राजन राजे

“रामलीला मैदान… रावणांच थैमान !!!” ४ जूनची उत्तररात्र काळी रात्र

“ऐ प्रजा, ये कैसी निर्बलता… कैसी लाचारी है? स्वार्थपूर्ण षडयंत्रोसे क्यूँ तू हारी है ? आनेवाली नस्ल को, क्या जबाब देंगे हम ? निर्बलता… ना सिर्फ देशद्रोह, ये सरासर मक्कारी है !!” ब्रिटीश भारतातून गेले… सत्ताधान्याच्या त्वचेचा फक्त रंग बदलला. पण वृत्ती तिच राहिली, तिचा ‘पोत’ उलट अधिक गडद झाला! परकीय ब्रिटीश परवडले, पण स्वकीय […]

“रामलीला मैदान… रावणांच थैमान !!!” ४ जूनची उत्तररात्र काळी रात्र Read More »

२६ एप्रिल, २०११ – ‘चेर्नोबिल आण्विक अपघाताला, २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने…. “अणूविद्युत… निसर्गाशी द्यूत! अणूविद्युत… मृत्यूदूत!!”…

‘‘You can never Master Nature…. Nature rules us, the undiluted truth we understand, if ever, we peep into the TOMB of the dead moments of Chernobyl-Fukushima & into the WOMB of the unborn future moments of Jaitapur !!!’’… “आम्ही अंधारात राहायला तयार आहोत…पण तो आम्हाला जाळणारा किरणोत्सर्जनाचा ‘अणू–प्रकाश’ नको !!!’’…. ज्या जपानचं अभिमानानं आमचे शासक

२६ एप्रिल, २०११ – ‘चेर्नोबिल आण्विक अपघाताला, २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने…. “अणूविद्युत… निसर्गाशी द्यूत! अणूविद्युत… मृत्यूदूत!!”… Read More »

जैतापूरच्या शिमग्याचं कवित्व…

‘लोकप्रभातील १ एप्रिलच्या अंकातील ‘राजू परूळेकर यांच्या ‘जैतापूरची अणूगोळी’ या लेखावर अत्यंत घणाघाती प्रतिक्रिया ‘शिमगा आणि जैतापूर’ या शीर्षकाच्या आपल्या एप्रिलच्या अंकातून देणाऱ्या डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना सडेतोड उत्तर !!! कोकणातल्याच एका खेड्यातली ही एक रूपक कथा ही प्रचलित लोककथा वीजेशीच संबंधित असल्यानं, जैतापूर प्रकल्पासंदर्भात चांगलीच प्रत्ययकारी ठरावी! “एका गावाच्या मध्यभागी वडाच्या पाराखाली निवांत बसलेली

जैतापूरच्या शिमग्याचं कवित्व… Read More »

प्रेसिहोल मशिन टूल्स् प्रा.लि. कामगारांच्या संपाचा १००वा दिवस

आर्थिक विकासाची तद्दन खोटी आणि वांझोटी स्वप्न दाखवून आपल्या देशातल्या व्यवस्थापकीय-शासकीय आणि भ्रष्ट बुद्धिजीवी मंडळींनी जागतिकीकरणाच्या रेटयात गेल्या १५-२० वर्षात जो भीषण नंगानाच चालवलाय, तो सैतानालाही लाजविणारा आहे. एखाद्या कसलेल्या निर्दयी शिकाऱ्याने आपल्या साथीदारांसह चारी बाजूंनी हाकारे देत कोंडीत पकडलेल्या दुबळया सावजाची अत्यंत क्रूरपणे ‘शिकार’ करावी, अशातऱ्हेच भयप्रद व असुरक्षिततेच वातावरण, आपल्या देशाच्या औद्योगिक व

प्रेसिहोल मशिन टूल्स् प्रा.लि. कामगारांच्या संपाचा १००वा दिवस Read More »

प्राणायाम

प्राणायामाच्या दिवसभरातील सर्वोत्तम वेळा (सूर्योदयापूर्वी माध्यान्ही स. १० ते दु. १२, वा. पर्यंत सूर्यास्तापूर्वी व मध्यरात्रीचा समय, अशा एकूण ४ वेळा) व संपूर्ण वर्षभरातील सर्वोत्तम कालावधि (वसंत ऋतु व शरद ऋतु हे दोनच) प. पू. पतंजली ऋषिंनी ‘योगदर्शनात’ वर्णिलेला असला, तरीही प. पू. रामदेवस्वामींनी ‘सप्त-प्राणायाम प्रणालीचे’ आमजनतेसाठी खुलं प्रसारण करताना, गुरूपदेश (प. पू. शंकरजी महाराज)

प्राणायाम Read More »

।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।

‘भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ‘मूळांचा दळभार’ आणि ‘पर्ण संभारासारखं’ – “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न! मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ‘उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ‘आधार’ आहे अन् दुर्जनांवर ‘प्रहार’ आहे! या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रास्त जाणीव मनात

।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। Read More »

“शानू!”

