मराठी

२०२४ लोकसभा-निवडणुकीतील धक्कादायक राजकीय परिस्थितीचा विश्लेषण – उत्तरेत हाफ दक्षिणेत साफ

“उत्तरेत हाफ आणि दक्षिणेत साफ” अशा, २०२४च्या लोकसभा-निवडणुकीच्या पहिल्याच चरणात दिसायला लागलेल्या सुस्पष्ट संकेतांनंतर…गुजराथी पंतप्रधानांना भयंकर मिरची झोंबलीय आणि ते, पंतप्रधानपदाची इभ्रत तर सोडाच; पण सामान्य भारतीय-नागरिक म्हणूनही जो काही आब, जी काही मानमर्यादा असते… ते सगळं सोडून, कालचं काँग्रेसचं मनमोहनसिंग सरकार व आजचं काँग्रेसचं न्यायपत्र…यासंदर्भात, पं. नरेंद्र मोदी, वाटेल ते खोटंनाटं व देशात दंगलप्रवण […]

२०२४ लोकसभा-निवडणुकीतील धक्कादायक राजकीय परिस्थितीचा विश्लेषण – उत्तरेत हाफ दक्षिणेत साफ Read More »

भारतीय लोकशाहीत राममंदिर निर्णयाचा प्रभाव – समग्र अवलोकन

राममंदिर न्यायालयीन-निर्णय प्रक्रियेतून बांधलंत (स्वतःच्या निर्णयानुसार नव्हे), रामजन्मभूमीपासून दूर बांधलंत…तरी, सगळ्यांनी स्विकारलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काहीसा वादग्रस्त होता, त्यातून न्यायमूर्ती गांगुली राज्यसभेवर गेल्याचं बोललं जातं…तरीही, अगदी मुस्लिमांनीसुद्धा समजूतदारपणा दाखवून बव्हंशी शांतपणे सगळं स्विकारलं…पण, तुम्ही लोकशाहीवरच, निवडणूक-प्रक्रियेवरच घाला घालू पहाल… तर, हा तमाम भारत, ‘अळीमिळी गूपचिळी’, असा चूप बसणार नाही…तुम्हाला या लोकसभा-निवडणुकीतून तो धडा शिकवेलच! …हं,

भारतीय लोकशाहीत राममंदिर निर्णयाचा प्रभाव – समग्र अवलोकन Read More »

रुद्रेश सातपुते यांच्या संदेशावरील प्रतिक्रिया….

रुद्रेशजी, उत्तर भारतीयांचं आक्रमण कधि ना कधि परतवता येईल किंवा प्रशांत किशोरसारख्यांच्या हातून नजिकच्या भविष्यात सुदैवाने बिहारचा कायापालट झालाच; तर, परिस्थितीत आमूलाग्र बदल एकवेळ होऊ शकेल (कारण, उत्तर भारतीयांकडे कितीही संख्याबळ असलं; तरी, धनसंपत्तीचं तेवढ्याप्रमाणात बळ नाहीच); पण, धनाढ्य गुजराथी-भाषिकांना निपटून काढणं, जेवढं अत्यावश्यक आहे, तेवढंच ते कमालीचं अवघड आव्हान आहे. कारण ‘महालक्ष्मी’ आणि महालक्ष्मीच्या

रुद्रेश सातपुते यांच्या संदेशावरील प्रतिक्रिया…. Read More »

पुण्यातील ड्रग्सच्या नशेतील तरुणींच्या सर्वत्र व्हायरल व्हिडीओवरील ‘धर्मराज्य पक्षा’ची प्रतिक्रिया…

सर्वत्र व्हायरल झालेल्या वरील संदेशावर, ‘धर्मराज्य पक्षा’ची प्रतिक्रिया खालीलप्रमाणे…आपल्या चरणी सादर! —————— …मुळातूनच ‘भांडवली-व्यवस्था’, हे मनुष्यजातीला जडलेलं, स्वतःच एक भयंकर ‘व्यसन’ असल्याने…तदनुसारच, आजची ‘कौटुंबिक-व्यवस्था’ देखील आत्मकेंद्रित व चंगळवादी बनत चाललीय, यात नवल ते काय? एकूणच भांडवली-व्यवस्थेतील अमानुष स्पर्धेला आपल्या अंगी भिनवूनच, त्याला समांतर अशी आपली आजची कौटुंबिक-व्यवस्था पुढे धावू पहाते. शिक्षण घेत असतानाचे भयानक ताणतणाव

