धर्मराज्य पक्ष

Skeletons come tumbling out….

SEBI च्या संस्थापकांपैकी एक व NSE च्या भूतपूर्व MD व CEO चित्रा रामकृष्ण आणि तिचा हिमालयीन ‘बाबा’ यांच्या देशघातकी ‘संबंधां’वर पुढे जाऊन बराच प्रकाश पडेल, पडावा… पण, सध्या त्यातल्या एका अतिशय महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधणं, समाजहितासाठी खूपच गरजेचं आहे! आधुनिक ‘काॅर्पोरेटीय कारभारा’तील ‘अदृश्य’ स्वरुपाचा (जसा, भांडवलशाहीचा उद्गाता ॲडम स्मिथने वर्णिलेला ‘भांडवली-व्यवस्थे’त बाजारपेठीय ‘अदृश्य […]

Skeletons come tumbling out…. Read More »

महाराष्ट्रातील कामगार चळवळीवरील ‘पसारा’ कायद्याचा घातक प्रभाव

‘राष्ट्रपतींनाही जिचा मान ठेवावा लागतो; ती ‘खाकी वर्दी‘ गेली आणि स्मशानातल्या राखेसारखी दिसणारी ‘राखाडी वर्दी‘ मातली…. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतोय! महाराष्ट्रात ‘प्रजासत्ताका’चा अभिनिवेश निर्माण करणारा “माहिती अधिकार कायदा” २००३ साली संमत झाल्यावर, दुर्दैवाने पुढे दोनच वर्षांत तळागाळातल्या श्रमिकवर्गाच्या लोकशाही हक्काचं थडगं बांधणारा PASARA (Private Security Agencies Regulation Act-2005) कायदा महाराष्ट्राच्या विधिमंडळाने संमत केला.

महाराष्ट्रातील कामगार चळवळीवरील ‘पसारा’ कायद्याचा घातक प्रभाव Read More »

व्हाय ओन्ली गांधी वॉज किल्ड ???

इतर कोणत्याही तत्कालीन भारतीय राजकीय नेत्यांपेक्षा, म. गांधींचीच ‘हत्या’ घडवून आणावी… असं, ‘नथ्थू-पंथीयां’ना (नथुराम गोडसे पंथीयांना) तीव्रतेनं का वाटलं असावं??? …तर, त्याचं उत्तर हे की, “म. गांधी, ही केवळ काही विशिष्ट उद्देशपूर्तिच्या मर्यादित रिंगणात काम करणारी ‘व्यक्ति’ नव्हती; तर ती सगळ्या जगण्याच्याच आसाला आणि जगण्याच्या व्यामिश्रतेला भिडलेली आणि त्यावर, विद्रोही-कृतिसह प्रभावी भाष्य करणारी ‘महाशक्ति’ होती!

व्हाय ओन्ली गांधी वॉज किल्ड ??? Read More »

नेमेचि येतो मग तो, ‘प्रजासत्ताक दिन’….

“१५ ऑगस्ट-१९४७ रोजी ब्रिटीश जोखडातून स्वतंत्र झालेला भारत, २६ जानेवारी १९५० पासून एक ‘लोकशाहीवादी देश’ बनेल खरा… पण, पुढे जाऊन, भारत आपलं हे संविधान टिकवून ठेवेल की, पुन्हा आपलं ‘स्वातंत्र्य’ गमावून बसेल, हा माझ्या मनात उद्भवणारा प्रश्न आहे”, असं राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत म्हणाले होते. बाबासाहेबांच्या मनात ठाण मांडून बसलेली, पुन्हा ‘स्वातंत्र्य

नेमेचि येतो मग तो, ‘प्रजासत्ताक दिन’…. Read More »

(चिलीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. गॅब्रियल बोरिक यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे पाठवलेल्या अभिनंदनपर मूळ इंग्रजी पत्राचा मराठी अनुवाद….)

श्री. गॅब्रियल बोरिक, नवनिर्वाचित चिलीचे अध्यक्ष, चिलीचे नवे अध्यक्ष म्हणून आपली निवड झाल्याबद्दल ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आम्ही आपलं हार्दिक अभिनंदन करीत आहोत व प्रत्यक्ष निवडीपूर्वी काही दिवस आधीच, मी स्वतः तसं, आमच्या फेसबुक-पेजवर आणि व्हाॅट्स्ॲप ग्रुप्सवर (आपल्या निवडीचं) भाकित केलं होतं! अध्यक्ष महोदय, “भ्रष्टाचार तसेच, माणूस व निसर्गाचं शोषण, याबाबत कुठलीही तडजोड सहन न करण्या”च्या तत्त्वावर

(चिलीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. गॅब्रियल बोरिक यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे पाठवलेल्या अभिनंदनपर मूळ इंग्रजी पत्राचा मराठी अनुवाद….) Read More »

