‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालया”चा आदेश पायदळी तुडवून तुर्भे(नवी मुंबई) पोलीसांची २८ नोव्हेंबर-२०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार!!!
पोलीस, विशेषतः नवी मुंबईतील पोलीस, हे राजरोस ‘खाकीवर्दीतले गुंड’ झालेले असून कंपन्यांच्या मालकांची बिनधास्त सुपारी घेऊ लागलेत; हा अनुभव, यापूर्वीही अनेक वेळा १) थॉमसन प्रेस २) एस्. पी. फॅब्रिकेटर्स ३) सिंडीकेट वायपर्स् ४) प्रगती इलेक्ट्रीकल्स् ५) प्रदीप मेटल्स सारख्या नवी मुंबईतील अनेक कंपन्यांच्या आंदोलनात आम्ही घेत आलेले आहोत. महाभारतातल्या दुर्योधन, दुःशासनाचे “बाप” बनलेले हे पोलीस, […]