथेचं समूळ उच्चाटन होऊन सर्व कामगार-कर्मचारीवर्ग नोकरीत “कायम” होणार २) कामगार-कर्मचार्‍यांना किमान-वेतन दरमहा रु. २५,०००/- मिळणार ३) दरमहा रु. ४०,०००/- पर्यंत पगाराच्या महाराष्ट्रातील नोकऱ्या, शेवटचा मराठी तरुण-तरुणी कामाला लागेपर्यंत…. फक्त आणि फक्त मराठी-भाषिकांनाच ४) सार्वजनिक क्षेत्रातील मराठी-शाळांना ऊर्जितावस्था आणणार ५) मराठी-भाषिक शाळांमध्ये शिकणार्‍या पाल्यांना व पालकांना शासनातर्फे सार्वजनिक

2017.03.18-‘धर्मराज्य पक्ष’ काय चमत्कार करु शकतो Read More »

शिवछत्रपती महाराज की जय……..

सरकारी शिवजयंतिच्या पूर्वसंध्येला…. शिवछत्रपतींच्या राजनीतिची कालसुसंगततेची मांडणी !!! ज्ञात मानवी इतिहासाचा धांडोळा घेतला तर, हे सहजी ध्यानात येईल की, माणसामाणसांमध्ये आजवर हजारोंनी युद्धे आणि जातधर्मीय दंगे झालेले आहेत…. याचाच अर्थ, मानवीसमूह एकतर युद्ध किंवा दंगे करण्यात रंगलेले असतात किंवा त्याच्या पुढील तयारीत तरी रमलेले असतात…. याचं प्रमुख कारण म्हणजे, “राजकारणी आणि त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा”! जे

शिवछत्रपती महाराज की जय…….. Read More »

“सर्वसामान्य मराठी-माणूस त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रातच ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगू लागला!”

भारतीय राज्यघटनेनं, देशात कुणालाही कुठेही जाऊन ‘धंदा-नोकरी-व्यवसाय’ करण्याचं ‘मुक्त व अनिर्बंध’ स्वातंत्र्य, प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल केल्याने…… स्वातंत्र्यापश्चात, गेल्या सत्तर वर्षांत, महाराष्ट्रात जणू ‘अख्खा भारत’च ओतला गेलायं! ‘भारतीय घटने’चाच आधार घेऊन, हाती ढाल-तलवार-बंदूका ‘न’ घेता, महाराष्ट्रावर, चारही दिशांनी झालेलं हे ‘परप्रांतीय-आक्रमण’च आहे!! त्यामुळेच, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी-माणसाच्या जगण्याची, चारही बाजूंनी ‘कोंडी’ झालीयं!!! “महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तिचं,

“सर्वसामान्य मराठी-माणूस त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रातच ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगू लागला!” Read More »

‘मराठा’ तितुका मेळवावा… ‘महाराष्ट्र धर्म’ वाढवावा!!!”

ही कहाणी आहे, ‘महाराष्ट्र’ नांवाच्या, आटपाट नगरीतील ‘मराठा समाजा’ची…. ज्या, समाजानं “प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता…” असा या, महाराष्ट्राच्या लालकाळ्या मातीला ‘शककर्ता’ राजा दिला, त्या समाजावरच “पौर्णिमा ते अमावस्या” अशी पीछेहाटीची अवदसा ओढवलीच कशी ??? बायबलमध्ये लिहून ठेवलयं, “जेव्हा एखाद झाड… कुठल्या प्रकारचं, कुठल्या प्रतीचं आहे, हे तपासायचं असतं, तेव्हा इतर काही धडपड न करता, थेट

‘मराठा’ तितुका मेळवावा… ‘महाराष्ट्र धर्म’ वाढवावा!!!” Read More »

“१ मे हा, ‘महाराष्ट्र व कामगार दिन’… पण, महाराष्ट्रातला मराठी-कामगार/कर्मचारी मात्र, आज हीन-दीन!!!”

