राममंदिर

रावणराज्यात राममंदिर…..कलियुगाचा अगाध महिमा…!!!

इटलीचा क्रूरकर्मा मुसोलिनीची ‘काळी टोपी’ घालणाऱ्या आणि लाखो-करोडोंना यमसदनी पाठवणाऱ्या जर्मनीच्या नृशंस-नराधम हिटलरला आदर्श मानणाऱ्यांच्या नादाने… भारतातली तथाकथित हिंदुत्ववादी तरुणाई, हातात भगवे झेंडे नाचवत-थिरकत ‘जय श्रीराम’ अशा, इतरेधर्मीयांना धमकावणीच्या सुरातल्या आरोळ्या देताना दिसतेय…तेव्हा, एक गोष्ट निश्चित होते, ती म्हणजे, “डेमाॅक्रॅटिक (लोकशाहीप्रधान) भारताची, थिऑक्रॅटिक (धर्मप्रधान) पाकिस्तानच्या दिशेने अधोगती सुरु झालीय”…म्हणजे, पाकिस्तानचा द्वेष करता करता, आपण त्या […]

रावणराज्यात राममंदिर…..कलियुगाचा अगाध महिमा…!!! Read More »

बिल्कीस बानो आणि अयोध्येतलं राममंदिर…

“बिल्कीस बानो, प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या सणसणीत निकालाने…ब्रिजभूषणसिंग, कुलदीपसिंग सेंगर, संदीपसिंग सैनी यासारख्या अनेक बलात्कारी किंवा लैंगिक-अपराधी आमदार-खासदार-मंत्र्यांनी खच्चून भरलेल्या; तरीही, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अशा दांभिक घोषणा तारस्वरात देणाऱ्या आणि ‘मुँह में राम, बगल में छुरी’ पॅटर्न राबवत अयोध्येत ‘राममंदिर’ बांधू पहाणाऱ्या…भाजपाई डबल-इंजिन सरकारांचं जागतिकस्तरावर, असं काही ‘वस्त्रहरण’ अमृतकाळात झालंय की, जे गेल्या सातआठ दशकात,

बिल्कीस बानो आणि अयोध्येतलं राममंदिर… Read More »

‘‘स्थापनेपासून धर्मराज्य पक्षा’’च्या आणि तत्पूर्वी, कामगार-चळवळीच्या व अन्य सामाजिक चळवळींच्या व्यासपीठावरुन आम्ही गेल्या दोन दशकाहून अधिककाळ, हे तळमळून व कळवळून सांगतोय… पण, लक्षात कोण घेतो?

अमेरिकेत १९६५ साली तळाचा कामगार आणि सर्वोच्च स्थानी असलेला CEO यांच्या वेतनमानाचं (सोयीसुविधा, सवलतींसह) १ : २० असणारं गुणोत्तर गेल्यावर्षी (वर्ष-२०१८) जर, १ : २८७ पर्यंत पोहोचल्याचा समस्त अमेरिकन नागरिकांना एवढा जबरदस्त धक्का बसला असेल; तर, भारतात तर हे गुणोत्तर, केव्हाच १ : १००० चा आकडा पार करुन गेलय… एवढी महाभीषण आर्थिक-विषमता मौजूद असूनही, भारतीय

‘‘स्थापनेपासून धर्मराज्य पक्षा’’च्या आणि तत्पूर्वी, कामगार-चळवळीच्या व अन्य सामाजिक चळवळींच्या व्यासपीठावरुन आम्ही गेल्या दोन दशकाहून अधिककाळ, हे तळमळून व कळवळून सांगतोय… पण, लक्षात कोण घेतो? Read More »