Rajan Raje

महाराष्ट्र-विधानसभा-निवडणुकीचा अन्वयार्थ, थोडक्यात….

मुसलमानांची जिरवायची म्हणून मराठे भाजपसोबत, मराठ्यांची (जरांगे-पाटलाची) जिरवायची म्हणून ओबीसी भाजपसोबत, प्रकाश आंबेडकरांच्या मागणीला (‘अंगापेक्षा बोंगा मोठा’, असा तो ‘अतिहावरेपणा’ला का असेना) कधिच सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत; म्हणून, ‘मविआ’ची जिरवायला ‘दलित’ भाजपसोबत आणि शिवसेनेनंच ‘भाजप-संघा’ला मोठं केलं; म्हणून, शिवसेनेची जिरवायला ‘मुसलमान’ भाजपसोबत…. …ही विधानसभा-निवडणूक म्हणजे, “मत अडवा, मत जिरवा”, असा कुठला ‘जिरवाजिरवी’चा ‘एक कलमी’ किंवा […]

महाराष्ट्र-विधानसभा-निवडणुकीचा अन्वयार्थ, थोडक्यात…. Read More »

” ‘काळा पैसा’ हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री”

“विजय कोणत्याही पक्षाचा नाही, व्यक्तिचा नाही, जनतेचाही नाही आणि धर्माचा तर नाहीच नाही…या सगळ्यांचाच दणदणीत पराभव करुन निवडणुकीत वाटलेल्या काळ्या पैशाने विजय मिळवलाय… आता, यापुढे ‘काळा-पैसा’ हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री”, ही एक समाजमाध्यमातील मार्मिक प्रतिक्रिया वाचल्यानंतर…. “पैशाच्या महा(युती)पुरे झाडे जाती, तेथे ५१ लव्हाळे वाचती…!!!” असाच, या महाराष्ट्र विधानसभा-निवडणूक निकालाचा ‘सातबारा’ मांडावा लागेल. …यापेक्षा, महाराष्ट्र-विधानसभा निवडणूक-निकालाचं वेगळं

” ‘काळा पैसा’ हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री” Read More »

कालची लोकसभेची काय किंवा आजची महाराष्ट्र-विधानसभेची काय…दोन्ही निवडणुका; तसेच, देशाच्या इतर राज्यांतील निवडणुका, या कमालीच्या विषम पातळीवरील लढती होत्या व आहेत….

कालची लोकसभेची काय किंवा आजची महाराष्ट्र-विधानसभेची काय…दोन्ही निवडणुका; तसेच, देशाच्या इतर राज्यांतील निवडणुका, या कमालीच्या विषम पातळीवरील लढती होत्या व आहेत…. लोकसभा-निवडणुकीनंतर जर, दुसर्‍या क्रमांकाचं महत्त्व कशाला असेल; तर ते आहे, महाराष्ट्राच्या विधानसभा-निवडणुकीला! अमेरिकेत न्यूयाॅर्कचं, जे राजधानी ‘वॉशिंग्टन’पेक्षाही मोठं असं अनन्यसाधारण महत्त्व…तेच, मुंबई-महाराष्ट्राचं दिल्लीहूनही कितीतरी पटीने अधिक महत्त्व…म्हणूनच, ‘गुजराथ-नागपूर’ परिवारातल्या ‘वासवी’ भांडवली-‘संघ’शक्ति एकत्र येऊन (हा

कालची लोकसभेची काय किंवा आजची महाराष्ट्र-विधानसभेची काय…दोन्ही निवडणुका; तसेच, देशाच्या इतर राज्यांतील निवडणुका, या कमालीच्या विषम पातळीवरील लढती होत्या व आहेत…. Read More »

“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”…

“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”, असं ज्या निवडणुकीचं एका वाक्यात वर्णन करता येईल; अशा ‘अंकल सॅम’च्या नुकत्याच लागलेल्या निवडणूक-निकालानंतर तर, भांडवली-व्यवस्थेसंदर्भातील अनेक गंभीर प्रश्न आता सातत्याने ऐरणीवर येत राहतील. ८ वर्षांपूर्वी ‘अमेरिका फर्स्ट’, हे अमेरिकेची ताकद, सुरक्षा व वर्चस्व जगभरात अव्वल नंबरवर राखण्याबाबतचं वक्तव्य करणाऱ्या डोनाल्ड ट्रंप नावाच्या अब्जाधीश उद्योगपतीची, याहीवेळेस

“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”… Read More »

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ७

मराठी घरातील दिवाळी म्हणा, दिपावली म्हणा… हा नवचैतन्यानं सळसळणारा, नरकचतुर्दशीच्या पहाटेला उटण्याच्या दरवळणार्‍या सुगंधाचं लेणं घेऊन येणारा अन् चकली, चिवडा, करंज्या (कानोले), रवा-बेसनाचे लाडू, अनारसे, शंकरपाळ्या वगैरे फराळाचा घमघमाट चारही दिशांनी उधळून देणारा ‘दिपोत्सव’…दिवाळी रात्री वा पहाटेचं बाहेरचं वातावरण, पणत्यांच्या ज्योतींनी व कंदिलाच्या दिव्यांनी उजळवून टाकण्यापेक्षाही अधिक…वर्षभर, “दिवाळीच्या मुळा, लेकी आसावली”, अशी दिवाळीची चातकासारखी वाट

