Blog

Your blog category

गाझा-इस्पितळावरील इस्त्रायली-नृशंस हल्ला

मरणारे ऋग्ण मेले, कोवळे जीव मारले गेले (आपण फक्त, हतबलपणे संख्या मोजत रहायची)…बाॅम्बफेक अथवा मिसाईलफेक करुन त्यांना मारताना, ज्यांच्या अंतःकरणाला कुठला विचार शिवला नाही, ज्यांचं अंतःकरण किंचितही द्रवलं नाही… ते इस्त्रायली नेत्यान्याहू-सरकार, गाझा-इस्पितळावरील हल्ल्यानंतर “तो मी नव्हेच”, या बदमाषीपूर्ण भांडवली-शैलीत… “तो हल्ला करणारे, आम्ही नव्हेच” असं, गेंड्याची कातडी पांघरुन निगरगट्टपणे जगभरच्या प्रचार-प्रसार माध्यमांतून बोंबलत सांगू […]

गाझा-इस्पितळावरील इस्त्रायली-नृशंस हल्ला Read More »

ऑपरेशन राहुल गांधी, मग संजयसिंग आणि आता, महुआ मोईत्रा…गौतम अदानीला वाचविण्यासाठी, केविलवाणी भाजपाई कसरत!

दुबेंच्या ‘सुपारीबाज’ निशिकांतचा जो ‘आकांत’, आजवर चालत आलेला आहे… तो कधि राहुल गांधींच्या विरोधात, कधि ‘आप’च्या जिगरी संजयसिंगांच्या (सध्या टार्गेट, महुआ मोईत्रा) विरोधात, तर कधि मोदी-शाह राजवटीतल्या तमाम गैरप्रकारांवर लिहीणार्‍या पत्रकारांवर विरुद्ध… असा, कायमच ‘सुपारी’ घेतल्यासारखा चालू असतो. तेच, त्या निशिकांत दुबेंचं एकमेव कर्तृत्त्व (ज्यातून, लोकसभा-निवडणुकीतील तिकीट पक्कं करण्याचा त्यांचा नापाक इरादा आहे). एकूणच विरोधकांच्या

ऑपरेशन राहुल गांधी, मग संजयसिंग आणि आता, महुआ मोईत्रा…गौतम अदानीला वाचविण्यासाठी, केविलवाणी भाजपाई कसरत! Read More »

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’

कालपरवापर्यंत, देशामधील अनेक कंपन्या-कारखान्यांमध्ये, विशेषतः, महाराष्ट्रातील रासायनिक उद्योगांमध्ये, औद्योगिक-अपघातांची मालिका सुरुच आहे. यावर ताण म्हणजे, ‘आऊटसोर्सिग’च्या शोषणकारी नव-भांडवली तंत्रातून बनलेल्या छोट्यामोठ्या वर्कशाॅप्समधील तर, सातत्याने होणाऱ्या शेकडो-हजारो अपघातांची ना कुठली नोंद, ना मरणाऱ्या किंवा जखमी होणाऱ्या ‘कामगार’ नावाच्या आधुनिक ‘गुलामां’ची कुणाला पर्वा! …औद्योगिक-सुरक्षिततेचे अतिशय खर्चिक व काटेकोर नियम पाळण्यात अमानुष हेळसांड संबंधितांकडून होत असल्यानेच, ती मानवनिर्मित

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’ Read More »

सिंचन घोटाळ्यातल्या फाईल्स बंद करुन घेतल्यानंतर, आरोपपत्रातून (चार्जशीट) आपलं नाव गायब करुन घेतल्यानंतर… “५% मुस्लिम आरक्षण” एल्गाराचा, अजित पवारांचा ‘फूल टू पाॅवरफूल राजकीय गेम’…!!!

सतत, आपला राजकीय स्वार्थ व सोयीनुसार बदलत्या राजकीय-भूमिका आणि गद्दारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातून झपाट्याने ‘बेदखल’ होऊ लागलेल्या अजितदादा पवारांनी, ‘आखरी रास्ता और डुबने से पहले एक तिनके का वास्ता” म्हणून, आपल्या मंत्रिमंडळातील दोन मुस्लिम मंत्र्यांसोबत (हसन मुश्रीफ व अब्दुल सत्तार) घेतलेल्या बैठकीत “५% मुस्लिम आरक्षणा”चा एल्गार करुन सध्याच्या गद्दारीच्या, फोडाफोडीच्या महाराष्ट्रीय राजकारणात मोठा बाॅम्बस्फोटच केलाय! अजितदादा,

सिंचन घोटाळ्यातल्या फाईल्स बंद करुन घेतल्यानंतर, आरोपपत्रातून (चार्जशीट) आपलं नाव गायब करुन घेतल्यानंतर… “५% मुस्लिम आरक्षण” एल्गाराचा, अजित पवारांचा ‘फूल टू पाॅवरफूल राजकीय गेम’…!!! Read More »

२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”?