नकळत आज खाडीवरल्या वाळूत करंगळीनं माझ्या हृदयातलं दोन अक्षरी रेखाचित्र काढलं! लहानशी कागदी होडी मी अलगद पाण्यावर सोडली. अस्पष्टशा लाटांवर हिंदकाळतं-हेलकावतं हळूहळू थरथरतं ती दूर-दूर क्षितिजाकडं निघून गेली. शानू……..माझी शानू, अशीच दूर-दूर गेली माझ्यापासून? की कशी? स्मृतिंच्या हेलकाव्यातून एक लहानशी मुग्ध शिल्पमूर्ति वाळूत रोवल्यासारखी उभी रहातेयं. परकर सावरत या वाळूवर आपले इवले इवलेसे पायाचे ठसे

“शानू!” Read More »

‘नॉएडा’ चा धडा!

२२ सप्टेंबरला विषुववृत्तावर मध्यान्ही सूर्य अगदी अचूक डोक्यावर आलेला असतानाच, सर्लिकॉन्-ग्रॅझियानो ट्रान्स्मिशन् प्रा. लि. या गिअर बॉक्सेस् व बेअरिंग्ज् तयार करणाऱ्या ‘ग्रेटर नॉएडा’ स्थित इटालियन (तुरीन येथील) बहुराष्ट्रीय कंपनीत, आंदोलक कामगारांकरवी कंपनी MD/CEO ललितकिशोर चौधरी यांच्या झालेल्या क्रूर हत्येनं, भारतातीलच नव्हे तर जगभरातील औद्योगिकविश्व अक्षरशः हादरून गेलयं! वरील वाहनांच्या सुटया भागाचं उत्पादन करणाऱ्या व ३६०

‘नॉएडा’ चा धडा! Read More »

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सुमुहूर्तावर अन्याय्य ‘मजूर-कंत्राटदारी’ प्रथेचा तीव्र निषेध नोंदविणाऱ्या ‘सुदर्शनधारी दहीहंडी’च्या निमित्ताने…..

तुम्ही ‘पांढरपेशे’ आहात की ‘श्रमजिवी’ आहात, याच सद्यस्थितीतील ‘कंत्राटदारी’ नावाच्या अमानुष ‘शोषण-तंत्रा’ला काहीही सोयरसुतक असण्याचं कारण उरलेलं नाही! १ ते २ टक्के निर्दय बुध्दिमंत बाळांनी व राजकीय मनगटशहांनी चालविलेल्या, या आधुनिक सरंजामदारी व्यवस्थेनं उत्पादन, सेवा इ. सर्वच क्षेत्रात धुडगूस घातलाय. चंगळवाद-चैनीत अडकलेला, म्हणून स्वार्थी व संवेदनाशून्य झालेला, असा विखुरलेला मध्यमवर्ग पाहून, आता आपल्या दमन व

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सुमुहूर्तावर अन्याय्य ‘मजूर-कंत्राटदारी’ प्रथेचा तीव्र निषेध नोंदविणाऱ्या ‘सुदर्शनधारी दहीहंडी’च्या निमित्ताने….. Read More »

उत्पादन व सेवा-क्षेत्रातील ‘कंत्राटदारी’, ही नवी पिळवणूकीची ‘दमन-यंत्रणा’!

——————————————————————————- (कृपया वेळात वेळ काढून वाचा आणि गांभिर्याने विचार करून कृतिशील व्हा!) ——————————————————————————– निर्दय जागतिकीकरण – विवेकशून्य आधुनिकीकरण – बेलगाम संगणकीकरण, यांच्या चौफेर उधळलेल्या ‘वारू’च्या टापांखाली चिरडल्या गेलेल्या कामगारांची सर्वत्र अवस्था अतिशय दयनीय व शोचनीय झालेली आहे. मूठभरांनी मणामणांनी घरं भरायची आणि कणाकणांसाठी आगरी-कोळी-कुणबी-मराठा-आंबेडकरी इ. बहुजनांनी तिष्ठत… तळमळत उंबरठयावर उभं रहायचं! लूट… फक्त संधिसाधू लूट,

उत्पादन व सेवा-क्षेत्रातील ‘कंत्राटदारी’, ही नवी पिळवणूकीची ‘दमन-यंत्रणा’! Read More »