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ७ Read More »

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ६

महाराष्ट्रात तसे ‘रोजगार’ नाहीत, असं काही नव्हे; ते आहेतच…’बेरोजगारी’ ही महाराष्ट्रातल्या मराठी-माणसाची अनेक समस्यांपैकी एक समस्या असली; तरी, त्याहूनही मोठी (अगदी, महाराष्ट्रभरात अक्राळविक्राळ पसरलेली) समस्या म्हणजे, ‘अर्धरोजगारी’ची समस्या होय… ‘अर्धरोजगार’, म्हणजे ज्या रोजगाराच्या तुटपुंज्या मिळकतीत संसाराची गोधडी धड शिवता येत नाही, संसाराचा गाडा सन्मानाने नीट हाकता येत नाही आणि जो रोजगार, अतिशय असुरक्षित बेभरवशी म्हणून

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ६ Read More »

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ५

मराठी कामगार-कर्मचारीवर्गाची हीनदीन, अवनत-अवमानित अवस्था निर्माण होण्याचं तिसरं प्रमुख कारण म्हणजे…जगभरात प्रगत देशांमध्ये ‘कामगारविश्वाभोवतीच राजकारणाची दुनिया फिरत असते आणि कामगार नेतेच बव्हंशी देशाचं राजकारण चालवतात… तर, आमच्या महाराष्ट्र-देशात याच्या पूर्णतः विपरीत स्थिती आहे! ‘कामगार-धर्मा’च्या अथवा कामगारांच्या ‘वर्ग-जाणिवे’च्या दृष्टीकोनातून कामगार-कर्मचारीवर्ग निद्रिस्त असल्यामुळे, जाज्वल्य कामगार नेत्यांना राजकारणात काळं कुत्रं देखील विचारत नाही! आणि, त्यामुळेच, त्यांच्यात फूट पाडणं,

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ५ Read More »

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक ४)

कामगार-कर्मचारीवर्गाची हीनदीन, अवनत-अवमानित अवस्था निर्माण होण्याचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे…त्यांच्यात एकप्रकारे ‘बुद्धीमांद्य’ निर्माण करुन, त्यांना जीवन-संघर्षापासून दूर नेणाऱ्या आणि त्यांना ‘दैववादी’ बनवणाऱ्या यच्चयावत सगळ्याच धर्मसंप्रदायांची महाराष्ट्रभरात झालेली मोकाट पैदास! ‘हिंदुत्वा’च्या भंडार्‍याची उधळण करतच महाराष्ट्रात ‘दैववादा’ला व किंकर्तव्यमूढतेला एकच उधाण आणण्यात आलं….त्याचाच भाग म्हणून पावसाळ्यात उगवणाऱ्या कुत्र्यांच्या-कावळ्यांच्या छत्र्यांप्रमाणेच बैठक-संप्रदाय, बापू संप्रदाय, जीवनमिशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, स्वाध्याय-परिवार,

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक ४) Read More »

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक ३)

…अर्थातच, ‘कामगार-चळवळ’ आणि पावसाळ्यातील ‘गांडुळांची वळवळ’… हे जवळपास समानार्थी शब्द बनण्याचा संपूर्ण दोष, केवळ मराठी-कामगारांना देण्यात बिलकूल हशील नाहीच; कारण, चारपाच दशकांपासून आमच्या मराठी-मनावर ‘गारुड’ करुन बसलेल्या प्रभावशाली ‘भांडवल-धार्जिण्या’ राजकीय नेत्यांकडूनच टप्प्याटप्प्याने व अत्यंत पद्धतशीरपणे मराठी-कामगारांचं ‘खच्चीकरण’ करण्यात आलंय {ज्याचा पहिला टप्पा, हा साम्यवाद्यांना ‘लाल माकडं’ म्हणून हिणवत त्यांची प्रचंड नालस्ती करण्याचा…भडक माथ्याच्या अविचारी-अविवेकी मराठी-तरुणांना

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक ३) Read More »

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक २)

…जरी, CPM सत्तारूढ स्टॅलिन-सरकारचा घटक-पक्ष असला; तरी, फारशा राजकीय-पाठबळाविनाच निव्वळ कामगारांच्या पोलादी एकजुटीच्या व वज्रनिर्धाराच्या बळावर…उन्मत्त झालेल्या ‘सॅमसंग-व्यवस्थापना’ला, ज्यापद्धतीने सॅमसंगच्या लढाऊ कामगारांनी (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ‘CITU’/’सिटू’ युनियन) नमवलंय …त्याला, महाराष्ट्रभरातील कामगारांतर्फे “धर्मराज्य-सलाम”! हा, दाक्षिणात्य (विशेषतः, केरळ, तामीळनाडुमधील) आणि बंगाली कामगार-कर्मचारीवर्गाचा ज्वलंत-जाज्वल्य लढाऊ बाणा, ‘मराठी-कामगारां’च्या रक्तात कधि उतरणार? …चार शतकांपूर्वी एक ‘शिवाजी’ जन्माला येतो काय अन्

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक २) Read More »