धर्मराज्य पक्ष

“‘कंत्राटी पद्धत’ आणि ‘काळी कामगार-संहिता’ : कामगारवर्गाविरुद्धच्या नव्या गुलामगिरीचे शस्त्र!”

‘मतचोरी’तून सत्ता बळकावणारी BJP-RSS अभद्र युती; केवळ, कष्टकरी शेतकऱ्यांचीच नव्हे; तर, देशातल्या कामगार-कर्मचारीवर्गाचीही नंबर एकची शत्रू आहे…त्यांच्याकरवी, देशात ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ व ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour-Code) यांचा ‘बुलडोझर’ फिरवला जाण्यातून व समस्त कामगारवर्ग ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यते’च्या अंधारयुगात ढकलला जाण्यातून, ते क्षणोक्षणी दृग्गोचर होतयंच! एवढंच काय, आता अत्युच्चशिक्षित डाॅक्टर वर्ग (विशेषतः, काॅर्पोरेट-हाॅस्पिटल्समधील) व काॅर्पोरेटीय तंत्रज्ञ वर्ग (इंजिनिअर्स) […]

“‘कंत्राटी पद्धत’ आणि ‘काळी कामगार-संहिता’ : कामगारवर्गाविरुद्धच्या नव्या गुलामगिरीचे शस्त्र!” Read More »

‘कंत्राटी-कामगार पद्धती’तून ‘काळी कामगार-संहिता’…

आम्ही ‘मनुस्मृती’ जाळली आणि मग, महामानवाची जयंती-मयंती साजरी करण्यात मग्न झालो…आम्ही ‘कामगार’ म्हणून ‘वेतन-बोनस’च्या मर्यादित रिंगणात गरगर फिरायला लागलो आणि अलगद ‘कंत्राटी-कामगार पद्धती’च्या चक्रव्यूहात अडकलो! …आणि, तिकडे ते, हाती अर्धवट जळालेली ‘मनुस्मृती’ घेऊन अचूकपणे-अथकपणे काम करत राहिले…तळागाळातल्या लोकांना पुन्हा मुठभरांच्या वर्णवर्चस्ववादी सापळ्यात अडकवण्यासाठी! …फक्त, फरक एवढाच की, यावेळेस त्या मनुस्मृतीच्या पानोपानी ‘भांडवली-व्यवस्थे’चे काळेकुट्ट रंग भरलेले

‘कंत्राटी-कामगार पद्धती’तून ‘काळी कामगार-संहिता’… Read More »

दादरच्या शिवतीर्थावरच्या ‘दिपोत्सवा’चा, डोळ्याचं पारणं फेडणारा लखलखाट पाहिला…आणि, सहजच मनात आलं,

दादरच्या शिवतीर्थावरच्या ‘दिपोत्सवा’चा, डोळ्याचं पारणं फेडणारा लखलखाट पाहिला…आणि, सहजच मनात आलं, “अशा बाहेरच्या कृत्रिम लखलखाटाने अवघ्या जगण्याचा ‘कोंडमारा’ झालेल्या मराठी-घरांमध्ये…’दीप जवळी घेता पाही, अवघा प्रकाश त्याच्या ठायी’, असा आनंद व सुखासमाधानाचा, अंशाने तरी ‘प्रकाश’ पडू शकेल काय? …गावपाड्यांच्या व नगरं-उपनगरांच्या १०’ × १०’ च्या कोंडवाड्याला, या लखलखाटाचा खरोखरीच संसर्ग जडेल काय?? …तो लक्षदिपांचा लखलखाटही कदाचित;

दादरच्या शिवतीर्थावरच्या ‘दिपोत्सवा’चा, डोळ्याचं पारणं फेडणारा लखलखाट पाहिला…आणि, सहजच मनात आलं, Read More »

‘कबूतर-छाप’ पक्ष

ते आले महाराष्ट्रात तेव्हा…’काळी-टोपीधारी’ हाफचड्डीवाल्या लोकांसारखेच (हल्ली, ‘फूल चड्डी’…ज्यासाठी ते, कुठला संस्कृत शब्द नव्हे; तर, चक्क पँट हा ‘आंग्ल’ शब्द वापरतात) इंग्रजांचे दोस्त व स्वातंत्र्य-चळवळीचे ‘मारेकरी’ म्हणूनच…. ते आले महाराष्ट्रात तेव्हा…त्यांच्या हातात ‘लोटा’ नव्हताच; तर, हाती होत्या इंग्रजांनी दिलेल्या ‘बीज-भांडवल’स्वरुप ‘नोटा’ अन् विविध सरकारी-कंत्राटांचा ‘लखोटा’! ते आले महाराष्ट्रात, तेव्हा ‘शिवबां’चा महाराष्ट्र ‘पुण्यवान’ होता, नितीमान होता;

‘कबूतर-छाप’ पक्ष Read More »

ठाण्याचं ‘वाटोळे’ करणारे अनेक ‘पाटोळे’सारखे भुजंग…कित्येक दशकांपासून ठाणे-महापालिकेच्या तिजोरीला ‘वेटोळे’ घालून बसलेत…!!!

