मराठी

जैन मुनी आचार्य विद्यासागर यांच्या स्मृत्यर्थ खास १०० रुपयाचे नाणे भारत सरकारतर्फे जारी करण्यात आलंय, त्यानिमित्ताने….

आचार्य विद्यासागर यांच्यासह शांतिसागर, तरुणसागर, क्षमासागर वगैरे जैन मुनिंविषयी जरुर आदर आहे, आदर असावा…काहीही हरकत नाही. पण, यांनी संख्येने अल्पसंख्य असलेल्या; मात्र, धनसंपदेनं अतिउन्मत्त झालेल्या आपल्या जमातीविरुद्ध कधि आवाज उठवलेला दिसला आपल्याला? कबुतरांना दाणे खिलवणारी; पण, गोरगरीबांच्या पुढ्यातलं ताट हिसकावून घेणारी…ही जी, या शोषक-जमातीची घृणास्पद धन-लालसा आहे, तिचा उघड निषेध केलाय कधि यांनी?? …तोंडाने एकीकडे […]

जैन मुनी आचार्य विद्यासागर यांच्या स्मृत्यर्थ खास १०० रुपयाचे नाणे भारत सरकारतर्फे जारी करण्यात आलंय, त्यानिमित्ताने…. Read More »

बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा…

“आधीच मर्कट तशात मद्य प्याला”…अशी बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा; नाहीतर, यांना बेरोजगारी-अर्धरोजगारीने संत्रस्त झालेला भारतीय तरुणवर्ग भररस्त्यात जोड्याने हाणेल (अमेरिकेतल्या ‘युनायटेड हेल्थकेअर’च्या ब्रायन थाॅम्सन या CEOचं काय झालं, ते स्मरणात ठेवा)! …’भांडवला’चा गुणधर्मच असा (म्हणूनच, कार्ल मार्क्सने आपल्या ऐतिहासिक ग्रंथाचं नाव ‘दास कॅपिटल’ ठेवलं, ‘दास कॅपिटॅलिस्ट’ नाही ठेवलं) की, ‘अत्युच्चपदी थोर बिघडतो’; तशी

बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा… Read More »

देवेंद्रजी, नक्षलवाद्यांविरोधात धडाडणाऱ्या तुमच्या बंदुका, भ्रष्टाचाराचा गंज चढल्याने इथे लाचार का होतात…???

देवेंद्रजी, नक्षलवाद्यांविरोधात धडाडणाऱ्या तुमच्या बंदुका, भ्रष्टाचाराचा गंज चढल्याने इथे लाचार का होतात…??? …हा प्रश्न, फक्त बीडच्या धनंजय मुंडेंपुरता किंवा त्यांचा ‘हस्तक’ असलेल्या ‘वाल्मिकी’ कराड-गँगपुरता मर्यादित नाहीच…या गुन्हेगारी-खंडणीखोर राजकारणाचा विळखा पुरत्या महाराष्ट्राला केव्हाचाच पडलाय (इथे ‘आकाचा आका’ म्हटल्या गेलेल्या धनंजय मुंडेंचा कालपर्यंत ‘आका’ कोण होता आणि आज कोण आहे, हा प्रश्नही अप्रस्तुत ठरु नये)! सध्या, एकीकडे

देवेंद्रजी, नक्षलवाद्यांविरोधात धडाडणाऱ्या तुमच्या बंदुका, भ्रष्टाचाराचा गंज चढल्याने इथे लाचार का होतात…??? Read More »

सरतं वर्ष आणि घसरतं भारतीय चलन (रुपया)….

“सगळ्याची सोंगं करता येतात…पण, पैशाचं सोंग करता येत नाही”, या उक्तिनुसार गैरमार्गाने (नोटबंदी, इलेक्टोरल-बाॅण्ड, PM Care फंड; तसेच, EVM घोटाळे वगैरे वगैरे माध्यमातून) कमावलेल्या पाशवी बहुमताच्या बळावर, एकूणएक सरकारी-यंत्रणा व सर्व प्रसारमाध्यमं…आपल्या किंवा आपल्या मित्रपरिवारातल्या अब्जाधीशांच्या (Crony-Capitalists) ताब्यात ठेऊन, भारतीय-अर्थव्यवस्थेची लक्तरं, खोट्या सरकारी-आकडेवारीच्या पडद्याआड कितीही झाकू पाहिली; तरी, ‘घसरता रुपया’ काही सावरता येत नाही आणि

सरतं वर्ष आणि घसरतं भारतीय चलन (रुपया)…. Read More »

आम्ही उरलो आता बाबासाहेबांची जयंती-मयंती साजरी करण्यापुरते, आरक्षणाची आरती ओवाळण्यापुरते….