आधुनिक जगण्याच्या स्पर्धेत गांधी आणि सानेगुरुजींच्या मूल्यांची आवश्यकता

नकोत आम्हा एलिऑन मस्क, नकोत बिल गेट्स… हवेत आम्हा ‘गांधी महात्मा’ आणि ‘गुरुजी साने’! मानवजातीच्या अंतिम कल्याणासाठी ‘ओशों’सारखा प्रबुद्ध पुरुष, प्रचलित शिक्षणपद्धतीवर टीका करत, “पुरुषांनी स्त्रीसारखं प्रेम, ‘ममत्व’ अंगी बाणवण्याची नितांत गरज असताना, आपल्या स्पर्धात्मक व गणित-सायन्सवरच भर देणाऱ्या शिक्षणपद्धतीमुळे स्त्रियाच पुरुषांसारख्या कडव्या महत्त्वाकांक्षी म्हणून संवेदनशून्य होऊ लागल्याची” तीव्र चिंता व्यक्त करुन गेले; तर, दुसरीकडे

आधुनिक जगण्याच्या स्पर्धेत गांधी आणि सानेगुरुजींच्या मूल्यांची आवश्यकता Read More »

कृषी विधेयके म्हणजे ‘कंत्राटी-शेतीपद्धती’

मित्रहो, खालील सगळ्याचा अर्थ फार फार गंभीर आणि जनसामान्यांचं जीवन उध्वस्त करुन त्यांना अखंड गुलामगिरीत ढकलण्याचा फक्त, आहे… गेल्या दोनतीन दशकांपूर्वीपासूनच आम्ही “कंत्राटी कामगार-कर्मचारी पद्धती”ची अवदसा आली, …आता ‘कंत्राटी-शेतीपद्धती’ येणार, हे गंभीर इशारे सातत्याने देत होतो; पण, ऐकतो कोण??? “शहर-उपनगरातले नोकरदार आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसह अलुतेदार-बलुतेदार, बाजारपेठेतील आपली सगळी ‘आर्थिकपत’ या ‘कंत्राटीकरणा’च्या फेऱ्यात गमावून बसले

कृषी विधेयके म्हणजे ‘कंत्राटी-शेतीपद्धती’ Read More »

“जगणं, जीवनावश्यक बाबींवरच प्रामुख्याने आधारलेलं असायला हवं”…

(सोबत जोडलेल्या बातमीचा आधार घेत खालील माझं प्रसंगोचित भाष्य…..) केंद्र आणि राज्य सरकारला भांडवलदारांच्या हितासाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांची बेसुमार पिळवणूक करण्याची सुवर्णसंधी ‘करोना-लाॅकडाऊन’मुळे निर्माण झाली आहे, हे शंभर टक्के सत्य आणि त्याचा ते दमनचक्र वेगाने फिरवून “Profits are private and losses are public”, या भांडवली-तत्त्वानुसार अमानुष फायदा घेतीलच. यालाच, त्याच्या भांडवली-व्यवस्थापकीय परिभाषेत ते,

“जगणं, जीवनावश्यक बाबींवरच प्रामुख्याने आधारलेलं असायला हवं”… Read More »

जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”…..

५ एप्रिल (रविवार)-२०२० रोजी रात्रौ ठीक ९ वा. जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”….. “नियतीशी करार”(Tryst with destiny) अशी ऐतिहासिक ललकार पुकारत भारताचे खरेखुरे ज्ञानी, विज्ञानवादी आणि विवेकी, असे पहिले पंतप्रधान पं. नेहरुंनी भारतीय स्वातंत्र्याची उद्घोषणा केली…. त्या, स्वातंत्र्यापश्चातच्या ७२ वर्षाच्या प्रवासातील ५ एप्रिल-२०२० रोजी रात्रौ ९ नंतरची ९ मिनिटे, हा एक ‘अंधारवाट’ दाखवणारा

जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”….. Read More »

रोगापेक्षा ‘इलाज’ भयंकर की, ‘इलाजा’पेक्षाही ‘डाॅक्टर’ भयंकर…???

‘करोना महारोग’ बराचसा अनावश्यक हवाईप्रवास करणाऱ्या श्रीमंतांनी विमानातून पसरवला आणि त्याचे खाली जमिनीवर भयंकर ‘भोग’ कोण भोगतोय…. तर, “विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर” तसं, डोक्यावर गाडगीमडगी घेऊन रस्तोरस्ती मैलोगणिक ऊन्हातान्हात फिरणारा तो गोरगरीब भोगतोय….. या ‘मरणयातनां’पेक्षा प्रत्यक्ष ‘मरण’ बरं… अशी, आजची सामान्य लोकांची मनस्थिती आहे! केवढं हे, कमालीचं क्रौर्य? क्रौर्याने तर या ‘लाॅकडाऊन’मध्ये जणू, कळसच गाठलाय… नोटबंदीतही

रोगापेक्षा ‘इलाज’ भयंकर की, ‘इलाजा’पेक्षाही ‘डाॅक्टर’ भयंकर…??? Read More »