‘धर्मराज्य पक्ष’…. हा, भारतातील एकमात्र ‘राजकीय पक्ष’ आणि ‘राजन राजे’….. हा, भारतातील एकमात्र ‘राजकीय नेता’…. ज्यानं, आपल्या देशात (विशेषतः, महाराष्ट्रात) थैमान घालणाऱ्या, आधुनिक-व्यवस्थेतील “गुलामगिरी व नव-अस्पृश्यते”प्रमाणे असणाऱ्या “कंत्राटी-कामगार/कर्मचारी” प्रथेविरुद्ध, गेल्या २५-३० वर्षांपासून “धर्मयुद्ध” पुकारलेले आहे ! जशा, वृक्षाच्या आधाराशिवाय ‘वेली’ जगू व वाढू शकत नाहीत…. तशीच अवस्था, कामगार-कर्मचारी चळवळीची असल्याने, तिला सदैव ‘राजकीय आधारवडा’ची गरज

“१ मे हा, ‘महाराष्ट्र व कामगार दिन’… पण, महाराष्ट्रातला मराठी-कामगार/कर्मचारी मात्र, आज हीन-दीन!!!” Read More »

“वाचाल तर, वाचाल…..”

मुंबई–ठाण्यातली (ज्या महानगरांच्या महापालिकेत दीर्घकाळ शिवसेनेची सत्ता राहीलेली आहे !) सर्वसामान्य मराठी माणसं शिवसेनेच्या भ्रष्ट–घराणेबाज व्यवहारांमुळे अक्षरश देशोधडीला लागून १० X १० च्या ‘काडेपेटी’च्या आकाराच्या अनधिकृत बांधकामात, नाईलाजापोटी जगण्याची उमेद हरवून व जगण्याची ‘कोंडी’ स्विकारत, राहयला लागलीयतं आणि शिवसेनेचे पदाधिकारी धनदांडग्या जैन–गुज्जू–मारवाड्यांचे हात हातात घेऊन सारे ’टॉवर्स“मध्ये ऐश्वर्यात राहतायतं. कोण ‘बिल्डर’ बनले… कोण झोपडीदादा… तर,

“वाचाल तर, वाचाल…..” Read More »

१ मे (महाराष्ट्र व कामगार दिन)

निर्दय जागतिकीकरण – विवेकशून्य आधुनिकीकरण – बेलगाम संगणकीकरण, यांच्या चौफेर उधळलेल्या ‘वारू’च्या टापांखाली चिरडल्या गेलेल्या कामगारांची सर्वत्र अवस्था अतिशय दयनीय व शोचनीय झालेली आहे. मूठभरांनी मणामणांनी घरं भरायची आणि कणाकणांसाठी आगरी-कोळी-कुणबी-मराठा-आंबेडकरी इ. बहुजनांनी तिष्ठत… तळमळत उंबरठयावर उभं रहायचं! लूट… फक्त संधिसाधू लूट, असा जणू ‘जीवनमंत्र’ झालाय. रोजगार ‘भरपूर’ आहेत पण ते एकतर मोठया कारखान्यांमधून कंत्राटदारीच्या

१ मे (महाराष्ट्र व कामगार दिन) Read More »

ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!!

आमचे पाच ग्रामीण मराठी तरुण बळी गेले आणि काल ‘सहावा‘ बळी गेला, ‘राक्षसी‘ पोलीसी चाचणीत!….. एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न कालपरवाच केला. …….हे काय चाललयं, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात ? लहानपणी आम्ही सर्कशीत “मौत का कुवाँ” हा, मृत्युचं चुंबन घेणारा थरारक अनुभव घ्यायचो …. मात्र, असली “मौत की दौड” प्रथमच अनुभवतोयं….. भरदुपारी रणरणत्या उन्हात आणि अतिरेकी

ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!! Read More »

‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालया”चा आदेश पायदळी तुडवून तुर्भे(नवी मुंबई) पोलीसांची २८ नोव्हेंबर-२०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार!!!

पोलीस, विशेषतः नवी मुंबईतील पोलीस, हे राजरोस ‘खाकीवर्दीतले गुंड’ झालेले असून कंपन्यांच्या मालकांची बिनधास्त सुपारी घेऊ लागलेत; हा अनुभव, यापूर्वीही अनेक वेळा १) थॉमसन प्रेस २) एस्. पी. फॅब्रिकेटर्स ३) सिंडीकेट वायपर्स् ४) प्रगती इलेक्ट्रीकल्स् ५) प्रदीप मेटल्स सारख्या नवी मुंबईतील अनेक कंपन्यांच्या आंदोलनात आम्ही घेत आलेले आहोत. महाभारतातल्या दुर्योधन, दुःशासनाचे “बाप” बनलेले हे पोलीस,

‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालया”चा आदेश पायदळी तुडवून तुर्भे(नवी मुंबई) पोलीसांची २८ नोव्हेंबर-२०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार!!! Read More »