पुण्यातील ड्रग्सच्या नशेतील तरुणींच्या सर्वत्र व्हायरल व्हिडीओवरील ‘धर्मराज्य पक्षा’ची प्रतिक्रिया… Read More »

ध्रुव राठीच्या अभ्यासपूर्ण व्हिडीओवरील प्रतिक्रिया…

उत्तर-दिशादिग्दर्शन करत, रात्रीच्या अंधःकारमय विश्वात अचूक मार्गदर्शन करणाऱ्या, आकाशातल्या अढळ ध्रुव तार्‍यासारखेच भारतीय समाजाला मार्गदर्शक ठरलेल्यांपैकी एक ‘ध्रुव राठी’… एखाद्या ‘अग्निपथावरावरुन चालणाऱ्या अग्निवीरा’सारखा (मोदी-शाह सरकारकडून गंडवले गेलेले ‘अग्निपथावरील लष्करी अग्निवीर’ नव्हे!) या व्हिडीओतून… महाभारत युद्धसमयी श्रीकृष्णाने अर्जुनाला जसं विश्वरुप दर्शन घडवलं होतं…तसंच, मोदी-शाह सरकारच्या ‘काॅर्पोरेट-शाही’च्या काळ्याकुट्ट अंतरंगाचं रौद्रभीषण दर्शन आपल्याला घडवतोय! अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला

ध्रुव राठीच्या अभ्यासपूर्ण व्हिडीओवरील प्रतिक्रिया… Read More »

“शिवछत्रपती, म्हणजे ‘तलवारबाजी’ नव्हे, तर महान जीवनमूल्यांसाठी लावलेली ‘प्राणाची बाजी’!”

शिवछत्रपतींनी शेतीला सर्वंकष उत्तेजन दिलं… शेतीला उत्तेजन देतानाच, भूमिहीन भूदासांना (Serfs) कसायला जमिनीचे पट्टे नावावर करुन दिले. नैसर्गिक-आपत्तीत बी-बियाणे, शेतीची अवजारे पुरवून प्रसंगी शेतसारा देखील माफ केला…भूमिहीन कुळांच्या आयुष्याला ‘स्थिरता’ दिली. म्हणजेच, आजच्या परिभाषेत सांगायचं; तर, ‘कंत्राटी-कामगार’, नावाच्या आधुनिक ‘गुलामां’ना (ज्यांच्या जगण्यातली ‘सुरक्षितता, स्थिरता व सन्मान’ हिरावून घेतला गेलाय) नोकरीत ‘कायम’ केले! आपले राजकीय अंतःस्थ

“शिवछत्रपती, म्हणजे ‘तलवारबाजी’ नव्हे, तर महान जीवनमूल्यांसाठी लावलेली ‘प्राणाची बाजी’!” Read More »

‘शिवजयंति’च्या निमित्ताने….

(आजच्या इंग्रजी दिनदर्शिकेनुसार असलेल्या ‘शिवजयंति’च्या निमित्ताने….) शिवछत्रपतींनी एकूणच सर्वधर्मसमभावाचा, न्यायनीतिपूर्ण व्यवहाराचा (“जो चुकला, त्याला ठोकला”, या ‘व्यक्ति व जातधर्मपंथ’ निरपेक्ष रोकड्या-कणखर नीतिद्वारे)…जो केवळ, महाराष्ट्रापुरताच नव्हे; तर, संपूर्ण विश्वासाठी, मूर्तिमंत आदर्श घालून दिलाय; त्याला, कुठे तोड नाही! म्हणूनच, “शिवछत्रपती, म्हणजे केवळ, ‘तलवारबाजी’ नव्हे; तर, उच्चकोटीच्या जीवनमुल्यांसाठी लावलेली ‘प्राणाची बाजी’ होती”! आपल्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात, ‘आखरी

‘शिवजयंति’च्या निमित्ताने…. Read More »

मधुरा स्वामिनाथन आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराची भाजपाई खिरापत…..

