मराठी

आम्ही उरलो आता बाबासाहेबांची जयंती-मयंती साजरी करण्यापुरते, आरक्षणाची आरती ओवाळण्यापुरते….

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी थेट ‘साम्यवादा’चा, जसा कार्ल मार्क्सने सांगितला तसा, परिपूर्ण स्विकार केला नसला; तरीही, ‘समतेच्या संदेशा’चा प्रवासही, कुठेतरी त्या साम्यवादी-समाजवादी सडकेवरुनच दौडत होणार, हे त्यांच्यासारख्या प्रज्ञावानाला ठाऊक असणारच. त्यादृष्टीनेच, ॲडम स्मिथचे “मुक्त बाजारपेठीय तत्त्वज्ञान, हे ‘अस्पर्श’ राखण्याएवढं ‘अंतिम-सत्य’ वा अतिपवित्र असणं… किंवा, माणूस हे वासनांचं गाठोडं असल्याने प्रत्येक माणूस, हा अविरत आपापला स्वार्थ जपणारा […]

आम्ही उरलो आता बाबासाहेबांची जयंती-मयंती साजरी करण्यापुरते, आरक्षणाची आरती ओवाळण्यापुरते…. Read More »

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….अखेरचा लेख क्रमांक ८

बरोबर महिनाभरानंतर सॅमसंग विजयाचा अन्वयार्थ समाप्त करत असताना…मुद्दामहून हे सांगितलं गेलं पाहिजे की, त्या सॅमसंग ऐतिहासिक विजयाचं अप्रूप-कौतुक यासाठीच कारण, …हल्लीच्या ‘कामगारधर्म’ नावाची चीजच ठाऊक नसलेल्या ‘नाचीज’ कामगारवर्गाला, संघर्षासाठी तयार करणं आणि एकदा तयार केल्यावर संघर्षाच्या ‘अग्निपथा’वर कायम राखणं…हे फार अवघडच नव्हे; तर, अशक्यप्राय काम होत चाललंय! …ज्यांना एरव्ही कंपनीतलं काळंकुत्र देखील विचारत नसतं; अशांना

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….अखेरचा लेख क्रमांक ८ Read More »

महाराष्ट्र-विधानसभा-निवडणुकीचा अन्वयार्थ, थोडक्यात….

मुसलमानांची जिरवायची म्हणून मराठे भाजपसोबत, मराठ्यांची (जरांगे-पाटलाची) जिरवायची म्हणून ओबीसी भाजपसोबत, प्रकाश आंबेडकरांच्या मागणीला (‘अंगापेक्षा बोंगा मोठा’, असा तो ‘अतिहावरेपणा’ला का असेना) कधिच सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत; म्हणून, ‘मविआ’ची जिरवायला ‘दलित’ भाजपसोबत आणि शिवसेनेनंच ‘भाजप-संघा’ला मोठं केलं; म्हणून, शिवसेनेची जिरवायला ‘मुसलमान’ भाजपसोबत…. …ही विधानसभा-निवडणूक म्हणजे, “मत अडवा, मत जिरवा”, असा कुठला ‘जिरवाजिरवी’चा ‘एक कलमी’ किंवा

महाराष्ट्र-विधानसभा-निवडणुकीचा अन्वयार्थ, थोडक्यात…. Read More »

“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”…

“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”, असं ज्या निवडणुकीचं एका वाक्यात वर्णन करता येईल; अशा ‘अंकल सॅम’च्या नुकत्याच लागलेल्या निवडणूक-निकालानंतर तर, भांडवली-व्यवस्थेसंदर्भातील अनेक गंभीर प्रश्न आता सातत्याने ऐरणीवर येत राहतील. ८ वर्षांपूर्वी ‘अमेरिका फर्स्ट’, हे अमेरिकेची ताकद, सुरक्षा व वर्चस्व जगभरात अव्वल नंबरवर राखण्याबाबतचं वक्तव्य करणाऱ्या डोनाल्ड ट्रंप नावाच्या अब्जाधीश उद्योगपतीची, याहीवेळेस

“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”… Read More »

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ७

मराठी घरातील दिवाळी म्हणा, दिपावली म्हणा… हा नवचैतन्यानं सळसळणारा, नरकचतुर्दशीच्या पहाटेला उटण्याच्या दरवळणार्‍या सुगंधाचं लेणं घेऊन येणारा अन् चकली, चिवडा, करंज्या (कानोले), रवा-बेसनाचे लाडू, अनारसे, शंकरपाळ्या वगैरे फराळाचा घमघमाट चारही दिशांनी उधळून देणारा ‘दिपोत्सव’…दिवाळी रात्री वा पहाटेचं बाहेरचं वातावरण, पणत्यांच्या ज्योतींनी व कंदिलाच्या दिव्यांनी उजळवून टाकण्यापेक्षाही अधिक…वर्षभर, “दिवाळीच्या मुळा, लेकी आसावली”, अशी दिवाळीची चातकासारखी वाट