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी थेट ‘साम्यवादा’चा, जसा कार्ल मार्क्सने सांगितला तसा, परिपूर्ण स्विकार केला नसला; तरीही, ‘समतेच्या संदेशा’चा प्रवासही, कुठेतरी त्या साम्यवादी-समाजवादी सडकेवरुनच दौडत होणार, हे त्यांच्यासारख्या प्रज्ञावानाला ठाऊक असणारच. त्यादृष्टीनेच, ॲडम स्मिथचे “मुक्त बाजारपेठीय तत्त्वज्ञान, हे ‘अस्पर्श’ राखण्याएवढं ‘अंतिम-सत्य’ वा अतिपवित्र असणं… किंवा, माणूस हे वासनांचं गाठोडं असल्याने प्रत्येक माणूस, हा अविरत आपापला स्वार्थ जपणारा

आम्ही उरलो आता बाबासाहेबांची जयंती-मयंती साजरी करण्यापुरते, आरक्षणाची आरती ओवाळण्यापुरते…. Read More »

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….अखेरचा लेख क्रमांक ८

बरोबर महिनाभरानंतर सॅमसंग विजयाचा अन्वयार्थ समाप्त करत असताना…मुद्दामहून हे सांगितलं गेलं पाहिजे की, त्या सॅमसंग ऐतिहासिक विजयाचं अप्रूप-कौतुक यासाठीच कारण, …हल्लीच्या ‘कामगारधर्म’ नावाची चीजच ठाऊक नसलेल्या ‘नाचीज’ कामगारवर्गाला, संघर्षासाठी तयार करणं आणि एकदा तयार केल्यावर संघर्षाच्या ‘अग्निपथा’वर कायम राखणं…हे फार अवघडच नव्हे; तर, अशक्यप्राय काम होत चाललंय! …ज्यांना एरव्ही कंपनीतलं काळंकुत्र देखील विचारत नसतं; अशांना

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….अखेरचा लेख क्रमांक ८ Read More »

महाराष्ट्र-विधानसभा-निवडणुकीचा अन्वयार्थ, थोडक्यात….

मुसलमानांची जिरवायची म्हणून मराठे भाजपसोबत, मराठ्यांची (जरांगे-पाटलाची) जिरवायची म्हणून ओबीसी भाजपसोबत, प्रकाश आंबेडकरांच्या मागणीला (‘अंगापेक्षा बोंगा मोठा’, असा तो ‘अतिहावरेपणा’ला का असेना) कधिच सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत; म्हणून, ‘मविआ’ची जिरवायला ‘दलित’ भाजपसोबत आणि शिवसेनेनंच ‘भाजप-संघा’ला मोठं केलं; म्हणून, शिवसेनेची जिरवायला ‘मुसलमान’ भाजपसोबत…. …ही विधानसभा-निवडणूक म्हणजे, “मत अडवा, मत जिरवा”, असा कुठला ‘जिरवाजिरवी’चा ‘एक कलमी’ किंवा

महाराष्ट्र-विधानसभा-निवडणुकीचा अन्वयार्थ, थोडक्यात…. Read More »

“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”…

“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”, असं ज्या निवडणुकीचं एका वाक्यात वर्णन करता येईल; अशा ‘अंकल सॅम’च्या नुकत्याच लागलेल्या निवडणूक-निकालानंतर तर, भांडवली-व्यवस्थेसंदर्भातील अनेक गंभीर प्रश्न आता सातत्याने ऐरणीवर येत राहतील. ८ वर्षांपूर्वी ‘अमेरिका फर्स्ट’, हे अमेरिकेची ताकद, सुरक्षा व वर्चस्व जगभरात अव्वल नंबरवर राखण्याबाबतचं वक्तव्य करणाऱ्या डोनाल्ड ट्रंप नावाच्या अब्जाधीश उद्योगपतीची, याहीवेळेस

“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”… Read More »

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ७

मराठी घरातील दिवाळी म्हणा, दिपावली म्हणा… हा नवचैतन्यानं सळसळणारा, नरकचतुर्दशीच्या पहाटेला उटण्याच्या दरवळणार्‍या सुगंधाचं लेणं घेऊन येणारा अन् चकली, चिवडा, करंज्या (कानोले), रवा-बेसनाचे लाडू, अनारसे, शंकरपाळ्या वगैरे फराळाचा घमघमाट चारही दिशांनी उधळून देणारा ‘दिपोत्सव’…दिवाळी रात्री वा पहाटेचं बाहेरचं वातावरण, पणत्यांच्या ज्योतींनी व कंदिलाच्या दिव्यांनी उजळवून टाकण्यापेक्षाही अधिक…वर्षभर, “दिवाळीच्या मुळा, लेकी आसावली”, अशी दिवाळीची चातकासारखी वाट

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ७ Read More »

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ६

महाराष्ट्रात तसे ‘रोजगार’ नाहीत, असं काही नव्हे; ते आहेतच…’बेरोजगारी’ ही महाराष्ट्रातल्या मराठी-माणसाची अनेक समस्यांपैकी एक समस्या असली; तरी, त्याहूनही मोठी (अगदी, महाराष्ट्रभरात अक्राळविक्राळ पसरलेली) समस्या म्हणजे, ‘अर्धरोजगारी’ची समस्या होय… ‘अर्धरोजगार’, म्हणजे ज्या रोजगाराच्या तुटपुंज्या मिळकतीत संसाराची गोधडी धड शिवता येत नाही, संसाराचा गाडा सन्मानाने नीट हाकता येत नाही आणि जो रोजगार, अतिशय असुरक्षित बेभरवशी म्हणून

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ६ Read More »