सध्या आहे त्या अवस्थेतल्या लुटारु-शोषक ‘भांडवली-व्यवस्थे’तली ‘बँकिंग-व्यवस्था, जनसामान्यांना खरंच आकळायला लागली (जे फार काही अवघड मुळीच नव्हे) तर, रिझर्व्ह बॅंकेसह सर्वच बँकांची पद्धतशीर लूट कशी सुरु आहे, ते जनतेला हळूहळू ध्यानात येईल. रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन किंवा ऊर्जित पटेल, ती लूट करु देत नव्हते… म्हणून, पं. नरेंद्र मोदींनी त्यांना नाहक बदनाम करताना, “रिझर्व्ह

२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”? Read More »

कॉर्पोरेट-दहशतवाद

गेली अनेक वर्षांपासून कंपनी-दहशतवादाबद्दल (Corporate-Terrorism) कंठशोष करुन आम्ही बोलतो आहोत, जीव तोडून लिहीतो आहोत… पण, लक्षात कोण घेतो ??? ‘दहशतवाद’, हा कोणाचाही, कुठल्याही कारणाने असो… त्याची नांगी वेळीच साफ ठेचून टाकलीच पाहीजे! विशेषतः, “जातधर्मीय आणि काॅर्पोरेटीय दहशतवाद” तर, जिथे असेल तिथे, जिथे दिसेल तिथे… कठोरपणे समूळ निपटून काढलाच पाहीजे. …मात्र, जिथे ‘सततच्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध दाद मागणं

कॉर्पोरेट-दहशतवाद Read More »

देशात हुकूमशाही आहे की, लोकशाही?

देश राज्यघटनेनुसार ‘संघराज्यीय’ पद्धतीने चालतोय की, राज्यघटनेतल्या त्रुटींचा गैरफायदा घेऊन मनमानी पद्धतीने?? (‘पेगॅसस सॉफ्टवेअर’सारखी अनेक लोकशाहीविरोधी व घटनात्मक तरतुदींना हरताळ फासणारी एकापेक्षा एक प्रकरणे उजेडात येत असतानाच… ”लोकशाहीमूल्यांना व संकेतांना” पायदळी तुडवणारा सगळा घटनाक्रम काही थांबायलाच तयार नाही…) १) भारत आज, “बुलडोझर-रिपब्लिक” , उद्या काय यादवीयुद्धग्रस्त “बनाना-रिपब्लिक”??? काॅ. वृंदा करात, ही ७५ वर्षीय लढवय्यी ‘मार्क्सवादी

देशात हुकूमशाही आहे की, लोकशाही? Read More »

Skeletons come tumbling out….

SEBI च्या संस्थापकांपैकी एक व NSE च्या भूतपूर्व MD व CEO चित्रा रामकृष्ण आणि तिचा हिमालयीन ‘बाबा’ यांच्या देशघातकी ‘संबंधां’वर पुढे जाऊन बराच प्रकाश पडेल, पडावा… पण, सध्या त्यातल्या एका अतिशय महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधणं, समाजहितासाठी खूपच गरजेचं आहे! आधुनिक ‘काॅर्पोरेटीय कारभारा’तील ‘अदृश्य’ स्वरुपाचा (जसा, भांडवलशाहीचा उद्गाता ॲडम स्मिथने वर्णिलेला ‘भांडवली-व्यवस्थे’त बाजारपेठीय ‘अदृश्य

Skeletons come tumbling out…. Read More »

आधुनिक जगण्याच्या स्पर्धेत गांधी आणि सानेगुरुजींच्या मूल्यांची आवश्यकता

नकोत आम्हा एलिऑन मस्क, नकोत बिल गेट्स… हवेत आम्हा ‘गांधी महात्मा’ आणि ‘गुरुजी साने’! मानवजातीच्या अंतिम कल्याणासाठी ‘ओशों’सारखा प्रबुद्ध पुरुष, प्रचलित शिक्षणपद्धतीवर टीका करत, “पुरुषांनी स्त्रीसारखं प्रेम, ‘ममत्व’ अंगी बाणवण्याची नितांत गरज असताना, आपल्या स्पर्धात्मक व गणित-सायन्सवरच भर देणाऱ्या शिक्षणपद्धतीमुळे स्त्रियाच पुरुषांसारख्या कडव्या महत्त्वाकांक्षी म्हणून संवेदनशून्य होऊ लागल्याची” तीव्र चिंता व्यक्त करुन गेले; तर, दुसरीकडे

आधुनिक जगण्याच्या स्पर्धेत गांधी आणि सानेगुरुजींच्या मूल्यांची आवश्यकता Read More »

पुढच्या निवडणुकीत “नाॅकडाऊन” होऊ नये म्हणूनच, “लाॅकडाऊन”…..

नोटबंदी, आर्थिकमंदी आणि आता, अंतहिन संचारबंदी… कृतिशून्यतेतील नरेंद्र मोदीकृत धोरण-विकृती! ….निदान, पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान प्रामाणिकपणे म्हणतोय तरी की, “संभाव्य करोना व्हायरसची साथ आटोक्यात आणण्याकामी पाकिस्तान सरकार संसाधनांअभावी हतबल”! या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी सरकारचं सार्वजनिक आरोग्यसेवेचं प्रगतीपुस्तक काय म्हणतयं, जरा पाहूया. आम्ही राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाच्या केवळ १.८% (याच, मोदी सरकारचं २०२५चं आरोग्यसेवेवरच्या खर्चाचं लक्ष्य २.५%

पुढच्या निवडणुकीत “नाॅकडाऊन” होऊ नये म्हणूनच, “लाॅकडाऊन”….. Read More »