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ७ Read More »

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ६

महाराष्ट्रात तसे ‘रोजगार’ नाहीत, असं काही नव्हे; ते आहेतच…’बेरोजगारी’ ही महाराष्ट्रातल्या मराठी-माणसाची अनेक समस्यांपैकी एक समस्या असली; तरी, त्याहूनही मोठी (अगदी, महाराष्ट्रभरात अक्राळविक्राळ पसरलेली) समस्या म्हणजे, ‘अर्धरोजगारी’ची समस्या होय… ‘अर्धरोजगार’, म्हणजे ज्या रोजगाराच्या तुटपुंज्या मिळकतीत संसाराची गोधडी धड शिवता येत नाही, संसाराचा गाडा सन्मानाने नीट हाकता येत नाही आणि जो रोजगार, अतिशय असुरक्षित बेभरवशी म्हणून

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ६ Read More »

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ५

मराठी कामगार-कर्मचारीवर्गाची हीनदीन, अवनत-अवमानित अवस्था निर्माण होण्याचं तिसरं प्रमुख कारण म्हणजे…जगभरात प्रगत देशांमध्ये ‘कामगारविश्वाभोवतीच राजकारणाची दुनिया फिरत असते आणि कामगार नेतेच बव्हंशी देशाचं राजकारण चालवतात… तर, आमच्या महाराष्ट्र-देशात याच्या पूर्णतः विपरीत स्थिती आहे! ‘कामगार-धर्मा’च्या अथवा कामगारांच्या ‘वर्ग-जाणिवे’च्या दृष्टीकोनातून कामगार-कर्मचारीवर्ग निद्रिस्त असल्यामुळे, जाज्वल्य कामगार नेत्यांना राजकारणात काळं कुत्रं देखील विचारत नाही! आणि, त्यामुळेच, त्यांच्यात फूट पाडणं,

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ५ Read More »

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक ४)

कामगार-कर्मचारीवर्गाची हीनदीन, अवनत-अवमानित अवस्था निर्माण होण्याचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे…त्यांच्यात एकप्रकारे ‘बुद्धीमांद्य’ निर्माण करुन, त्यांना जीवन-संघर्षापासून दूर नेणाऱ्या आणि त्यांना ‘दैववादी’ बनवणाऱ्या यच्चयावत सगळ्याच धर्मसंप्रदायांची महाराष्ट्रभरात झालेली मोकाट पैदास! ‘हिंदुत्वा’च्या भंडार्‍याची उधळण करतच महाराष्ट्रात ‘दैववादा’ला व किंकर्तव्यमूढतेला एकच उधाण आणण्यात आलं….त्याचाच भाग म्हणून पावसाळ्यात उगवणाऱ्या कुत्र्यांच्या-कावळ्यांच्या छत्र्यांप्रमाणेच बैठक-संप्रदाय, बापू संप्रदाय, जीवनमिशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, स्वाध्याय-परिवार,

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक ४) Read More »

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक १)

९ सप्टेंबरपासून सुरु झालेला हा संप, अपेक्षेनुसार ३८ दिवसांनंतर १७ ऑक्टोबरला ‘सिटू”प्रणित ‘सॅमसंग इंडिया वर्कर्स युनियन’ने (SIWU) ऐतिहासिक यश मिळवून मागे घेतला आणि सॅमसंगसारख्या इतर अनेक बहुराष्ट्रीय (Multinational) कंपन्यांच्या भारतातील मनमानी कारभाराला चांगलाच चाप लावला! झालेल्या समझोत्यानुसार…. ** कामगारांनी लोकशाही पद्धतीने व स्वेच्छेने निवडलेल्या युनियनशी, पगार-बोनस वाढीसाठी युनियनने दाखल केलेल्या ‘मागणीपत्रा’वर (Charter of Demands…’COD’) चर्चा

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक १) Read More »

“सॅमसंगसारख्या भारतातील सरसकट सगळ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांची मस्ती एकदाची उतरवाच…..

सिटू (CITU…सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स) या मार्क्सवादी-कम्युनिस्ट पक्षाच्या (जो तामीळनाडूत DMK आघाडीचा सहयोगी पक्ष आहे) संघटनेशी संलग्न असलेल्या ‘सॅमसंग इंडिया वर्कर्स युनियन’ने पुकारलेला संप, पोलिसी-दडपशाहीला झुगारुन सप्टेंबर ९-२०२४ पासून सुरु असून, कदाचित उद्याच्या बुधवारी (दि.१७ ऑक्टोबर-२०२४) तो संपेलही; पण, त्याचं ‘कवित्व’ दीर्घकाळ शिल्लक राहीलच! …चांगल्या दर्जाचं अन्न कॅन्टीनमधून देणे, कामगार-कर्मचारीवर्गाला येण्याजाण्यासाठी वातानुकूलित एसी-बसेस पुरविणे

“सॅमसंगसारख्या भारतातील सरसकट सगळ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांची मस्ती एकदाची उतरवाच….. Read More »