एका बाजुला ‘भारतरत्न’ पुरस्काराची ‘खिरापत’ वाटणार्‍या…आणि, दुसर्‍या बाजुला शेतकरी-शेतमजूर, कामगार, उच्चपदस्थ अधिकारीवर्गाकडून ‘खच्चीकरण’ करण्यात आलेला पोलीसदलातील हवालदार-शिपाईवर्ग, लष्करात भरती होऊ पहाणारी नवतरुणाई (तथाकथित, अग्निपथावरील अग्निवीर), ट्रकचालक-रिक्षावाले, सेवेतून निवृत्त झालेला समस्त कामगार-कर्मचारीवर्ग….अशा, देशातल्या तळागाळातील सर्वच समाज-घटकांवर ‘आफत’ आणणाऱ्या; मोदी-सरकारचं ‘मधुरा स्वामिनाथन’कृत ‘वस्त्रहरण’…. ———————————————– ज्यांनी, १९६०च्या दशकात भारतात ‘हरितक्रांती’ आणली, त्या एम. एस. स्वामिनाथनांची मुलगी मधुरा स्वामिनाथन

मधुरा स्वामिनाथन आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराची भाजपाई खिरापत….. Read More »

‘पलटूमार’ (पलटू’राम’, संबोधून ‘रामा’ला कशाला बदनाम करायचं?) नितीशकुमारांच्या ‘विश्वासदर्शक ठराव’ संमत करवून घेण्याच्या पार्श्वभूमीवर….

“जेल जाने के बाद, उन्हे जंगल का जीवन याद आ रहा होगा”, ‘गोदी-मिडीया’तल्या एका सवर्ण अँकरने असा फुत्कार टाकणं…म्हणजे द्रौपदी मुर्मू, या ‘आदिवासी’ महिलेला राष्ट्राध्यक्षा बनवल्या जाण्यातली ‘भाजपाई-नौटंकी’, भारतीय जनतेसमोर उघडी पडणं! बँकांचे हजारो कोटी लुटून विदेशी पळून गेलेल्या व देशात राहून देश लुटणाऱ्या धनदांडग्या गुजराथ्यांच्या केसालाही धक्का न लावणारी ‘गुजराथी-लाॅबी’… हाती सबळ पुरावा नसतानाही

‘पलटूमार’ (पलटू’राम’, संबोधून ‘रामा’ला कशाला बदनाम करायचं?) नितीशकुमारांच्या ‘विश्वासदर्शक ठराव’ संमत करवून घेण्याच्या पार्श्वभूमीवर…. Read More »

International Court of Justice (ICJ) orders Israel to prevent acts of genocide “with immediate effect”! …THE HINDU

ज्या इस्त्रायली ज्यूंनी ॲडाॅल्फ हिटलरच्या ‘वांशिक-नरसंहारा’चा सामना केला होता…त्या ज्यूंचं इस्त्रायल, हे राष्ट्रच, आज पॅलेस्टाईनींचा वंशविच्छेद करु पहातंय, यात आतातरी कुणाला कुठलीही शंका उरली नसावी! मणिपुरमधल्या दीर्घकालीन देशांतर्गत हिंसाचार-जाळपोळीकडे हेतूतः दुर्लक्ष करण्याचा अक्षम्य गुन्हा करणारे आणि इस्रायलला अगदी तत्पर व उत्साहाने पाठींबा देणारे; भाजपाई-संघीय लोक, तोंडावर आपटलेत…तभी तो, ‘गोदी-मिडीया’ में इतना भारी सन्नाटा है! …राजन

International Court of Justice (ICJ) orders Israel to prevent acts of genocide “with immediate effect”! …THE HINDU Read More »