ठाण्याचं ‘वाटोळे’ करणारे अनेक ‘पाटोळे’सारखे भुजंग…कित्येक दशकांपासून ठाणे-महापालिकेच्या तिजोरीला ‘वेटोळे’ घालून बसलेत…!!! “Thane is a Dying City…” काँक्रिटच्या उंचच उंच गगनचुंबी ठोकळ्यांमध्ये आणि रस्त्यावरच्या वहातूक-कोंडीमध्ये, श्वास गुदरमरलेलं असं, जर भारतातलं कुठलं एकमेव शहर असेल; तर, ते आहे ‘ठाणे’ शहर…एक सुन्न-मरणासन्न झालेलं शहर, म्हणजे ठाणे-शहर! …तरीही, ठाण्यातले बडे बडे गुंडपुंड राजकारणी व महापालिकेतले अधिकारी, रोज उठून

ठाण्याचं ‘वाटोळे’ करणारे अनेक ‘पाटोळे’सारखे भुजंग…कित्येक दशकांपासून ठाणे-महापालिकेच्या तिजोरीला ‘वेटोळे’ घालून बसलेत…!!! Read More »

आज या क्षणापुरते तरी ‘वल्लभभाई पटेल’ हवे होते…दोन ‘गुजराथी’ गृहमंत्र्यांमधला जमीनअस्मानाचा फरक, पुरता स्पष्ट झाला असता!

https://youtu.be/SOU780bzuEs?si=LIyyzoeiwD0BvtIk

आज या क्षणापुरते तरी ‘वल्लभभाई पटेल’ हवे होते…दोन ‘गुजराथी’ गृहमंत्र्यांमधला जमीनअस्मानाचा फरक, पुरता स्पष्ट झाला असता! Read More »

…प्रकाश राज, अगदी अभावाने व अपवादाने असतात

अंतःकरणाला हात घालणारं, भारतीय-अध्यात्माला प्रतिबिंबित करीत निखळ सत्याकडे धाव घेणारं…अलिकडच्या काळात ऐकलेलं एक अतिशय प्रभावी भाषण! …हे भाषण किंवा भाष्य, अशा एका आधुनिक जगण्यातील ‘कलाक्रिडे’सारख्या मनोरंजनात्मक क्षेत्रामधून अचानक फोफावत उगवलेलं सकस धान्याचं पीक आहे…जिथे, आजुबाजुला सर्वत्र तणंच तण उगवलेलं आहे. कधि त्या तणाचं नाव अमिताभ बच्चन असतं, तर कधि नाना पाटेकर किंवा सचिन तेंडुलकर! …आणि

…प्रकाश राज, अगदी अभावाने व अपवादाने असतात Read More »

सत्य, अहिंसा आणि पर्यावरणाच्या प्रयोगात आयुष्य झोकून देणाऱ्या सोनम वांगचूकवर सत्ता का संतापली?

गौतम बुद्धानंतर या भरतभूमीत, म. गांधींनीच तहहयात असंख्य ‘सत्याचे प्रयोग’ केले, ज्यातून जगभराला कळीकाळाच्या अंतापर्यंत मार्गदर्शन होत राहील…त्यानंतर, बर्‍याच काळानंतर अशातऱ्हेचे अनेक प्रयोग, ‘सोनम वांगचूक’ या समाजहितैषी व निसर्ग-पर्यावरणवादी तंत्रज्ञाने आजवर केलेत. उदाहरणंच द्यायची झाली; तर, १९८८ मध्ये लेहपासून १८ कि मी. अंतरावर शाश्वत-जीवनशैलीवर आधारित निसर्ग-पर्यावरणस्नेही…अशा एका नाविन्यपूर्ण खेडेगावाची निर्मिती त्यांनी केली (The SECMOL OR

सत्य, अहिंसा आणि पर्यावरणाच्या प्रयोगात आयुष्य झोकून देणाऱ्या सोनम वांगचूकवर सत्ता का संतापली? Read More »

लेख, क्र. ११ : ठिणगी ते वणवा…वणवा ते वडवानल!

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) अखेरचा व लेखमालिका समाप्तीचा लेख क्र. ११ * *ठिणगी ते वणवा…वणवा ते वडवानल! जंगलात पडलेली ठिणगी, सहजी विझवता येते; पण, ‘कालहरण’ होऊन ठिणगीचं रुपांतरण वणव्यात झालं तर? तर, वणवा विझवायला समाजाची सर्व ताकद, सर्व संसाधनं पणाला लावावी लागतात… नव्वदीचं दशक व एकविसाव्या शतकाच्या

लेख, क्र. ११ : ठिणगी ते वणवा…वणवा ते वडवानल! Read More »

लेख, क्र. १० : “एक दुकान, एक मकान”

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख, क्र. १० * *”केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे….” दुसरं महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी जिंकल्याच्या ऐन रणधुमाळीत तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांची लोकप्रियता इंग्लंडमध्ये टिपेला पोहोचली असतानाही…ब्रिटीश जनतेनं, युद्धपश्चात शांततेच्या काळात ‘कल्याणकारी-राज्य संकल्पना’ राबविण्याचा ‘जाहीरनामा’ काढलेल्या मजूर पक्षाच्या क्लेमंट ॲटली यांच्या

लेख, क्र. १० : “एक दुकान, एक मकान” Read More »